Jio युजर्ससाठी बेस्ट 5G प्लॅन! फक्त 61 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतोय अनलिमिटेड 5G डेटा

Reliance Jio नं गुपचूप भारतात आपला नवा 5G Upgrade data pack सादर केला आहे. या डेटा पॅकची किंमत 61 रुपये आहे. त्यामुळे 5G वर अपग्रेड करू पाहणाऱ्या युजर्ससाठी हा बेस्ट प्लॅन असल्याचं म्हटलं जातंय. डेटा पॅकचा उद्देश्य जुन्या Jio ग्राहकांना 5G सर्व्हिसचा आनंद देण्यास सक्षम बनवणे आहे, तसेच हा युजर्सना अतिरिक्त 6GB हाय-स्पीड 4G डेटा देखील देतो. चला एक नजर टाकूया रिलायन्स जियोच्या नवीन 5जी अपग्रेड डेटा पॅकच्या बेनिफिट्सवर.

Reliance Jio 5G Upgrade data pack

नव्या Jio Rs 61 prepaid recharge pack मध्ये 6GB हाय-स्पीड 4G data मिळतो. हा एक डेटा व्हाउचर आहे, त्यामुळे यात कॉलिंग किंवा एसएमएस बेनिफिट मिळत नाही. या प्लॅनला कोणतीही व्हॅलिडिटी नाही, त्यामुळे याचा वापर तुमच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅनच्या वैधतेपर्यंत करता येईल. हा प्लॅन त्या ग्राहकांना 5जी सर्व्हिस देण्यासाठी सादर करण्यात आला आहे, जे 239 पेक्षा कमी किंमतीचे प्लॅन्स वापरतात. ज्यात 119 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन, 149 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन, 179 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणि 209 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनचा समावेश आहे, त्यावरील रिचार्ज प्लॅन्सवर Jio 5G डेटा आधीपासूनच दिला जात आहे.

61 रुपये के अपग्रेड डेटा पॅकसह ग्राहक Jio 5G सर्व्हिसचा आनंद घेऊ शकतील आणि प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटाचा देखील वापर करता येईल. परंतु, अनलिमिटेड 5G डेटा तेव्हा मिळेल जेव्हा तुमच्या शहरात जियो ट्रू 5G सर्व्हिस लाइव्ह झाली असेल आणि तुम्हाला जियो वेलकम ऑफरचं इनवाइट मिळालं असेल.

5G अपग्रेड म्हणजे काय?

या प्लॅननं रिचार्ज केल्यानं तुमच्या फोनमध्ये 5G नेटवर्क येऊ लागणार नाही. जर तुमच्याकडे एक 5G स्मार्टफोन असेल आणि तुम्ही त्या शहरांमध्ये राहत असाल जिथे जियो 5G सर्व्हिस सुरु करण्यात आली आहे, तरच तुम्हाला 5G नेटवर्क मिळेल. तसेच जियो 5G सर्व्हिस सध्यातरी सर्वांसाठी लाइव्ह करण्यात आली नाही, तर काही युजर्सना नव्या जेनरेशनचं नेटवर्क मिळतंय.

महाराष्ट्रातील 6 शहरांमध्ये जियो 5जी

कालच जियोनं 5जी सर्व्हिस असलेल्या देशातील शहरांची अपडेटेड यादी शेयर केली आहे. नव्या शहरांच्या यादीत महाराष्ट्राच्या उपराजधानीचा अर्थात नागपूरचा आणि अहमदनगरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण पाच प्रमुख शहरांमध्ये Jio True 5G लाईव्ह झालं आहे. ज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर आणि नागपूरचा समावेश आहे.

त्याचबरोबर देशात दिल्ली एनसीआर, कोलकाता, वाराणसी, चेन्नई, बेंगळुरू, हैद्राबाद, नाथद्वारा, गुजरातच्या 33 जिल्ह्यांची प्रमुख शहरे, लखनऊ, त्रिवेंद्रम, म्हैसूर, चंदीगढ, मोहाली, पंचकुला, जिरकपूर, खरड, डेराबस्सी, भोपाळ, इंदोर, भुवनेश्वर, कटक, जबलपूर, ग्वालियर, लुधियाना, सिलिगुरी, जयपूर, जोधपूर, उदयपूर, आग्रा, मेरठ, प्रयागराज, तिरुपती, नेल्लोर, कोझिकोड आणि थ्रिसूर मध्ये जियोचं वेगवान नेटवर्क उपलब्ध झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here