16GB RAM आणि 120W चार्जिंगसह iQOO Neo 7 Racing Edition लाँच

आयकू ब्रँडनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये नवीन स्मार्टफोन iQOO Neo 7 Racing Edition लाँच केला आहे. याआधी कंपनीनं या सीरीजमध्ये iQOO Neo 7 5G आणि Neo 7 SE 5G फोन पण मार्केटमध्ये सादर केला आहे. हा नवीन रेसिंग एडिशन देखील पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह येतो ज्यात 16GB RAM, Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट आणि 120W fast charging मिळते. पुढे आम्ही नवीन आयकू स्मार्टफोनची संपूर्ण माहिती दिली आहे.

iQOO Neo 7 Racing Edition Specifications

  • 6.78 FHD+ AMOLED डिस्प्ले
  • 16GB RAM + 512GB Storage
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 50MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 120W fast charging

आयकू नियो 7 रेसिंग एडिशन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 6.78 इंचाच्या फुलएचडी+ ला सपोर्ट करतो. ही फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी पंच-होल स्टाईलसह येते. हा आयकू मोबाइल 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो तसेच यात एचडीआर10+ सारखे फीचर्स देखील मिळतात. या स्मार्टफोनची थिकनेस फक्त 8.5एमएम आहे तसेच वजन 197ग्राम आहे. हे देखील वाचा: सर्वात शानदार कॅमेरा फोनवर 17,000 रुपयांची सूट; आताच खरेदी करा स्वस्त Google Pixel 6a

iQOO Neo 7 Racing Edition अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो ओरिजन ओएससह चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे तसेच ग्राफिक्ससाठी हा एड्रेनो 730 जीपीयूला सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजी वर चालतो.

फोटोग्राफीसाठी आयकू नियो 7 रेसिंग एडिशनच्या बॅक पॅनलवर एफ/1.88 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 6GB RAM सह समोर आला Samsung Galaxy A34 5G; लवकरच येणार बाजारात

iQOO Neo 7 Racing Edition Price

चीनमध्ये आयकू नियो 7 रेसिंग एडिशन चार स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. यात बेस मॉडेल 8GB RAM+128GB storage ला सपोर्ट करतो ज्याची किंमत CNY 2799 म्हणजे जवळपास 33,000 रुपये आहे. तसेच 12GB+256GB व्हेरिएंट CNY 2999 (जवळपास 35,500 रुपये), 16GB+256GB व्हेरिएंट CNY 3299 (जवळपास 39,000 रुपये) तर सर्वात मोठा 16GB RAM + 512GB storage व्हेरिएंट CNY 3599 म्हणजे जवळपास 42,800 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here