टेलीकॉम कंपनी रिलायंस जियो कडे सध्या प्रत्येक कॅटेगरी मध्ये प्रीपेड व पोस्टपेड प्लान आहेत. युजर्स आपल्या गरजेनुसार जियोचे प्लान्स निवडू शकतात. नवीन वर्षात कंपनीने सर्व प्लान मधून आईयूएसी चार्ज काढून एक मोठी भेट तर दिलीच आहे. आता कंपनीच्या सर्व प्रीपेड प्लान मध्ये कोणत्याही नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंग फ्री मिळेल. वेळोवेळी जियोला आव्हान देण्यासाठी एयरटेल आणि वोडाफोन-आयडिया अनेक शानदार प्लान घेऊन आले आहेत आणि कमी किंमतीत जास्त डेटा देण्याच्याबाबतीत जियोच्या पुढे गेले आहेत. जर तुम्ही पण रिलायंस जियोचे ग्राहक असाल तर आम्ही या या रिपोर्ट मध्ये Jio च्या त्या टॉप 5 प्रीपेड प्लान बाबत माहिती देणार आहोत जे रोज 1.5जीबी डेटा सह येतात.
Jio चा 199 रुपयांचा प्लान
कंपनीच्या डेली 1.5 जीबी प्लानच्या यादीत 199 रुपयांचा प्लान सर्वात स्वस्त आहे. या प्लान मध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. याचा अर्थ असा कि युजर्सना एकूण 42 जीबी डेटा मिळेल. तसेच या पॅक मध्ये कोणत्याही नेटवर्क वर कॉलिंग फ्री असेल. प्लान मध्ये रोज 100एसएमएस सोबतच Jio Apps चे मोफत सब्सक्रिप्शन पण मिळेल.
Jio चा 399 रुपयांचा प्लान
या प्लान मध्ये जियो युजर्सना 1.5 जीबी डेटा म्हणजे एकूण 84 जीबी डेटा मिळेल. या प्लानची वैधता 56 दिवसांची आहे. डेली 100 एसएमएसच्या सुविधा सोबतच युजर्सना कोणत्याही नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळेल. यात जियोच्या सर्व ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.
Jio चा 555 रुपयांचा प्लान
555 रुपयांचा प्लानची वैधता 84 दिवस आहे. या प्लान मध्ये युजर्सना डेली 1.5जीबी डेटाच्या हिशोबाने एकूण 126 जीबी डेटा मिळेल. यात पण सर्व नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंग, जियो ऍप्सचे सब्सक्रिप्शन आणि रोज 100 SMS पण मिळतील.
Jio चा 777 रुपयांचा प्लान
जियोच्या या प्लान मध्ये पण डेली 1.5 जीबी डेटा मिळतो आणि या प्लानची वैधता पण 84 दिवस आहे, 555 रुपयांचा प्लान पेक्षा वेगळेपण म्हणजे या प्लान मध्ये युजर्सना 5 जीबी अतिरिक्त डेटा मिळेल. याचा अर्थ असा कि तुम्हाला एकूण 131 जीबी डेटा मिळेल. यात सर्व नेटवर्क वर कॉलिंग अनलिमिटेड फ्री आहे. यात रोज 100 मेसेज मोफत आणि फ्री मध्ये Disney+ Hotstar VIP ची मेंबरशिप पण मिळत आहे.
Jio चा 2,121 रुपयांचा प्लान
डेली 1.5 जीबी डेटा असलेला हा कंपनीचा सर्वात महाग प्लान आहे जो 336 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लान मध्ये युजर्स कोणत्याही नेटवर्क वर मोफत कॉलिंग करू शकतील. तसेच यात पण जियोच्या सर्व ऍप्सच्या सब्सक्रिप्शनचा समावेश आहे. या प्लान मध्ये एकूण 126जीबी डेटा युजर्सना मिळेल.
















