Tecno ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवा स्मार्टफोन Tecno Camon 16 Premier लाॅन्च केला आहे. हा स्मार्टफोन स्टाईलिश लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह 6 कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. टेक्नो कॅमोन 16 प्रीमियर कंपनीने 16,999 रुपयांमध्ये लाॅन्च केला गेला आहे जो 16 जानेवारी पासून शाॅपिंग साइट फ्लिपकार्ट वर आणि येत्या काही दिवसांत आफलाईन रिटेल स्टोर्स वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
कॅमेर्याची कमाल
सर्वप्रथम फोनचा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टेक्नो कॅमोन 16 प्रीमियर क्वाॅड रियर कॅमेरा आणि डुअल फ्रंट कॅमेर्याला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो काॅलिंगसाठी फोनच्या फ्रंट पॅनल वर दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 105 डिग्री क्षमता असलेला 8 मेगापिक्सलची सेकेंडरी अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे.
Camon 16 Premier च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX686 सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची सुपर वाइड एंगल लेंस, 2 मेगापिक्सल डेफ्थ सेंसर आणि अजून एक 2 मेगापिक्सल लेंस आहे. फोनचा कॅमेरा 30fps 4K वीडियो आणि 960fps सुपर स्लो-मोशन वीडियो रिकाॅर्ड करू शकतो.
स्पेसिफिकेशन्स
Tecno Camon 16 Premier चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20.5ः9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.85 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. टेक्नोचा हा नवा फोन एंडराॅयड 10 ओएस वर लाॅन्च झाला आहे जो 2.5 गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो जी90टी चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी76 जीपीयू देण्यात आला आहे.
कॅमोन 16 प्रीमियर भारतात 8 जीबी रॅम वर लाॅन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी Tecno Camon 16 Premier 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी असलेल्या 4,500एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन Glacier Silver कलर मध्ये विकत घेता येईल.















