Nokia नं काही दिवसांपूर्वी फीचर फोन युजर्सचा विचार करून भारतीय बाजारात 27 दिवसांचा बॅटरी बॅकअप देणारा Nokia 8210 4G लाँच केला होता. तर, आता कंपनीनं आपला अजून एक स्वस्त फीचर फोन Nokia 2660 Flip सादर केला आहे. नोकिया मोबाइल फोन बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या कंपनी HMD Global नं हा फोन सध्या चीनी मार्केट सादर केला आहे. चला जाणून घेऊया या नोकियाच्या नव्या परवडणाऱ्या मोबाइलचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.
Nokia 2660 Flip ची किंमत आणि विक्री
Nokia 2660 Flip चीनी मार्केटमध्ये 499 युआन म्हणजे (जवळपास 5,876 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. सध्या ऑफर अंतगर्त हा हँडसेट 429 युआन (जवळपास 5,052 रुपये) मध्ये विकला जात आहे. सध्या चीनमध्ये आलेला हा मॉडेल भारतात कधी येईल हे सांगता येणार नाही. परंतु कंपनीचा इतिहास पाहता लवकरच फ्लिप डिजाईन असलेला फिचर फोन देखील लवकरच भारतीयांच्या सेवेत दाखल होईल.
Nokia 2660 Flip चे स्पेसिफिकेशन्स
- 2.8-इंच QVGA डिस्प्ले, 1.77 इंचाचा सेकंडरी QQVGA डिस्प्ले
- Unisoc T107 प्रोसेसर
- 48MB RAM आणि 128MB स्टोरेज
- 0.3 मेगापिक्सल VGA कॅमेरा सेन्सर
- रिमूव्हेबल बॅटरी
Nokia 2660 Flip चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Nokia 2660 Flip चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता यात 2.8 इंचाचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 240 x 320 पिक्सल आहे. तसेच फोनच्या मागील बाजूस 1.77 इंचाचा सेकंडरी QQVGA डिस्प्ले देखील देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 120 x 160 पिक्सल आहे. तसेच प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये Unisoc T107 प्रोसेसर देण्यात आला आहे.
स्टोरेज आणि रॅम पाहता, फोनमध्ये 48MB RAM आणि 128MB ची इंटरनल स्टोरेज मिळते. तसेच फोटोग्राफीसाठी यात 0.3 मेगापिक्सलचा VGA कॅमेरा सेन्सर आणि एक एलईडी फ्लॅश देखील देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर या फोनमध्ये ब्लूटूथ 4.2, ड्युअल सिम सपोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक आणि एक मायक्रो USB पोर्ट देण्यात आला आहे.
26 तासांपेक्षा जास्त टिकणारी बॅटरी
बॅटरी बॅकअप पाहता Nokia 2660 Flip मध्ये 2.75-वॅट अवर्सची रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी 20 तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप देते. तसेच सिंगल चार्जवर हा फोन 26.6 दिवसांपर्यंतचा स्टँडबाय टाइम देतो.
ICE इमरजेंसी कॉल सिस्टम
सॉफ्टवेयर पाहता यात ICE इमरजेंसी कॉल सिस्टमसह अॅक्सेसिबिलिटी मोड सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच फोनचे डायमेन्शन्स पाहता फोनची उंची 18.9mm, रुंदी 108mm, जाडी 55mm आणि वजन 123 ग्राम आहे.