OPPO ने सांगितले आहे की कंपनी येत्या 18 जानेवारीला भारतात एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे ज्याच्या मंचावरून ओपोचा नवा 5जी स्मार्टफोन OPPO Reno5 Pro 5G भारतात लाॅन्च केला जाईल. लाॅन्च डेटच्या आधी ओपो सतत या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स टीज करत आहे. दरम्यान एका लीक मध्ये ओपो रेनो 5 प्रो च्या किंमतीचा खुलासा पण करण्यात आला आहे. या लीक मध्ये बाजारात येण्याआधी Reno5 Pro 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.
अशी असेल किंमत
OPPO Reno5 Pro 5G संबंधित या लीक मध्ये फोनच्या किंमतीची माहिती देण्यात आली आहे. अभिषेक यादवच्या या लीकनुसार आगामी ओपो स्मार्टफोन 8 जीबी रॅम वर लाॅन्च केला जाईल ज्या सोबत 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. किंमत पाहता लीकनुसार ओपो रेनो 5 प्रो 5जी भारतीय बाजारात 39,990 रुपयांमध्ये एंट्री करेल. कंपनीची घोषणा येईस्तोवर ही किंमत फक्त एक लीक म्हणता येईल.
भारतातील पहिला 1000+ चिपसेट असलेला फोन
ओपो रेनो 5 प्रो स्मार्टफोन बद्दल लीक मध्ये सांगण्यात आले आहे की हा डिवाईस मीडियाटेकच्या डायमनसिटी 1000+ चिपसेट वर लाॅन्च केला जाईल. विशेष म्हणजे आता पर्यंत या चिपसेट वर कोणताही फोन देशात लाॅन्च झाला नाही म्हणजे OPPO Reno5 Pro 5G भारतातील पहिला डायमनसिटी 1000+ चिपसेट असलेला फोन असेल. प्राइस सेग्मेंट पाहता बोलले जात आहे की ओपो रेनो 5 प्रो या बजेट मध्ये Samsung Galaxy S20 FE आणि OnePlus 8T ला टक्कर देईल.
स्पेसिफिकेशन्स
इतर स्पेसिफिकेशन्स पाहता इंटरनेशनल मार्केट मध्ये OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला गेला आहे. हा फोन पण ओएलईडी डिस्प्ले पॅनल वर बनला आहे जो 3डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित एंडराॅयड 11 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या डायमनसिटी 1000+ चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे.
फोटोग्राफी ओपो रेनो5 प्रो 5जी क्वाॅड रियर कॅमेर्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस, 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी और वीडियो काॅलिंगसाठी डिवाईस एफ/2.4 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,350एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि ही पण 65वाॅट सुपर फ्लश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.
















