Samsung च्या वेबसाइट वर आले Galaxy F62, F12, A72 आणि A52 5G, जाणून घ्या धमाकेदार फोन्सबाबत सर्वकाही

Galaxy A72

Samsung काल म्हणजे 2 फेब्रुवारीला भारतात यावर्षीचा आपला सर्वात किफायतशीर स्मार्टफोन Galaxy M02 लॉन्च करणार आहे. हा फोन लॉन्च झाल्यानंतर पण कंपनी अनेक फोन्सना टेक मंचावर सादर करण्याचे प्लानिंग करत आहे. बोलले जात आहे कि फ्लॅगशिप सीरीज गॅलेक्सी एस21 आणि बजेट फोन्स सादर केल्यानंतर कंपनी फेब्रुवारी मध्ये वेगवेगळ्या मार्केट मध्ये अजून चार नवीन फोन पण सादर करू शकते. लॉन्च होणारे हे फोन Galaxy F62, Galaxy F12, Galaxy A72 आणि Galaxy A52 5G असू शकतात. आता या फोनचा ऑफिशियल सपोर्ट पेज लाइव झाले आहेत.

सपोर्ट पेज लाइव

सॅमसंग गॅलेक्सी एफ62, गॅलेक्सी एफ12, गॅलेक्सी ए72 आणि गॅलेक्सी ए52 5G च्या आधी सॅमसंगच्या एफ-सीरीज मध्ये गॅलेक्सी F12 चा सपोर्ट पेज डिसेंबर 2020 मध्ये सॅमसंग इंडिया वेबसाइटवर लाइव झाला होता. कंपनीने एफ-सीरीज गेल्या वर्षी लॉन्च केला होता. हा सीरीजचा सर्वात पहिला फोन भारतात गॅलेक्सी एफ41 नावाने आला होता.

गॅलेक्सी F62 चे सपोर्ट पेज पण लाइव झाले आहे आणि वेबसाइटवर फोनचा मॉडेल नंबर (SM-E625F/DS) दाखवण्यात आला आहे. Galaxy A-सीरीजच्या डिवाइस Galaxy A72 चा सपोर्ट पेज Samsung Carribbean आणि Latin America वेबसाइटवर लाइव झाला आहे. गेल्या आठवड्यात दुसऱ्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि सॅमसंगच्या रशियन वेबसाइट वर गॅलेक्सी A72 4G स्पॉट केला गेला होता. सॅमसंग गॅलेक्सी A52 4G चे पेज ऑस्ट्रियाच्या सॅमसंग वेबसाइटवर दिसला आहे.

हे देखील वाचा : रोबोट आणि माणसातला फरक सांगतो Captcha Code, जाणून घ्या का आणि कुठे झाली या टेक्नोलॉजीची सुरवात

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार Galaxy A52 आणि Galaxy A72 4G आणि 5G वेरिएंट मध्ये सादर केला जाईल. Galaxy A52 फोन 3C, FCC, Wi-Fi, Bluetooth आणि BIS सारखे सर्टिफिकेशन मिळाले आहेत.

गॅलेक्सी F12 आणि गॅलेक्सी F62 चा सेल

गॅलेक्सी F41 प्रमाणेच गॅलेक्सी F12 आणि गॅलेक्सी F62 पण फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव फोन असतील. अशी आशा आहे कि गॅलेक्सी F12 सारखा वेरियंट म्हणजे की गॅलेक्सी M12 अमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर विकला जाईल.

Samsung Galaxy F62 आणि F12 ची डिजाइन

91मोबाईल्सने या दोन्ही फोनच्या रियर पॅनलची लाइव इमेज एक्सक्लूसिवली शेयर केली होती. गॅलेक्सी एफ62 चा लुक पाहता हा स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्यासह येईल. फोनचा रियर कॅमेरा सेटअप पॅनलवर डावीकडे चौकोनी आकारात असेल. बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर दिसला नाही, त्यामुळे बोलले जात आहे कि पावर बटन मध्ये हा सेन्सर इम्बेडेड केला जाईल किंवा इन-डिस्प्ले सेंसर मध्ये हा दिला जाऊ शकतो. गॅलेक्सी एफ12 मध्ये बॅक पॅनलवर सर्कुलर कटआउटसह एक आयताकृती कॅमेरा मॉड्यूल असेल. बॉटमला यूएसबी टाइप-सी पोर्ट, स्पीकर ग्रिल आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक पण दिला जाऊ शकतो.

Galaxy F62 आणि Galaxy F12 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F62 काही दिवसांपूर्वी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला आहे. या लिस्टिंगनुसार गॅलेक्सी एफ62 मध्ये Samsung आपला Exynos 9825 चिपसेट देईल. डिवाइस मध्ये 6GB रॅम आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम दिली जाईल. दुसरीकडे गॅलेक्सी एफ12 मध्ये 6.5 इंचाचा एचडी + टीएफटी एलसीडी पॅनल, 6GB पर्यंत LPDDR4 रॅम आणि 128GB eMMC 5.1 स्टोरेज दिली जाऊ शकते. इतकेच नव्हे तर डिवाइस मध्ये कंपनीचा Exynos 850 SoC दिला जाऊ शकतो.

Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 ची डिजाइन

अलीकडेच समोर आलेल्या रेंडर्सनुसार गॅलेक्सी ए52 आणि गॅलेक्सी ए72 ची डिजाइन एक सारखी आहे. दोन्ही मध्ये फ्रंटला इनफिनिटी-ओ डिस्प्ले दिला जाईल. फोन्सच्या उजवीकडे पावर आणि वॉल्यूम बटन दिला जाईल. हँडसेट मध्ये बॉटमला टाइप-सी पोर्ट मिळेल. फोनच्या मागे रेक्टेंगुलर क्वाड कॅमेरा सेटअप असेल. सोबत सिक्यॉरिटीसाठी हँडसेट मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी A52 आणि गॅलेक्सी A72 चे स्पेसिफिकेशन

सर्व लीक्सनुसार Samsung Galaxy A52 मध्ये 6.5-इंचाचा एफएचडी + एएमओएलईडी डिस्प्ले आणि गॅलेक्सी ए72 मध्ये 6.7-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले असू शकतो. दोन्ही फोनच्या 5G वर्जन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 750G SoC आणि 4G वेरिएंट मध्ये स्नॅपड्रॅगॉन 720G असू शकतो. हँडसेट Android 11 OS OneUI 3.0 कस्टम स्किनसह सादर केले जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी A52 मध्ये 64MP प्राइमरी सेंसरसह मागे क्वाड-कॅमेरा असेल जो अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस, डेप्थ सेंसर आणि मॅक्रो यूनिटसह जोडा जाईल. गॅलेक्सी ए72 मध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 12-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेंस, 5-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असू शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here