Vivo T3 Ultra 24 जीबी पर्यंत रॅम, Dimensity 9200+ चिपसेटसह येईल, ब्रँडने केले भारतातील लाँच कंफर्म

विवो आपल्या टी 3 सीरीजचा विस्तार करत आहे, यानुसार ब्रँडद्वारे आता Vivo T3 Ultra स्मार्टफोनचे लाँच कंफर्म झाले आहे. हा या महिन्यात भारतीय बाजारात येईल. तसेच कंपनीची वेबसाईट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर याची मायक्रोसाईट लाईव्ह आहे. जिथे प्रमुख स्पेसिफिकेशन पाहायला मिळतील. चला, पुढे जाणून घेऊया फोनमध्ये कशी वैशिष्ट्ये मिळतील.

Vivo T3 Ultra चे स्पेसिफिकेशन (कंफर्म)

फ्लिपकार्ट आणि कंपनी वेबसाईटवर Vivo T3 Ultra स्मार्टफोनचे मायक्रो साईट लाईव्ह आहे. येथे आलेली सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे.

डिस्प्ले

ब्रँडने कंफर्म केले आहे की मोबाईलमध्ये 6.78 इंचाचा मोठा 3D कर्व 1.5के अ‍ॅमोलेड डिस्प्ले प्रदान केला जाईल. यावर युजर्सना 4500 पीक ब्राईटनेस, 2800 x 1260 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, P3 सिनेमा ग्रेड कलर गमट, 8000000:1 कॉन्ट्रॅक्ट रेश्यो आणि एचडीआर 10+ सारखे फिचर्स दिले जातील.

प्रोसेसर

विवो टी 3 अल्ट्रा मध्ये परफॉरमेंससाठी MediaTek Dimensity 9200+ SoC ची ऑफर केली जाईल. या 4nm चिपसेटमध्ये 17 बिलियन पेक्षा अधिक ट्रांजिस्टर आणि उन्नत APU फ्यूजन टेक्नॉलॉजी आहे जी बेजोड शक्ती आणि दक्षता प्रदान करते. तसेच मोबाईल चिपने AnTuTu प्लॅटफॉर्मवर 16,09,257 पेक्षा अधिक स्कोर केला आहे.

स्टोरेज आणि रॅम

कंपनीने पुष्टी केली आहे की मोबाईलमध्ये दमदार स्पीडसाठी 12 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळेल. त्याचबरोबर 12 जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजी पण दिली जाईल. ज्याच्या मदतीने युजर्सना एकूण 24 जीबी पर्यंतची पावर मिळेल.

कॅमेरा

Vivo T3 Ultra च्या रिअर कॅमेरा सेटअपमध्ये OIS आणि f/1.88 अपर्चर असलेला 50MP चा Sony IMX 921 प्रायमरी कॅमेरा व 8MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा असेल. या सेटअप कडे स्मार्ट ऑरा लाईट दिली जाईल. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात f/2.0 अपर्चर, ऑटोफोकस आणि AI फेशियल कलरिंग टेक्नॉलॉजी असलेला 50MP ग्रुप सेल्फी कॅमेरा असण्याची पुष्टी झाली आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

पावर बॅकअपसाठी कंपनी Vivo T3 Ultra मोबाईलमध्ये 5500mAh ची मोठी बॅटरी देणार आहे. ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी 80 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल. म्हणजे एकूण मिळून तुम्ही जास्त वेळाचा बॅकअप आणि फास्ट चार्जिंगची सुविधा मिळेल.

इतर

विवो आपल्या नवीन मोबाईल T3 Ultra ला IP68 डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंस टेक्नॉलॉजीसह आणत आहे. ज्याच्या मदतीने जर तुमचा डिव्हाईस 1.5 मीटर पर्यंत पाण्यामध्ये 30 मिनिटापर्यंत ठेवला जाईल.

शेवटी मध्ये तुम्हाला सांगतो की Vivo T3 Ultra चे हे सर्व स्पेसिफिकेशन कंफर्म आहेत यामुळे या महिन्यात लाँच केले जाईल. तसेच, कंपनीकडून लाँचची तारीख लवकर येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here