भारतीय टेलिकॉम इंडस्ट्री मध्ये वाढती प्रतिस्पर्धा पाहता सध्या कामोन्या नवनवीन प्लान्स लॉन्च करत आहेत. नवीन प्लानच्या मदतीने कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. या यादीत जियो, एयरटेल, वोडाफोन आइडिया आणि बीएसएनएल चा समावेश आहे. तर दुसरीकडे मोबाईल प्रीपेड यूजर्स बद्दल बोलायचे तर त्यांना कमी किंमतीत जास्त फायदा देणारे प्लान्सच आवडतात. त्यामुळे आज आम्ही टेलिकॉम क्षेत्रातील मोठ्या कंपनी एयरटेलच्या 100 रुपयांच्या आतील काही प्लान्स बद्दल बोलणार आहोत. या प्लान मध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह अजून अनेक फायदे दिले जात आहेत.
विशेष म्हणजे एयरटेलकडे असे अनेक प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत, ज्यात ग्राहकांना 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 28 दिवसांची वैधता मिळते. या यादीत कंपनीचे टॉप 3 प्लान्स आहेत, ज्यात 79 रुपये, 49 रुपये, 48 रुपये आणि 45 रुपयांच्या प्रीपेड प्लानचा समावेश आहे. या प्लॅन्सची खासियत अशी कि यूजर्सना एका महिन्याच्या वैधतेसह डेटा आणि कॉलिंगचा लाभ पण मिळतो.
एयरटेलचा 79 रुपयांचा प्लान
एयरटेलच्या 79 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर यात यूजर्सना 28 दिवसांची वैधता मिळत आहे. तसेच 79 रुपयांच्या स्मार्ट रिचार्ज मध्ये यूजर्सना 64 रुपये मिळतील आणि 200 MB डेटा पण दिला जात आहे.
एयरटेलचा 49 रुपयांचा प्लान
49 रुपयांच्या प्लानने रीचार्ज करण्यासाठी Airtel प्रीपेड यूजरला माय एयरटेल ऍप किंवा कंपनीच्या वेबसाइट वर जावे लागेल. हा पॅक डेटा सेक्शन मध्ये उपलब्ध आहे. 49 रुपयांच्या रीचार्ज पॅक मध्ये 100एमबी 4जी डेटा मिळेल. सोबतच ग्राहकांना 38.52 रुपयांचा टॉकटाइम दिला जाईल.
एयरटेलचा 48 रुपयांचा प्लान
28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लान मध्ये यूजर्सना कोणताही कॉलिंग लाभ मिळत नाही. पण यूजर्सना या प्लान मध्ये 3जीबी डेटा दिला जात आहे. या डेटाचा वापर संपूर्ण 28 दिवस किंवा एका दिवसात केला जाऊ शकतो.
एयरटेलचा 45 रुपयांचा प्लान
100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लान्सच्या यादीत हा एकमेव असा प्लान आहे जो फक्त 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लान मध्ये यूजर्सना कोणताही कॉलिंग आणि डेटाचा लाभ मिळत नाही. जर तुम्ही फक्त वैधतेसाठी एखाद्या प्लानचा शोध घेत असाल तर हा बेस्ट प्लान आहे.















