Jio च्या रस्त्यावर Airtel, 3GB डेटा आणि फ्री कॉलिंग असलेले प्लान आणले परत

टेलीकॉम कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी टॅरिफ मध्ये वाढ केल्यानंतर सब्सक्राइबर्सना वाईट वाटले होते. यादरम्यान रिलायंस जियोने आपले दोन जुने प्लान पुन्हा लिस्ट केले होते, ज्यामुळे जियो यूजर्सना थोडा दिलासा मिळाला होता. आता जियो प्रमाणे एयरटेल ने पण आपला एक जुना प्लान परत आणला आहे.

Airtel ने आपला 558 रुपयांचा प्लान परत आणला आहे, जो कंपनीने बंद केला होता. हा प्लान कंपनीने बंद करून 698 रुपयांचा प्लान सादर केला होता, ज्यात मिळणारे बेनिफिट्स कमी होते. एयरटेल यूजर्स साठी हि नवीन वर्षाची भेट म्हणता येईल, ज्यात त्यांना पुन्हा 558 रुपयांचा प्लान मिळेल.

जियो प्रमाणे जुना प्लान परत आणल्यानंतर एयरटेल ने पण आपल्या जुन्या 558 रुपयांच्या प्लानची वैधता कमी करून 56 दिवस केली आहे. या प्लान मध्ये आधी 82 दिवसांची वैधता दिली जात होती. चला या प्लान मध्ये मिळणारे फायदे पाहू.

558 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर या प्लान मध्ये यूजर्सना 56 दिवसांच्या वैधतेसह प्रतिदिन 3GB डेटा मिळेल. अनलिमिटेड कॉल सह प्रतिदिन 100SMS यूजर्सना मिळतील. कमी वैधता सोडली तर या प्लान मध्ये मिळणारे इतर सर्व बेनिफिट्स जुने आहेत.

फ्री कॉलिंग आणि डेटा व्यतिरिक्त या प्लान मध्ये यूजर्सना विंक म्यूजचा फ्री एक्सेस मिळेल, ज्यात यूजर्स अनलिमिटेड सॉन्ग डाउनलोड कर करू शकतील. तसेच Airtel Xstream App Premium, Zee5, HOOQ, 370+ लाइव टीवी चॅनेल आणि 10k+ मूवि सह अजून अनेक फायदे मिळतील. इतकेच नव्हे तर या प्लान मध्ये 100 रुपयांचा कॅशबॅक FASTag वर मिळेल जो 15 डिसेंबर पासून लागू झाला आहे.

Airtel ने काही दिवसांपूर्वी 56 दिवसांच्या वैधतेसह आपला नवीन प्लान सादर केला होता. हा प्लान कंपनीने 499 रुपयांमध्ये सादर केला होता. 558 रुपयांच्या प्लान प्रमाणे हा प्लान पण Airtel कंपनीने 56 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो जो प्रीपेड यूजर्स साठी आहे.

या प्लान अंतर्गत यूजर्सना रोज 2 जीबी 4G डेटा दिला जात आहे. म्हणजे संपूर्ण प्लानच्या वॅलिडिटी मध्ये एयरटेल ग्राहक एकूण 112 जीबी डेटा वापरू शकतील. त्याचबरोबर या प्लान मध्ये पण कंपनीकडून रोज 90 SMS पण दिले जातील आणि Airtel यूजर्स हेलो ट्यून्स, अनलिमिटेड विंक म्यूजिक तसेच एयरटेल एक्सट्रीम ऍपचा वापर करू शकतील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here