कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शनसह व्हॉट्सअ‍ॅप नंबर्सवर करा गॅस सिलेंडरची बुकिंग, जाणून घ्या प्रोसेस

गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे आता तुम्ही घर बसल्या मोबाइलवरून गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) ची बुकिंग करू शकता. सरकारी तेल कंपन्या ग्राहकांना घरगुती गॅस रिफिल करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आणि SMS ची सुविधा देत आहेत. भारतातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपन्या जसे की भारत गॅस (Bharat Gas Cylinder), इंडेन गॅस (Indane Gas Cylinder) आणि एचपी गॅस (HP Gas Cylinder) चे ग्राहक या सुविधेचा फायदा घेऊन सहज घर बसल्या सिलेंडर मागवू शकतात.

एलपीजी गॅस सिलेंडर बुक करण्याचे पाच पद्धती

 1. गॅस एजेंसी किंवा वितरकाला सांगून.
 2. मोबाइल नंबरवर कॉल करून
 3. वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन बुकिंग https://iocl.com/Products/Indanegas.aspx
 4. कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर मेसेज पाठवून
 5. कंपनीचं अ‍ॅप डाउनलोड करून

Bharat Gas च्या सिलेंडर बुकिंगसाठी

 • भारत गॅस (Bharat Gas) च्या बुकिंगसाठी तुमच्या मोबाइलमध्ये 1800224344 (Bharat Gas Whatsapp Booking number) नंबर तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह करावा लागेल.
 • त्यांनतर WhatsApp वर जाऊन सेव्ह केलेल्या भारत गॅस म्हणजे भारत पेट्रोलियम स्मार्ट लाइनचा नंबर ओपन करा.
 • त्यानंतर WhatsApp वर Hii, Hello लिहून पाठवा. त्वरित स्वागत मेसेजचा रिप्लाय येईल.
 • जेव्हा सिलेंडर बुक करायचा असेल तेव्हा तुम्ही व्हॉट्स अ‍ॅप वर Book लिहून पाठवा. म्हणजे तुम्हाला ऑर्डर डिटेल मिळेल आणि कधी सिलेंडर डिलिव्हर होईल याची माहिती देखील व्हॉट्सअ‍ॅपवर येईल.

हे देखील वाचा: पटकन संपतेय तुमच्या अँड्रॉइड फोनची बॅटरी? काही स्टेप्समध्ये चेक करा फोनची बॅटरी हेल्थ

इंडेन गॅस सिलेंडर बुकिंगची पद्धत

 • इंडेन गॅसचे ग्राहक 7588888824 (Indane Gas Whatsapp Booking number) नंबरवर बुकिंग करू शकतात.
 • सर्वप्रथम 7588888824 नंबर तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह करा.
 • त्यानंतर व्हॉट्स अ‍ॅप ओपन करा. सेव्ह केलेला नंबर उघडा आणि तुमच्या त्या रजिस्टर्ड नंबरवरून Book किंवा REFILL# लिहून पाठवा.
 • REFILL# पाठवताच ऑर्डर पूर्ण झाल्याचं कळवलं जाईल.
 • रिप्लायमध्ये सिलेंडर बुकिंगची डिलिव्हरी कधी होईल, याची तारीख लिहिली असेल.

HP च्या ग्राहकांसाठी सिलेंडर बुकिंग नंबर

 • एचपीच्या ग्राहकांनी 9222201122 (HP Gas Cylinder Whatsapp Booking number 9222201122 ) हा नंबर मोबाइलमध्ये सेव्ह करावा.
 • हा नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्स अ‍ॅप ओपन करा आणि सेव्ह केलेला नंबर ओपन करा.
 • सेव्ह केलेल्या एचपी गॅस सिलिंडरच्या नंबरवर Book लिहून पाठवा.
 • तुमच्या रजिस्टर्ड नंबरवरून एचपी गॅसच्या या नंबरवर Book लिहून पाठवताच व्हॉट्सअ‍ॅपवर आर्डर डिटेल येतील.
 • यात सिलेंडरच्या डिलिव्हरी डेटसह संपूर्ण माहिती असेल.

हे देखील वाचा: What is GB WhatsApp: जीबी व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे काय? वापरल्यामुळे डेटा जातो का चोरीला? कसं डाउनलोड करायचं? जाणून घ्या

रजिस्टर्ड नंबर आवश्यक

महत्वाची बाब म्हणजे तुम्ही फक्त त्या नंबरवरून गॅस सिलेंडरची बुकिंग करू शकता, जो नंबर तुमच्या ग्राहक क्रमांकासाठी एजेंसीमध्ये रजिस्टर्ड आहे. रजिस्टर्ड नंबरविना तुम्ही गॅस सिलेंडरची बुकिंग करू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here