Airtel चे 4 नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच

भारतातील प्रमुख मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी Airtel नं आज एकत्र चार नवीन प्लॅन (Airtel Recharge Plan) सादर केले आहेत. या प्लॅन्सची किंमत 109 रुपयांपासून सुरु होते. यातील दोन प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे, त्यामुळे रोज 4 रुपयांपेक्षा कमी किंमतीत ग्राहकांना डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स कंपनी देत आहे. या प्लॅन्सची सुरुवात 109 रुपयांच्या प्लॅनपासून होते, जो 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. तर 111 रुपयांच्या प्लॅनमध्ये मंथली व्हॅलिडिटी मिळते. कंपनीनं 128 आणि 131 रुपयांचे व्हाउचर प्लॅन देखील सादर केले आहेत.

Airtel चे चार नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन

  • एयरटेल 109 रुपयांचा प्लॅन
  • एयरटेल 111 रुपयांचा
  • प्लॅन एयरटेल 128 रुपयांचा प्लॅन
  • एयरटेल 131 रुपयांचा प्लॅन

Airtel Rs 109 Recharge Plan

एयरटेलच्या 109 रुपयांचा प्लॅन म्हणजे एक स्मार्ट पॅक आहे जो 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये युजर्सना 99 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. सोबतीला 200MB डेटा देखील कंपनीनं ग्राहकांना दिला आहे. तसेच रिचार्जमध्ये लोकल व एसटीडीवर कॉलिंगसाठी 2.5 पैसे प्रतिसेकंड द्यावे लागतील.

Airtel Rs 111 Recharge Plan

या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे 109 रुपयांच्या प्लॅन सारखेच आहेत. परंतु, या प्लॅनमध्ये युजर्सना 1 महिन्याची मंथली वैधता मिळते. म्हणजे ज्या तारखेला रिचार्ज केला जाईल, पुढील महिन्यात त्याच तारखेला तुम्हाला रिन्यू करावा लागेल. रिचार्ज प्लॅनमध्ये 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 200 एमबी डेटा मिळतो. तसेच, लोकल व एसटीडी कॉलिंगसाठी 2.5/सेकंड रेट आकारला जाईल.

Airtel Rs 128 Recharge Plan

128 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबाबत बोलायचे झाले तर यात कॉलिंगसाठी 2.5 पैसे प्रति सेकेंड दराने शुल्क आकारले जाईल. तसेच व्हिडीओ कॉलसाठी 5 पैसे प्रति सेकेंड आणि डेटा चार्ज 50 पैसे प्रति एमबीचा दर असेल. 1 रुपये लोकल व 1.5 रुपये एसटीडी मेसेजसाठी द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगसाठी वेगळ्या व्हाउचर रिचार्ज करावा लागेल.

Airtel Rs 131 Recharge Plan

एयरटेलच्या 131 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे बेनिफिट्स अगदी 128 रुपयांच्या प्लॅनसारखे आहेत. फरक फक्त इतकाच असेल की 128 रुपयांच्या रिचार्जमध्ये 30 दिवसांची वैधता मिळते. 131 रुपयांचा प्लॅनमध्ये 1 महिन्याची म्हणजे मंथली वैधता दिली जाते. यात देखील कॉलिंग आणि डेटासाठी वेगळा रिचार्ज करावा लागेल.

Airtel चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

एयरटेलकडे असलेला 99 रुपयांचा प्लॅन कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. एवढ्या कमी किंमतीत देखील या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा आणि वैधतेसह एसएमएसचा लाभ देखील घेता येतो. 99 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना 200 एमबी डेटा, 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 28 दिवसांची वैधता मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here