टेलीकॉम क्षेत्रात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी रिलायंसने जियो फाइबर यूजर्ससाठी नवीन ब्रॉडबॅंड प्लान लॉन्च केले होते. या प्लान मध्ये ग्राहकांना एक महिन्याची मोफत सेवा दिली जात आहे. तसेच मोबाईल प्लान्स प्रमाणे ब्रॉडबॅंड मध्ये वाढती स्पर्धा पाहून भारती एयरटेलने जियोला आव्हान देण्यासाठी नवीन ‘अनलिमिटेड’ ब्रॉडबॅंड प्लान्स लॉन्च केले आहेत. या नवीन प्लान सह एयरटेल जास्त स्पीड आणि अनलिमिटेड डेटा देत आहे.
Airtel Xstream Fiber च्या नवीन प्लान्सच्या किंमतीची सुरवात 499 रुपयांपासून होईल. कंपनीने एकूण 5 नवीन प्लान्स सादर केले आहेत. या नवीन प्लान मध्ये 1Gbps पर्यंतचा स्पीड दिला जात आहे. एवढेच नव्हे तर प्लान्स मध्ये अनलिमिटेड डेटा, एयरटेल एक्सट्रीम एंड्रायड 4K टीव्ही बॉक्स आणि अनेक पेड ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत सब्सक्रिप्शन दिले जात आहे.
एयरटेल एक्स्ट्रीम बंडल 7 सप्टेंबर पासून ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत. या प्लानचा फायदा एयरटेलच्या जुन्या ग्राहकांव्यतिरिक्त नवीन यूजर्सना पण मिळेल. एयरटेलच्या नवीन ब्रॉडबॅंड प्लानची किंमत- 499 रुपये, 799 रुपये, 999 रुपये, 1499 रुपये आणि 3999 रुपये आहे.
499 रुपये आणि 799 रुपयांचे प्लान
या दोन्ही प्लान्स मध्ये अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉल आणि एयरटेल एक्स्ट्रीम 4K टीव्ही बॉक्स मिळेल. 499 रुपयांच्या पॅक बद्दल बोलायचे झाले तर यात यूजर्सना 40Mbps इंटरनेट स्पीड मध्ये अनलिमिटेड डेटा मिळेल. तसेच 799 रुपयांच्या पॅक मध्ये 100Mbps स्पीडने डेटा वापरता येईल.
999 रुपये, 1499 आणि 3,999 रुपयांचे प्लान
999 रुपये, 1,499 रुपये आणि 3,999 रुपयांच्या एयरटेल ब्रॉडबॅंड प्लान सह Amazon Prime Video, Disney+ Hotstar आणि Zee5 सर्विस फ्री मिळेल. या ओटीटी ऍप्सच्या मदतीने 1000 पेक्षा जास्त चित्रपट आणि शोज लाभ घेता येईल. तसेच या पॅक्स पण अनलिमिटेड कॉल आणि डेटा दिला जात आहे.
व्यावसायिक वापरासाठी नाहीत हे प्लान्स
नवीन एयरटेल एक्स्ट्रीम फाइबर ब्रॉडबॅंड प्लान मध्ये अनलिमिटेड डेटा सह अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा मिळत आहे. पण हि सुविधा त्याच यूजर्सना दिली जाईल जे आपल्या कनेक्शन सह लँडलाईन फोनचा वापर करत आहेत.
एयरटेलच्या या नवीन ब्रॉडबॅंड प्लान्सचा वापर व्यासायिक वापरासाठी करता येणार नाही. तुम्ही एयरटेल ऍपच्या माध्यमातून नवीन प्लान्सचा रिचार्ज करू शकता. तसेच Airtel Xstream 4K Android बॉक्ससाठी ग्राहकांना 1,500 रुपये डिपॉझिट दयावे लागेल जे कनेक्शन बंद करताना परत दिले जातील. एयरटेलचे हे नवीन प्लान्स Jio Fiber प्लान्सना आव्हान देण्यासाठी तयार आहेत.