बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अशी ओळख असलेला Akshay Kumar आता मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. त्याने आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाची शूटींग सुरू केली आहे. मराठीतील दिग्गज अभिनेता व दिग्दर्शक Mahesh Manjrekar यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudle Saat) या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. त्याने महाराजांच्या लूकमधील एक व्हिडीओ देखील चित्रपटाच्या सेटवरून शेयर केला आहे.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी मराठी चित्रपटाचं लाँचिंग काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत झालं होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली होती की अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. त्यावेळी अक्षयचा महाराजांच्या वेशातील एक फोटोही शेयर करण्यात आला होता.
View this post on Instagram
आता अक्षयने एक फोटो आणि शॉर्ट व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम हॅन्डलवर अपलोड केला आहे, ज्यात तो शिवरायांच्या भूमिकेत दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अक्षयनं लिहलं आहे की, “आज मी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करत आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे भाग्य लाभलं आहे. त्यांच्या जीवनातून आणि माँ जिजाऊंच्या आशीर्वादानं प्रेरणा घेण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन!”
आज मराठी फ़िल्म ‘वेडात मराठे वीर दौड़ले सात’ की शूटिंग शुरू कर रहा हूँ जिसमें छत्रपति शिवाजी महाराज जी की भूमिका कर पाना मेरे लिये सौभाग्य है।मैं उनके जीवन से प्रेरणा लेकर और माँ जिजाऊ के आशीर्वाद से मेरा पूरा प्रयास करुंगा !
आशीर्वाद बनाए रखियेगा। pic.twitter.com/MC50jCdN8Z— Akshay Kumar (@akshaykumar) December 6, 2022
अक्षयनं शेयर केलेला व्हिडीओ लगेचच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्वतः अक्षयच्या फॅन्सना देखील बॉलिवूडचा खिलाडी शिवरायांच्या भूमिकेत आवडला नाही. ‘मी अक्षयचा खूप मोठा चाहता आहे पण मला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी योग्य नाही वाटत,’असंही एका युजरनं म्हटलंय. तर वेगानं चित्रपट शूट करून काम न संपवण्याचा सल्ला अनेकांनी दिला आहे. ‘म्हणजे तू आणखी एक सिनेमा 40 दिवसांत शूट करून खराब करणार,’ असं एका युजरनं म्हटलं आहे. ‘भावा, अॅक्टिंग चांगली कर. महिनाभरात सिनेमा पूर्ण करण्याचा विचारही करू नकोस,’ असा खोचक सल्ला देखील एका युजरनं अक्षयला दिला आहे.
तर अनेकांनी अक्षयची तुलना शरद केळकर सोबत केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकरच उत्तम, अशा अनेक कमेंट्स सोशल मीडियावर दिसत आहेत. ‘आमच्या राजांचा अपमान करू नका. अक्षय कुमार तुम्ही आमच्या दैवताच्या भूमिकेत शोभत नाही,’ असं देखील एका युजरनं लिहिलं आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बल्ब होते का? थोडा रिसर्च करा’, असं लिहून युजर्सनी चित्रपटातील चुका दाखवल्या आहेत. या चित्रपटाचं शूटिंग 6 डिसेंबर 2022 ला सुरु करण्यात आलं आहे आणि पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहांच्या माध्यमातून येईल.














