Amazon Great Freedom Festival Sale: या स्मार्टफोन्सवर मिळत आहे बंपर डील, पाहा इथे

तुम्ही स्मार्टफोन विकत घेण्याच्या विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी योग्य संधी आली आहे. अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल (Amazon Great Freedom Festival Sale) लाइव्ह झाला आहे. ह्या सेलमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा स्मार्टफोन डिस्काउंटसह विकत घेऊ शकता. तसेच जर तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रँजॅक्शन केलं तर अ‍ॅमेझॉनवर 10 टक्के इन्स्टंट सूट देखील मिळत आहे. ह्या ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल दरम्यान कोणत्या स्मार्टफोनवर किती सूट मिळत आहे, ह्याची आम्ही एक यादी तयार केली आहे, जी तुम्ही पुढे पाहू शकता…

iPhone 14

अ‍ॅमेझॉनवर ह्या सेल दरम्यान iPhone 14 देखील आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे. ह्या फ्लॅगशिप फोनमध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे आणि हा A15 बायोनिक चिपवर चालतो. ह्यात फोटोग्राफीसाठी 12MP अ‍ॅडव्हान्स ड्युअल कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे, जी फोटोनिक इंजिनचा वापर करून चांगले शॉट्स देते. तसेच iPhone 14 मध्ये स्मूद आणि शेक-फ्री व्हिडीओ कॅप्चर करण्यासाठी अ‍ॅक्शन मोड देखील मिळतो. एकदा फोन चार्ज केल्यावर 20 तासांपर्यंत सतत व्हिडीओ प्लेबॅक करू शकतो. iPhone 14 ला 5G नेटवर्क सपोर्ट देखील मिळतो.

सेलिंग प्राइस : 71,999 रुपये

डील प्राइस : 65,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Motorola Razr 40

जर तुम्ही फ्लिप फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर मोटोरोला रेजर 40 देखील सेल दरम्यान डिस्काउंटसह विकत घेता येईल. ह्यात 6.9-इंचाचा FHD+ pOLED डिस्प्ले आणि 1.5-इंचाचा एक्सटर्नल OLED डिस्प्ले आहे. ह्यात 64MP OIS प्रायमरी कॅमेरा आणि 32MP चा सेल्फी कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये 4,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W टर्बोपावरसह येते. ह्या डिवाइसमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 प्रोसेसरचा वापर केला गेला आहे, जो डेली टास्क दरम्यान चांगली परफॉर्मन्स देतो.

सेलिंग प्राइस : 59,999 रुपये

डील प्राइस : 54,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Redmi 12 5G

हा बजेट 5जी फोन अलीकडेच लाँच करण्यात आला आहे. कंपनी ह्या शानदार स्मार्टफोनवर सुरु असलेल्या सेलमध्ये आकर्षक ऑफर देत आहे. फोन 6.79-इंचाच्या FHD+ डिस्प्लेसह येतो. ह्यात तुम्हाला आकर्षक क्रिस्टल ग्लास डिजाइन मिळते. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 प्रोसेसरवर चालतो, जो 5G नेटवर्क सपोर्टसह येतो. ह्यात 50MP AI कॅमेरा, IP53 रेटिंग आणि 5,000mAh ची मोठी बॅटरी देखील मिळते.

सेलिंग प्राइस : 15,999 रुपये

डील प्राइस : 10,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Samsung Galaxy M13

सॅमसंग गॅलेक्सी एम13 बजेट फोन देखील सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. Samsung Galaxy M13 6.6-इंचाच्या FHD+ डिस्प्लेसह येतो. ह्यात 50MP AI ट्रिपल कॅमेरा आणि 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. तसेच ह्यात 6,000mAh ची मोठी बॅटरी मिळते. हा डिवाइस अँड्रॉइड 12 आधारित कस्टम वन युआय कोर 4 वर चालतो. ह्या फोनमध्ये कंपनीनं Exynos 850 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.

सेलिंग प्राइस : 10,999 रुपये

डील प्राइस : 9,649 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Realme narzo N53

रियलमी नारजो एन 53 (Realme narzo N53) बजेट स्मार्टफोन आहे, जो अ‍ॅमेझॉन सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. फोनमध्ये 6.74-इंचाच्या डिस्प्लेसह 90Hz रिफ्रेश रेट आहे. ह्यात हाय-रिजॉल्यूशन शॉट्ससाठी 50MP AI कॅमेरा मिळतो. Realme narzo N53 मध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. फोनमध्ये Unisoc T612 प्रोसेसर आहे. आकर्षक लुकसाठी narzo N53 मध्ये फेदर गोल्ड डिजाइन देण्यात आली आहे.

सेलिंग प्राइस : 9,099 रुपये

डील प्राइस : 8,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Redmi A2

रेडमी ए2 फोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, जो 120Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. ह्यात तुम्हाला लेदर टेक्स्चर फिनिश डिजाइन मिळते, जी फोनला प्रीमियम लुक आणि चांगली ग्रिप देते. ह्यात 2+1 कार्ड स्लॉट आहे. Redmi A2 लॅग-फ्री परफॉर्मन्स देण्यासाठी मीडियाटेक हीलियो G36 प्रोसेसरचा वापर करतो. ह्यात चांगल्या सॉफ्टवेयर एक्सपीरियंससाठी अँड्रॉइड गो व्हर्जन देण्यात आला आहे.

सेलिंग प्राइस : 6,299 रुपये

डील प्राइस : 5,699 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Samsung Galaxy A34 5G

सॅमसंग गॅलेक्सी A34 5G मध्ये 6.6-इंचाचा FHD+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. फोनमध्ये तुम्हाला 5,000mAh ची बॅटरी मिळते, जी एकदा चार्ज केल्यावर दोन दिवसांपेक्षा जास्त बॅटरी लाइफ देऊ शकते. प्रीमियम फोटोग्राफीसाठी ह्यात 48MP(OIS) +8MP + 5MP ट्रिपल नाइटोग्राफी कॅमेरा आहे. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 1080 वर चालतो.

सेलिंग प्राइस : 30,999 रुपये

डील प्राइस : 26,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

realme narzo 60 5G

Realme narzo 60 5G मध्ये स्पोर्ट्स प्रीमियम लेदर डिजाइन आहे. हा फोन 6.43-इंच सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. विशेष म्हणजे हा फोन TÜV रीनलँड लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनसह येतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. फास्ट अनलॉकिंगसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील मिळतो. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

सेलिंग प्राइस : 19,999 रुपये

डील प्राइस : 16,999 रुपये (बँक सूट आणि कुपनसह)

iQOO Neo 7 Pro 5G

iQOO Neo 7 Pro 5G पावरफुल डिवाइस आहे. सेल दरम्यान ह्या फोनवर देखील सूट मिळत आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 SoC चा वापर करण्यात आला आहे. तसेच, ह्यात 5,000mAh ची बॅटरी आणि 120W फ्लॅशचार्जर आहे. प्रीमियम गेमिंग एक्सपीरियंससाठी iQOO Neo 7 Pro 5G मध्ये 3D कूलिंग सिस्टम, अल्ट्रा गेम मोड आणि मोशन कंट्रोल देखील मिळतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये फ्लॅगशिप 50MP GN5 OIS सेन्सर आहे.

सेलिंग प्राइस : 33,999 रुपये

डील प्राइस : 32,499 रुपये (बँक सूट आणि कुपनसह)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here