5000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला पंच-होल डिस्प्ले असलेला नवीन Vivo Z5x

Vivo ने गेल्यावर्षी आपल्या ‘झेड सीरीज’ अंतर्गत Vivo Z5x स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोन वीवोचा पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन बनला होता. वीवो झेड5एक्स च्या यशाची पुनरावृत्ती करत वीवोने या फोनचे नवीन वर्जन पण बाजारात आणले आहे. कंपनीने नवीन Vivo Z5x चीन मध्ये लॉन्च केला आहे. हा फोन लुकच्या बाबतीत जुन्या वर्जन सारखा आहे कि पण वीवोने आपला फोन आधीपेक्षा जास्त ताकदवान केला आहे. हा फोन इंडियन करंसीनुसार जवळपास 11,500 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल.

लुक आणि डिजाईन

Vivo Z5x पंच-होल डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन बेजल लेस डिस्प्ले वर बनलेला आहे ज्याच्या कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या डावीकडे छोटासा होल देण्यात आला आहे आणि या होल मध्ये सेल्फी कॅमेरा आहे. फोनचे डायमेंशन 162.39 x 77.33 x 8.85एमएम तसेच वजन 204.1ग्राम आहे.

वीवो झेड5एक्स ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे वर्टिकल शेप मध्ये आहेत. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट पण आहे. Vivo Z5x च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे व डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. हा फोन Phantom Black, Aurora आणि Symphony कलर मध्ये लॉन्च केला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Vivo Z5x कंपनी द्वारे 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53-इंचाच्या आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित आहे जो फनटच ओएस 9 यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट आहे.

वीवोने Vivo Z5x दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिंएट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट्स मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Vivo Z5x स्मार्टफोन LPDDR4x RAM आणि UFS 2.1 storage टेक्नॉलॉजी सह येतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Z5x ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.78 अपर्चर असलेला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo Z5x एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी वीवो झेड5एक्स मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

Vivo Z5x चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 1398 युआन (जवळपास 14,900 रुपये) तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 1598 युआन (जवळपास 17,000 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे. चीन मध्ये चालू असलेल्या शॉपिंग फेस्टिवल मध्ये हा फोन जवळपास 11,700 रुपये आणि 12,700 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here