Amazon Great Freedom Festival Sale: आज रात्री 12 वाजल्यापासून मिळतील भरघोस ऑफर्स, जाणून घ्या डिटेल्स

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन इंडिया (Amazon India) वर भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पेशल Amazon Great Freedom Festival Sale 2022 सुरु होणार आहे. अ‍ॅमेझॉनवर हा सेल 6 ऑगस्टला सुरु होईल आणि 10 ऑगस्टला याची सांगता होईल. परंतु अ‍ॅमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी हा सेल आज रात्री 12 वाजल्यापासून सुरु होईल. जर तुम्ही अ‍ॅमेझॉनवर गेल्या महिन्यात आयोजित सेलमधील ऑफर्स आणि डिस्काउंटचा फायदा घेतला नसेल तर हा सेल तुमच्यासाठी बेस्ट ऑफर्स घेऊन आला आहे. अ‍ॅमेझॉनवर आज रात्रीपासून सुरु होणाऱ्या अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल 2022 मध्ये लॅपटॉप, स्मार्टफोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर मिळणाऱ्या दमदार डिस्काउंटची माहिती आम्ही देत आहोत.

Amazon Great Freedom Festival सेल ऑफर्स

अ‍ॅमेझॉनवर सुरु होणाऱ्या Amazon Great Freedom Festival सेल दरम्यान SBI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंट मिळेल. बँक डिस्काउंटसह अ‍ॅमेझॉनवर सेलमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर डिस्काउंट मिळत आहेत. त्याचबरोबर अ‍ॅमेझॉनवर सेल दरम्यान रोज रात्री 8 वाजता लिमिटेड पीरियड डील देखील मिळणार आहे.

Amazon Great Freedom Festival Sale: तारीख आणि वेळ

Amazon Great Freedom Festival Sale 2022 प्राईम मेंबरसाठी आज रात्री 12 वाजल्यापासून सुरु होईल. अ‍ॅमेझॉनवर रेगुलर युजर्ससाठी हा सेल 6 ऑगस्टला रात्री 12 वाजल्यापासून सुरु होईल आणि 10 ऑगस्ट पर्यंत सुरु राहील. जर तुमच्याकडे अ‍ॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन असेल तर तुम्ही या सेलमधील डिस्काउंटचा फायदा आज रात्री 12 वाजल्यापासूनच घेऊ शकता.

Amazon Great Freedom Festival Sale: बेस्ट ऑफर्स

अ‍ॅमेझॉन इंडियावर ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेलमध्ये युजर्ससाठी अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट दिले जातील. सेल सुरु होण्याआधीच अ‍ॅमेझॉनवर ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेलसाठी लँडिंग पेज लाईव्ह करण्यात आलं आहे. या लँडिंग पेजनुसार अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये स्मार्टफोन आणि अ‍ॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. तरी जाऊन सेलमधील मिलरण्या डील्स पूर्णपणे समोर आल्या नाहीत. अ‍ॅमेझॉननुसार सेल दरम्यान हेडफोनवर 75 टक्के डिस्काउंट, लॅपटॉपवर 40 टक्के आणि टॅबलेटवर 45 टक्के डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर होम अप्लायन्सेजवर 60 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल.

  • स्मार्टफोनवर 40 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट
  • लॅपटॉपवर 40 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट
  • इलेक्ट्रॉनिक्सवर 75 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट
  • बेडरूम, लीविंगरुम, डायनिंग आणि स्टोरेज आयटम्सवर 54 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट
  • सोनी, मार्शल, बॉश आणि अन्य प्रीमियम ऑडियो ब्रँडवर 21 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट

अ‍ॅमेझॉनवर होणाऱ्या सेलबद्दल दूसरी महत्वाची बाब म्हणजे सेलमध्ये एक्सचेंज बोनसचा देखील फायदा मिळेल. जर तुम्ही जुना मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही नवीन प्रोडक्टसह एक्सचेंज केला तर तुम्हाला एक्सचेंज बोनसचा देखील लाभ मिळेल. अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेलमध्ये होम आणि किचन प्रोडक्ट, स्मार्टवॉच आणि इतर आयटम्सवर अर्ली ऑफर लाईव्ह झाल्या आहेत. जर तुम्ही नवीन ऑडियो प्रोडक्ट विकत घेण्याची योजना बनवत असाल तर हा सेल तुमच्यासाठी बेस्ट डील्स ऑफर करेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here