Amazon Great Indian Festival Sale: शानदार स्मार्टवॉच डिस्काउंटसह उपलब्ध, पाहा बेस्ट डिल्स

Amazon Great Indian Festival: घड्याळ तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो आणि टेक व फिटनेस प्रेमींसाठी स्मार्टवॉच आदर्श ठरतात. हे वॉच वेगवेगळ्या प्रकारे आपलं आयुष्य सोपं करतात. फोन नोटिफिकेशन तर बघता येतात आणि त्यांना रिप्लाय देखील देता येतो, तेही खिशातून फोन न काढता. हे तुमच्या फिटनेस आणि आरोग्याचा ट्रॅक ठेवतात. इतकेच नव्हे तर मनगटावरून तुम्ही कॉल देखील करता येतात. Amazon Great Indian Festival सेलमध्ये असे अनेक स्मार्टवॉच डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. पुढे आम्ही सर्व प्राइस रेंज मधील बेस्ट डिल्सची माहिती दिली आहे.

boAt Wave Call

नावातून समजले असेल की boAt Wave Call हे किफायतशीर स्मार्टवॉच आहे ज्यात तुम्हाला कॉल घेता येतात. यात व्हर्च्युअल डायल पॅड असल्यामुळे तुम्ही यातून कॉल देखील करू शकता. तुमची यात क्विक कॉलिंगसाठी 10 कॉन्टॅक्ट्स सेव्ह करू शकता. याव्यतिरिक्त या वॉचमध्ये हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंग सामान्य फिटनेस ट्रॅकिंग सेन्सर्स मिळतात. हे फिचर पॅक स्मार्टवॉच ग्रेट इंडियन सेलमध्ये 1,699 रुपयांमध्ये विकलं जात आहे, ज्याची मूळ किंमत 7,990 रुपये आहे.

प्राइस: 7,990 रुपये
डील प्राइस: 1,699 रुपये

Apple Watch SE

iPhone युजर्ससाठी कंपनीच्या स्मार्टवॉचचा किफायतशीर व्हर्जन Apple Watch SE म्हणून उपलब्ध आहे, ज्यात सगळे बेसिक फिचर आहेत. हे वॉच अनेक वर्कआऊट आणि अ‍ॅक्टिव्हिटी अचूकरीत्या ट्रॅक करतं. तसेच तुमचा हार्ट रेट आणि झोप ट्रॅक करून डीटेल्ड हेल्थ अ‍ॅनॅलिटीक्स देतं. यातून तुम्ही तुमचे कॉल्स घेऊ शकता, मेसेज पाठवू शकता, म्युजिक कंट्रोल करू शकता आणि खूप काही फीचर्स मिळतात. या स्मार्टवॉचचं सेल्युलर व्हर्जन अ‍ॅमेझॉनवर 23,900 रुपयांमध्ये विकलं जात आहे, परंतु एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही ही किंमत 22,400 रुपयांपर्यंत कमी करू शकता.

प्राइस: 33,900 रुपये
डील प्राइस: 22,400 रुपये

Noise ColorFit Pulse

Noise ColorFit Pulse स्टायलिश दिसतं आणि कम्फर्टेबल आहे. परंतु याची सर्वात भारी खासियत म्हणजे यात 10 दिवसाची बॅटरी लाइफ मिळते, ज्यामुळे रोज रात्री चार्जिंग लावण्याचं झंझट राहत नाही. हे डिवाइस स्लिप पॅटर्न्ससह SpO2 आणि हार्ट रेट लेव्हल्स मॉनिटर करू शकतं. यात 1.4-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे जी ब्राइट आणि ठळक व्हिज्युअल्स देते. तुम्ही 60 वॉच फेसेसच्या मदतीनं हे वॉच कस्टमायज करू शकता. सेल दरम्यान Noise ColorFit Pulse तुम्ही 1,499 रुपयांमध्ये घरी आणू शकता.

प्राइस: 4,999 रुपये
डील प्राइस: 1,499 रुपये

Amazfit GTS2 Mini

Amazfit GTS2 Mini वर एक जबरदस्त डील ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये दिली जात आहे. हे वॉच तुम्ही आता फक्त 4,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या किंमतीती तुम्हाला 1.55-इंचाची अल्वेज ऑन AMOLED स्क्रीन मिळतेय. या स्मार्टवॉचचं वजन फक्त 19.5 ग्रॅम्स आहेत आणि याची जाडी फक्त 8.95 एमएम आहे. या वॉचची बॅटरी लाइफ 14 दिवस आहे, असा दावा कंपनीनं केला आहे. यात फिटनेस ट्रॅकिंगसाठी 68 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत, तसेच यात फिमेल सायकल ट्रॅकिंग, स्लिप क्वॉलिटी मॉनिटरिंग, स्ट्रेस लेव्हल मॉनिटरिंग आणि ब्लूटूथ म्युजिक कंट्रोल फिचर मिळतात.

प्राइस: 7,999 रुपये

डील प्राइस: 4,499 रुपये

Fire-Boltt Phoenix

जर तुम्ही खिशाला परवडणारं वर्तुळाकार स्मार्टवॉच शोधत असाल तर Fire-Boltt Phoenix तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. हे फिचर पॅक वॉच तुम्ही फक्त 1,899 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन सेलमुळे खरेदी करू शकता. यात 1.3-इंचाचा डिस्प्ले 240 x 240 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. IP67 रेटिंगमुळे धूळ आणि पाण्यापासून याचा बचाव होतो. Fire-Boltt Phoenix मध्ये हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंग फिचर तर आहेच तसेच याचं अ‍ॅप तुम्हाला श्वासांवर नियंत्रण मिळवण्यास मदत करतं. यातील ब्लूटूथ कॉलिंग फिचरचा आम्ही उल्लेख केला का?

प्राइस: 9,999 रुपये
डील प्राइस: 1,899 रुपये

Fitbit Versa 2

Fitbit स्मार्टवॉचमध्ये उच्च दर्जाची फिटनेस ट्रॅकिंग मिळते आणि Versa 2 मध्ये यासह अनेक अतिरिक फीचर्स मिळतात. त्यामुळे या स्मार्टवॉचची 11,999 ही नवीन किंमत खूप आकर्षक वाटते, हे वॉच फक्त 10,749 रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी तुम्हाला SBI क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल. Versa 2 स्मार्टवॉच बिल्ट इन Alexa सपोर्टसह येतो त्यामुळे फक्त आवाजाने न्यूज आणि हवामान इत्यादी माहिती मिळवता येते, तसेच अलार्म सेट करणं स्मार्ट डिवाइस नियंत्रित करणं अशी कामे देखील आदेश देऊन करता येतात. या वॉचमध्ये अल्वेज ऑन डिस्प्ले आणि 5 दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळते, तसेच यात अन्य स्मार्टवॉच प्रमाणे सर्व फीचर्स आहेत.

प्राइस: 14,999 रुपये
डील प्राइस: 10,749 रुपये

Fire-Boltt Ninja 3

Fire-Boltt Ninja 3 हे अजून एक बजेट स्मार्टवॉच आहे जे अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये आणखी किफायतशीर झालं आहे. हे तुम्ही फक्त 1,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या डिवाइसमध्ये 1.69 इंचाचा डिस्प्ले आहे जो 100 वॉच फेसेसच्या मदतीनं कस्टमाइज करता येतो. यात 7 दिवसांची शानदार बॅटरी लाइफ मिळते. हे वॉच IP68 सर्टिफिकेशनसह येतं, त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी न करता सहज स्विमिंग पूलमध्ये उडी घेऊ शकता. अन्य स्मार्टवॉच प्रमाणे SpO2 आणि हार्ट रेट ट्रॅकिंग सारखे फिचर मिळतात.

प्राइस: 9,999 रुपये
डील प्राइस: 1,499 रुपये

Noise ColorFit Ultra 2

Noise ColorFit Ultra 2 स्मार्टवॉच त्या लोकांसाठी आहे ज्यांना मोठा डिस्प्ले हवा आहे. यात 1.78-इंचाचा अल्वेज ऑन AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो ब्राइट आणि ठळक आहे. सिंगल चार्जवर हे स्मार्टवॉच सलग 7 दिवस वापरता येईल इतकी बॅटरी यात मिळते. यातील Noise Health Suite मुळे 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड अ‍ॅक्सेस करता येतात. हे स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंग, कॉल मॅनेज, रिसेन्ट कॉल लॉग डायलिंग आणि तुमचे आवडीचे कॉन्टॅक्टस मनगटावरून अ‍ॅक्सेस करण्यास मदत करतं. कस्टमायजेशनसाठी 100 वॉच फेसेस मिळतात. हे स्मार्टवॉच सध्या फक्त 2,799 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल.

प्राइस: 6,999 रुपये
डील प्राइस: 2,799 रुपये

boAt Xtend

boAt कंपनीच्या पोर्टफोलियोमधील हे ऑल राऊंड स्मार्टवॉच आहे. हे तुमचं हार्ट रेट आणि SpO2 लेव्हल्स मॉनिटर करतं. तसेच यात चांगल्या अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकिंगसाठी 14 स्पोर्ट्स आणि स्ट्रेस मॉनिटरिंगसारखे फिचर मिळतात. यात 1.69-इंचाचा डिस्प्ले कॉम्पॅक्ट बॉडीसह देण्यात आला आहे. यातील 5 ATM रेटिंगमुळे हे घड्याळ 50 मीटर्स पाण्याखाली 30 मिनिट्स वापरता येतं. तुम्हाला यातून 7 दिवसांची बॅटरी लाइफ मिळू शकते. या स्मार्टवॉचची किंमत अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये फक्त 2,099 रुपयांमध्ये उपलब्ध झालं आहे.

प्राइस: 7,990 रुपये
डील प्राइस: 2,099 रुपये

boAt Wave Lite

boAt Wave Lite मध्ये 1.69-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे जो जबरदस्त 550 नीट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो, त्यामुळे आऊटडोर वर्क करणं सोपं होतं. IP68 रेटिंगमुळे काळजी न करता स्विमिंगचा आनंद घेता येईल. हे स्लिम डिवाइस खूप हलकं आहे, त्यामुळे मनगटावर हे आहे की नाही हे जाणवत देखील नाही. हार्ट रेट मॉनिटरिंग आणि SpO2 ट्रॅकिंग देखील यात उपलब्ध आहेत. तसेच 140 वॉच फेसेस आणि 7 दिवसांची बॅटरी लाइफ मिळते. या सेल दरम्यान boAt Wave Lite ची किंमत फक्त 1,199 रुपये आहे.

प्राइस: 6,990 रुपये
डील प्राइस: 1,199 रुपये

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here