गूगल करणार आहे मोठा धमाका, ऑलस्क्रीन फोनची करत आहे तयारी नवीन पेटेंट वरून मिळाली माहिती

एखाद्या स्मार्टफोन फॅनला विचारले की सर्वात बेस्ट कॅमेरा फोन कोणता तर नक्कीच अनेकजण उत्तर ‘गूगल पिक्सल’ असेल. फक्त यूजर नव्हे तर टेक विश्वाने पण गूगल पिक्सलला बेस्ट कॅमेरा फोन म्हणून मान्यता दिली आहे. दमदार स्पेसिफिकेशन्स आणि शानदार लुक व फीचर्स असलेले पिक्सल फोन आणणारी गूगल आता पुन्हा एकदा हवा करणार आहे. गूगल ने नवीन पिक्सल फोन साठी पेटेंट फाईल केले आहे. या पेटेंट मध्ये नवीन पिक्सलची डिजाईन पण समोर आली आहे जी आत्तापर्यंत लॉन्च झालेल्या पिक्सल स्मार्टफोन्स पेक्षा जास्त वेगळी आणि चांगली आहे.

गूगल पिक्सल सीरीजच्या या नवीन फोनला पिक्सल 4 नाव देण्यात आले आहे. गूगल ने नवीन पिक्सल डब्ल्यूआईपीओ (वर्ल्ड इंटलेक्चुअल प्रोपर्टी आर्गनाइजेशन) वर सब्मिट केला आहे. वेबसाइट वर नवीन गूगल पिक्सल चे स्केच फोटो पण दाखवण्यात आले आहेत ज्यात फोनच्या फ्रंट व बॅक पॅनल सोबत सर्व साईड पॅनल तसेच टॉप व बॉटम पॅनल पण दाखविण्यात आले आहेत. सर्वात आधी फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर हा बघून म्हणू शकतो की गूगल कंपनी पिक्सल 3 मध्ये नॉच दिल्या नंतर आता डिस्प्ले अजून एडवांस करणार आहे.

पिक्सल फोनच्या फ्रंट पॅनल फुल डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन किंवा नॉच नाही. फ्रंट पॅनल वर कोणतेही एज नाही. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला नॉच किंवा कोणताही सेंसर दिसत नाही. नॉच नसल्यामुळे पिक्सल फोन मध्ये सेल्फी कॅमेरा पण फ्रंट पॅनल वर दिला जाणार नाही. हा डिस्प्ले पाहता बोलले जात आहे कि कदाचित गूगल आपला आगामी पिक्सल फोन स्लाईडर पॅनल सह लॉन्च करू शकते.

गूगलच्या नवीन पिक्सलचा बॅक पॅनल वर कंपनीच्या आधीच्या स्मार्टफोन्स प्रमाणे देण्यात आला आहे. बॅक पॅनल वर वरच्या बाजूला सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा सेंसरच्या उजव्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. पिक्सल च्या बॅक पॅनल वरच मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. नवीन पिक्सलची साईड एज वाली आहे. फोनकच्या उजव्या पॅनल वर पावर बटन आणि वाल्यूम रॉकर आहे. तसेच फोनच्या डावीकडे पॅनल वर सिम ट्रे दिसत आहे.

नवीन पिक्सल मध्ये खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. या फोन मध्ये 3.5एमएम जॅक असेल कि नाही हे समोर आलेल्या फोटो वरून समजलेले नाही. विशेष म्हणजे समोर आलेल्या फोटो मध्ये फोनची साईज मोठी दाखवण्यात आली आहे. आशा केली जाऊ शकते कि गूगलचा हा फोन 6 इंचाच्या स्क्रीन सह लॉन्च होईल. फोन मध्ये स्लाईडर पॅनल दिदिला जाईल कि नाही आणि फोनचा सेल्फी कुठे असेल हे आता सांगता येत नाही.

गूगल कधी आपला हा नवीन पेटेंट कधी सार्वजनिक करेल आणि हा नवीन पिक्सल फोन कोणत्या नावाने टेक मंचावर येईल. या माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत घोषणा व विश्वसनीय सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here