फेस्टिवल सीजन दरम्यान अॅमेझॉन इंडियावर अनेक कॅटेगरीच्या प्रॉडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल नंतर आता अॅमेझॉनवर दिवाळीच्या निमित्ताने Amazon Happiness Upgrade Days Sale सुरु झाला आहे. अॅमेझॉन हॅप्पीनेस अपग्रेड डेज सेल 4 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. या सेलमध्ये एकापेक्षा एक दमदार ऑफर दिल्या जात आहेत. इथे आम्ही तुम्हाला सेल दरम्यान मिळणाऱ्या बेस्ट डील्सची माहिती देत आहोत. त्याचबरोबर हॅप्पीनेस अपग्रेड सेलसाठी अॅमेझॉननं सिटीबँक, वनकार्ड, आरबीएल बँक आणि रुपेसह पार्टनरशिप केली आहे. वनकार्डनं पेमेंट केल्यास युजर्सना 10 टक्के डिस्काउंट मिळेल. इथे आम्ही तुम्हाला अॅमेझॉन हॅप्पीनेस अपग्रेड डेज सेलबाबत सविस्तर माहिती देत आहोत.
Amazon Happiness Upgrade Days Sale: स्मार्टफोन डील्स
Amazon Happiness Upgrade Days Sale च्या निमित्ताने स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याची योजना बनवत असाल तर ही योग्य वेळ आहे. अॅमेझॉनवर सध्या स्मार्टफोनवर 40 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. अॅमेझॉनवर Xiaomi, iQOO, realme, आणि दुसऱ्या ब्रँडच्या स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. सेल दरम्यान बजेट 5G स्मार्टफोन realme narzo 50 5G स्वस्तात विकत घेता येईल. तसेच फीचरपॅक ऑलराउंडर iQOO 9 5G देखील मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहेत.
त्याचबरोबर Xiaomi 12 Pro 5G स्मार्टफोन जो कंपनीचा भारतातील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे बँक डिस्काउंटसह स्वस्तात विकत घेता येईल. साधारणतः शाओमीचा हा स्मार्टफोन 62,999 रुपयांमध्ये विकला जातो.
Amazon Happiness Upgrade Days Sale: लॅपटॉप डील्स
Amazon Happiness Upgrade Days Sale दरम्यान लॅपटॉपवर देखील मोठा डिस्काउंट मिळत आहे. अॅमेझॉनवर फेस्टिवल सीजन सेल दरम्यान 75 टक्क्यांपर्यंतची सूट दिली जात आहे. सेल दरम्यान 11th Gen Intel Core i3-1115G4-पावर्ड HP 15s लॅपटॉप 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, जो ऑफ सेलमध्ये 42,999 रुपयांमध्ये विकला जातो. त्याचबरोबर 12th Gen Intel Core i5 HP लॅपटॉप अॅमेझॉन सेल दरम्यान 55,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, इतर वेळी याची विक्री 57,999 रुपयांमध्ये केली जाते.
Amazon Happiness Upgrade Days Sale: हेडफोन डील्स
Amazon Happiness Upgrade Days Sale दरम्यान सोनी, बोट आणि अन्य कंपनीच्या इयरफोन्सवर 75 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. boAt Airdopes 141 TWS इयरबड्स सध्या फक्त 949 रुपयांमध्ये विकत घेता येतील. साधारणतः बोटचे हे इयरबड्स 1,499 रुपयांमध्ये विकले जातात. त्याचबरोबर 24,990 रुपयांचे Sony WH-1000XM4 हेडफोन सध्या फक्त 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येतील.
Amazon Happiness Upgrade Days Sale: वियरेबल डील्स
अॅमेझॉनवर सुरु असलेल्या हॅप्पीनेस अपग्रेड डेज सेल दरम्यान फिटनेस ट्रॅकर आणि स्मार्टवॉचवर देखील 75 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. सेल दरम्यान 1st Gen Apple Watch SE ची किंमत 30,900 रुपये झाली आहे, ज्याची ऑफ सेल प्राइस 35,100 रुपये आहे. तसेच अफोर्डेबल boAt Wave Call Smart Watch या सेल दरम्यान 1,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Amazon Happiness Upgrade Days Sale: टॅबलेट डील्स
जर तुम्ही काम आणि एंटरटेनमेंटसाठी पोर्टेबल डिवाइस विकत घेण्याची योजना बनवत असाल तर अॅमेझॉन हॅप्पीनेस सेल दरम्यान टॅबलेट्सवर देखील मोठी सूट दिली जात आहे. सेल दरम्यान Mi Pad 5 (128GB स्टोरेज व्हर्जन) फक्त 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ऑफ सेल सीजनमध्ये यासाठी 26,999 रुपये मोजावे लागतील. तसेच Samsung Galaxy Tab A8 स्मार्टफोन 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, ज्याची किंमत 16,999 रुपये आहे.














