ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर Amazon Prime Day Sale लाईव्ह झाला आहे. अॅमेझॉनचा हा सेल फक्त प्राईम मेंबर्ससाठी आहेत. सेल दरम्यान अॅमेझॉनवर स्मार्टफोनसह प्रोडक्टवर दमदार डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही देखील तुमच्यासाठी स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर अॅमेझॉनचा प्राईम डे सेल बेस्ट ऑप्शन आहे. या मध्ये अनेक स्मार्टफोनवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. Amazon Prime Day Sale मध्ये Apple, Xiaomi, Samsung आणि Oppo चे स्मार्टफोन स्वस्तात विकत घेता येतील. इथे आम्ही तुम्हाला अॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये स्मार्टफोनवर मिळणाऱ्या धमाकेदार डील्सबाबत माहिती देत आहोत.
Amazon Prime Day Sale in India : Best Smartphone Deals
Apple iPhone 13
Apple iPhone 13 मध्ये 6.1-इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे, हा एक OLED पॅनल आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2532×1170 पिक्सल आहे. Apple iPhone 13 कंपनीनं Apple A15 Bionic प्रोसेसरसह सादर केला आहे. अॅप्पलचा हा फोन 4GB RAM आणि 128GB/256GB/512GB स्टोरेजच्या ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल. Apple iPhone 13 मध्ये 3,240mAh ची बॅटरी आणि 20W पर्यंत फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. Apple iPhone 13 मध्ये सेल्फीसाठी 12MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. तसेच फोनच्या रियरवर 12MP प्रायमरी आणि 12MP अल्ट्रा वाईड कॅमेरा लेन्स मिळते. हा फोन लेटेस्ट iOS 15 वर चालतो.
प्राईस – 79,900 रुपये
डील प्राईस – 64,900 रुपये
OnePlus 10 Pro
OnePlus 10 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा 2K डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये Qualcomm चा शक्तिशाली Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आहे. वनप्लसचा हा फोन लेटेस्ट Android 12 आधारित OxygenOS वर चालतो. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 80W SuperVOOC वायर्ड फास्ट चार्जिंग, 50W AirVOOC वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. कॅमेरा सेगमेंट पाहता OnePlus 10 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा आहे, सोबतीला 50MP ची अल्ट्रा वाईड लेन्स, 8MP चा टेलीफोट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
प्राईस – 66,999 रुपये
डील प्राईस – 60,999 रुपये
Redmi K50i 5G
Redmi K50i 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा Full-HD+ LCD पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 270Hz आहे. Redmi K50i स्मार्टफोनमध्ये Corning Gorilla Glass 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. रेडमीचा हा फोन Android 12 आधारित MIUI वर चालतो. या शाओमी फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 ची प्रोसेसिंग पावर मिळते. फोटोग्राफीसाठी Redmi K50i 5G स्मार्टफोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8MP चा फ्रंट फेंसिंग कॅमेरा देखील आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक मिळतो. तर सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये 5,080mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते.
प्राईस – 25,999 रुपये
डील प्राईस – 20,999 रुपये
iQOO 9 5G
iQOO 9 स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा LTPO 2.0 E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. आयकूचा हा फोन Qualcomm Snapdragon 888+ प्रोसेसरसह सादर करण्यात आहे. या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. यात पावर बॅकअपसाठी 4,350mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. फोनमध्ये VC लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी मिळते. तसेच हा फोन Android 12 OS आधारित Funtouch OS 12 वर चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. iQOO 9 फोनच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात प्रायमरी कॅमेरा 48MP चा आहे, सोबतीला 13MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 13MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2, GPS, NFC, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.
प्राईस – 39,990 रुपये
डील प्राईस – 35,990 रुपये
Redmi Note 10T 5G
Redmi Note 10T 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा FHD+ Dot डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz, अस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. या फोनच्या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा मिळते. शाओमीचा हा फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह Mali-G57 MC2 GPU, 6GB पर्यंत रॅम आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा फोन Android 11 आधारित MIUI 12 वर चालतो. तसेच फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. कॅमेरा सेगमेंट पाहता यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP ची मॅक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. सोबतीला फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
प्राईस – 16,999 रुपये
डील प्राईस – 10,999 रुपये
Samsung Galaxy M52 5G
Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा Full-HD+ LCD पॅनल मिळतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे जो Corning Gorilla Glass 5 प्रोटेक्शनसह येतो. सॅमसंगचा हा फोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरसह येतो. हा फोन 5,000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन 6GB/8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. कॅमेरा पाहता Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो, जोडीला 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5MP चा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी 32MP चा सेन्सर आहे. सॅमसंगचा हा फोन Android 11 वर चालतो.
प्राईस – 34,999 रुपये
डील प्राईस – 19,999 रुपये
iQOO Z6 5G
iQOO Z6 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनचा रिफ्रेश रेट 120Hz आणि रिजोल्यूशन 2408×1080 पिक्सल आहे. आयकूच्या या फोनला Panda Glass प्रोटेक्शन लेयर देण्यात आली आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आणि Adreno 619 GPU सह येतो. जो Android 12 आधारित Funtouch 12 ओएसवर चालतो. यात 5,000mAh ची बॅटरी मिळते. तसेच कॅमेरा पाहता iQOO Z6 मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP पोर्टेट लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.
प्राईस – 19,999 रुपये
डील प्राईस 13,999 रुपये
Oppo A54
OPPO A54 स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा HD+ IPS LCD पॅनल देण्यात आला आहे. या फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 120Hz आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन MediaTek Helio P35 प्रोसेसरसह येतो. OPPO A54 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. फोनमध्ये 13MP प्रायमरी कॅमेऱ्यासह 2MP + 2MP चे कॅमेरा सेन्सर असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
प्राईस – 17,990 रुपये
डील प्राईस – 11990 रुपये
realme narzo 50
Realme Narzo 50 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट आहे. रियलमी नारजो स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह मिळते. या फोनमध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसरसह 5GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम देण्यात आला आहे. हा फोन Android 11 आधारित Realme UI 2.0 वर चालतो. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Realme Narzo 50 स्मार्टफोनमध्ये 50MP (f/1.8 अपर्चर) प्रायमरी कॅमेरा, 2MP मॅक्रो लेन्स आणि B&W लेन्स देण्यात आली आहे. रियलमीच्या या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी 16MP सेन्सर आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट मिळतो.
प्राईस – 15,999
डील प्राईस – 9,999
Tecno Spark 9
Tecno Spark 9 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. टेक्नोचा हा फोन MediaTek Helio G37 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी मिळते. टेक्नोच्या या फोनमध्ये 6GB रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळतो. त्यामुळे एकूण 11GB रॅमची ताकद असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. फोटोग्राफीसाठी Spark 9 स्मार्टफोनमध्ये 13MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा फोन Android 12 आधारित HiOS UI वर चालतो.
प्राईस – 9,499 रुपये
डील प्राईस – 8,499 रुपये














