10,000 रुपयांच्या बजेट मधील 10 शानदार डुअल रियर कॅमेरा असलेले फोन

आधी तुम्ही मोबाईल मधून फोटो घेत होता आणि आता तुम्ही फोनने फोटोग्राफी करता. दोन्ही गोष्टी एकसारख्या वाटल्या तरी त्यांचा अर्थ वेगवेगळा आहे. काही चांगले वाटल्यास तुम्ही फोटो घेत होता पण आता तुम्ही फोटोमध्ये चांगले इफेक्ट शोधता. बॅकग्राउंड ब्लर असो, पिक्चर मधील असो, योग्य फोकस किंवा मग वाइड एंगल असो. फोनच्या ताकदवान कॅमेरा फीचर्स मुळे आज हे शक्य आहे पण डुअल कॅमेरा मुळे हि कामे सोप्पी झाली आहेत. सर्वात चांगली बाब म्हणजे सध्या डुअल कॅमेरा फोन खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहेत. खाली आम्ही 10,000 रुपयांच्या बजेट मधील अशाच 10 शानदार डुअल कॅमेरा वाल्या फोन्सची माहिती दिली आहे.

1. रियलमी सी1

ओपो ब्रांड रियलमी ने नुकताच सी1 फोन सादर केला आहे. या फोन मध्ये 6.2-इंचाची एचडी+ स्क्रीन आहे जी नॉच सह उपलब्ध आहे. कंपानी ने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट सह सादर केला आहे आणि यात 1.8गीगाहट्र्ज चा कोर्टेक्स ए53 आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. यासोबत 2जीबी रॅम मेमरी आणि 16जीबी इंटरनल मेमरी आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही माइक्रोएचडी कार्डचा वापर करू शकता. कमी रेंजच्या रियलमी 2 प्रो मध्ये तुम्हाला 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो या रेंज मधील फोन मध्ये सहज मिळत नाही. तसेच याचा सेल्फी कॅमेरा 5-मेगापिक्सलचा आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,230 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

2. रियलमी 2

रियलमी 2 पण 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये डुअल कॅमेरा सह उपलब्ध आहे. या फोन मध्ये 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले नॉच सह उपलब्ध आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो आणि यात 1.8गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यात 3जीबी रॅम आणि 32जीबी मेमरी आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 256जीबी पर्यन्त मेमरी एक्सपांड करू शकता. रियलमी 2 प्रो चा कॅमेरा पण ताकदवान आहे, फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी रियलमी 2 मध्ये 4,230एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

3. लेनोवो के9

बऱ्याच दिवसांनी लेनोवो ने के9 च्या माध्यमातून पाऊल टाकले आहे. हा फोन कमी रेंज मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. मीडियाटेक एमटी6762 चिपसेट आ​धारित लेनोवो के9 मध्ये 2.0 गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोन मध्ये 3जीबी रॅम मेमरी सह 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफी साठी कंपनी ने यात 13-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच सेल्फी साठी पण या फोन मध्ये 13-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. बॅटरी बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी आहे.

4. शाओमी रेडमी वाय 2

शाओमी ला लोक कमी रेंज मध्ये चांगल्या स्पेसिफिकेशन साठी ओळखतात आणि कंपनी कडे काही कमी रेंज मध्ये डुअल कॅमेरा फोन आहेत. शाओमी ने काही दिवसांपूर्वी रेडमी वाय2 आणला होता. या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाली 5.99-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालतो आणि यात 2गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबत 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. शाओमी रेडमी वाय2 मध्ये 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा एआई कॅमेरा सेंसर मिळेल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,080एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

5. शाओमी रेडमी 6

शाओमी चा रेडमी 6 पण कमी रेंज मध्ये डुअल कॅमेरा सह येतो. फोन मध्ये 5.45-इंचाची एचडी+ (720 x 1440 पिक्सल रेजल्यूशन) स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच पावर बॅकअप साठी यात 3,000 एमएएच ची बॅटरी आहे. रेडमी 6 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 12—मेगापिक्सल + 5—मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनचा डुअल कॅमेरा डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच याचा सेल्फी कॅमेरा 5—मेगापिक्सलचा आहे. फोन मध्ये 3जीबी आणि 4जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हे फोन मीडियाटेक हेलिया पी22 चिपसेट वर चालतो.

6. आॅनर 7ए

डुअल कॅमेरा सेग्मेंट मध्ये सर्वात जास्त फोन आॅनर कडे आहेत आणि कमी रेंज मध्ये पण कंपनी ने काही मॉडेल सादर केले आहेत ज्यातील आॅनर 7ए एक आहे. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो 5.7-इंचाची एचडी+ स्क्रीन आहे. हा ईएमयूआई 8.0 आधारित एंडरॉयड 8.0 ओरियो सह सादर करण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट वर चालतो आणि यात 1.4गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळेल. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. आॅनर 7ए मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटनल स्टोरेज आहे. फोटोग्राफी साठी कंपनी ने यात 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा कॅमेरा दिला आहे. सेल्फी साठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

7. आॅनर 7सी

10,000 पेक्षा कमी बजेट मध्ये आॅनर चा हा दुसरा फोन आहे जो डुअल कॅमेरा सह येतो. फोन मध्ये 5.99-इंचाचा फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास सह येतो. या फोनला स्नॅपड्रॅगन 450 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे आणि फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर आहे. तसेच 3जीबी रॅम आणि 32जीबी मेमरी मिळेल. फोटोग्राफी साठी 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर सेल्फी साठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनच्या दोन्ही कॅमेरा सेटअप सोबत फ्लॅश आहे. आॅनर 7सी 4जी वोएलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी आॅनर 7सी मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

8. ओपो ए3एस

ओपो ब्रांड चा पण एक फोन आहे जो कमी रेंज मध्ये डुअल कॅमेरा सह येतो. कंपनी ने ओपो ए3एस सादर केला आहे. फोन मध्ये 6.2-इंचाचा एचडी+ नॉच डिस्प्ले आहे. कंपनी ने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर सादर केला आहे आणि फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर आहे. यात 2जीबी रॅम आणि 16जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोटोग्राफी साठी यात 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी ओपो ए3एस मध्ये 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे.

9. इनफोकस टर्बो 5

इनफोकस टर्बो 5 मध्ये 5.5-इंचाची एचडी आईपीएस स्क्रीन देण्यात आली आहे, जी 2.5डी ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा मीडियाटेक एमटी6750 चिपसेट वर चालतो आणि यात 3जीबी रॅम सह 32जीबी व 64जीबी चे दोन स्टोरेज वेरिएंट आहेत. फोन मध्ये मैमारी कार्ड सपोर्ट आहे. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आहे. तर फ्रंट कॅमेरा 5-मेगापिक्सलचा आहे. फिंगरप्रिंट सेंसर सह यात बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच पावर बॅकअप साठी यात 4,850एमएएच ची मोठी बॅटरी मिळेल.

10. लेनोवो के8 नोट

लेनोवो के8 नोट थोडा जुना आहे पण चांगला फोन आहे. यात 5.5-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 कोटेड आहे. हा फोन मीडियाटेक एक्स23 एमटी6797डी चिपसेट वर चालतो आणि यात 2.3गीगाहट्र्ज चा डेकाकोर अर्थात दहा कोर वाला प्रोसेसर मिळेल. के8 नोट 3जीबी रॅम सोबत 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल मेमरी मध्ये उपलब्ध आहे. हा लेनोवो के नोट सीरीजचा पहिला फोन आहे जो डुअल रियर कॅमेरा सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 13+5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात तुम्ही बोके इफेक्टचा वापर करू शकता. फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पण देण्यात आला आहे. लेनोवो के8 नोट मध्ये एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 7.1 नुगट मिळेल. फोन मध्ये 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here