SAMSUNG Galaxy F23 5G स्मार्टफोनचा डिस्काउंटनंतर 14,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर लिस्ट

Samsung भारतातील टॉप स्मार्टफोन ब्रँड्स पैकी एक आहे. चायनीज कंपन्यांना पर्याय म्हणून या ब्रँडची हमखास निवड केली जाते. या दक्षिण कोरियन कंपनीनं काही दिवसांपूर्वी आपला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन सादर केला होता, जो आता Flipkart वर डिस्काउंटसह विकला जात आहे. फ्लिपकार्टवर सध्या Big Saving Dat Sale सुरु आहे. हा सेल 16 ते 21 डिसेंबर दरम्यान सुरु राहील. सेल दरम्यान फ्लिपकार्टवर मोबाइल फोन्स आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर शानदार डील मिळत आहे. चला जाणून घेऊया Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनवरील ऑफर्स, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती.

Samsung Galaxy F23 5G वरील ऑफर

SAMSUNG Galaxy F23 5G स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 14,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे, ज्याची एमआरपी 23,999 रुपये आहे. 37 टक्क्यांच्या थेट डिस्काउंटसह बिग सेव्हिंग डेज सेल अंतर्गत बँक डिस्काउंटही दिला जात आहे. सॅमसंगचा हा फोन विकत घेताना SBI किंवा कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास तुम्हाला 750 रुपयांची सूट मिळत आहे. म्हणजे हा स्मार्टफोन फक्त 14,249 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून आणखी सूट मिळवू शकता, ज्यामुळे या हँडसेटची किंमत खूप कमी होईल. हे देखील वाचा: कोणत्या बँडवर चालतंय तुमचं Jio, Airtel, BSNL सिम! काही क्लिक्समध्ये मिळवा माहिती

Samsung Galaxy F23 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6-इंच FHD+ IPS LCD डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट
  • Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर
  • 6GB पर्यंत रॅम, 128GB स्टोरेज
  • 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 13MP सेल्फी कॅमेरा
  • 5,000mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग

Samsung Galaxy F23 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि Corning Gorilla Glass च्या प्रोटेक्शनसह येतो. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी यात क्वॉलकॉमचा Snapdragon 750G चिपसेट मिळतो. सोबतीला Adreno 619 GPU देण्यात आला आहे. हा फोन Android 12 आधारित सॅमसंगच्या OneUI 4.1 वर चालतो.

Samsung Galaxy F23 5G
Samsung Galaxy F23 5G

Samsung Galaxy F23 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे, जोडीला 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. फोनमध्ये 13MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: e-Shram Card साठी कसा करायचा मोफत अर्ज; महिन्याला मिळवा 3 हजार, 2 लाखांचं विमा संरक्षण

Samsung Galaxy F23 स्मार्टफोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते. तसेच हा फोन Dolby Atmos आणि Samsung Pay ला देखील सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, dual-band Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, आणि USB Type-C पोर्ट मिळतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here