Amazon Great Freedom Festival sale: शानदार डीलसह खरेदी करा हे हेडफोन्स

तुम्ही संगीतप्रेमी असाल आणि चांगले हेडफोन शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. सध्या अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल (Amazon Great Freedom Festival sale) सुरू आहे. ह्या सेलमध्ये काही चांगले हेडफोन्स (headphones) आकर्षक किंमतीत उपलब्ध झाले आहेत. तुम्ही ह्या संधीचा फायदा घेऊ शकता. ह्या आर्टिकलमध्ये आम्ही आकर्षक किंमतीत उपलब्ध झालेल्या हेडफोन्सची यादी बनविली आहे ज्यात सोनी, बोस, स्कलकँडी इत्यादी लोकप्रिय ऑडियो ब्रँडचा समावेश आहे.

Sony WH-1000XM4

अ‍ॅमेझॉन सेलमध्ये Sony WH-1000XM4 हेडफोन डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हे हेडफोन अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनसह येतात. हे 30 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ देतात आणि फक्त 10 मिनिटांच्या क्विक चार्जमध्ये 5 तासांचा प्लेबॅक देतात. जर तुम्ही कॉलिंगसाठी हेडफोन वापरत असाल तर ह्यात 5 बिल्ट-इन मायक्रोफोन आणि अ‍ॅडव्हान्स ऑडियो सिग्नल प्रोसेसिंग आहे. हे वियर डिटेक्शन फीचरसह येतात म्हणजे हेडफोन काढतच प्लेबॅक थांबतो. ह्यात तुम्हाला स्पीक-टू-चॅट आणि क्विक अटेंशन मोड सारखे फीचर्स पण मिळतात.

सेलिंग प्राइस : 22,990 रुपये

डील प्राइस : 17,739 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Bose Noise Cancelling 700

बोस नॉइज कँसलिंग 700 (Bose Noise Cancelling 700) प्रीमियम हेडफोन आहेत आणि चांगला ऑडियो एक्सपीरियंस देतात. विशेष म्हणजे हेडफोनमध्ये नॉइज कॅन्सलेशनसाठी 11 लेव्हल आहेत, ज्यामुळे बाहेरचा गोंधळ कानापर्यंत पोहोचत नाही. जोडीला स्टेनलेस स्टीलपासून बनलेले अँगल्ड ईयर कप आहेत. जे दीर्घकाळ वापरासाठी डिजाइन करण्यात आले आहेत. हेडफोन एकदा चार्ज केल्यावर 20 तासांपर्यंतचा प्लेबॅक देतात. ह्यात अ‍ॅलेक्सा आणि गुगल असिस्टंट सपोर्ट आहे.

सेलिंग प्राइस : 34,500 रुपये

डील प्राइस : 25,023 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Skullcandy Riff Wireless 2

स्कलकँडी रिफ वायरलेस 2 मल्टी-पॉईंट पेयरिंग सपोर्टसह येतात. हे एकदा चार्ज केल्यावर 34 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ मिळते. हे रॅपिड चार्जिंगला देखील सपोर्ट करतात म्हणजे फक्त 10 मिनिटांच्या चार्जवर 4 तास पर्यंतचा प्लेटाइम मिळतो. ह्या हेडफोनमध्ये युजर्सना इयरकपवर कॉल, ट्रॅक आणि वॉल्यूम कंट्रोल बटन मिळतात, जे सहज अ‍ॅक्सेस करता येतात. Skullcandy Riff वायरलेस 2 Skullcandy अ‍ॅप सह कस्टमाइज करता येतात. ह्यात गेमर्ससाठी गेम मोड आहे. युजर्स अ‍ॅपसह कस्टम ईक्यू मोड अ‍ॅक्सेस करू शकतात.

सेलिंग प्राइस : 4,999 रुपये

डील प्राइस : 4,299 रुपये

Boult Audio Anchor

बोल्ट ऑडियो अँकर हेडफोनमध्ये देखील बाहेरचा आवाज करण्यासाठी अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनची सुविधा मिळते. हे हेडफोन एकदा चार्ज केल्यावर 30 तासापर्यंतचा प्लेबॅक टाइम मिळतो. बोल्ट ऑडियो अँकरमध्ये डीप बास रिस्पॉन्ससाठी 40 मिमी बडे ड्रायव्हर्स मिळतात. ह्यात गेम मोड पण आहे, जो गेमर्ससाठी आवश्यक लो-लेटेंसी ऑडियो एक्सपीरियंस देतो. हे हेडफोन IPX5 रेटेड आहेत.

सेलिंग प्राइस : 3,999 रुपये

डील प्राइस : 4,099 रुपये

boAt Rockerz 450

boAt Rockerz 450 हेडफोन बद्दल बोलायचं तर हे प्रीमियम मॅट फिनिश डिजाइनसह आले आहेत. ह्यात चांगल्या ऑडियो एक्सपीरियंससाठी 40 मिमी ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. हेडफोन अर्गोनॉमिक पद्धतीने डिजाइन करण्यात आले आहेत, त्यामुळे तुम्ही दीर्घकाळ वापरू शकता. युजर्सना ह्यात म्यूजिक प्लेबॅक कंट्रोल मिळतो. जे सहज अ‍ॅक्सेस करता येतात. हेडफोन फुल चार्जवर 15 तासापर्यंतचा प्लेबॅक देतात. ह्यात बिल्ट-इन AUX पोर्टची सुविधा आहे जेणेकरून हे वायर्ड तसेच वायरलेस मोडमध्ये वापरता येतात.

सेलिंग प्राइस : 1,499 रुपये

डील प्राइस : 1,299 रुपये

Logitech H111

लॉजिटेक एच111 हेडफोनमध्ये सॉफ्ट फोम ईयरपॅडचा वापर करण्यात आला आहे. ह्या हेडफोनचा हेडबँड अ‍ॅडजस्ट करता येतो त्यामुळे फिटिंग पर्सनलाइज्ड करता येते. हेडफोनमध्ये फिरता माइक (180 डिग्री) पण आहे. हेडफोनमध्ये स्टँडर्ड 3.5 मिमी ऑडियो जॅक आहे, ज्यामुळे ह्यांचा वापर स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप इत्यादीसह करता येतो.

सेलिंग प्राइस : 800 रुपये

डील प्राइस : 744 रुपये

ZEBRONICS Zeb-Thunder

झेब्रॉनिक्स झेब-थंडर हेडफोन अडजस्टेबल हेडबँडसह येतात. हे दीर्घकाळ वापर लक्षात ठेऊन डिजाइन करण्यात आले आहेत. फुल चार्जवर हे 9 तासापर्यंतचा प्लेबॅक टाइम देतात. हेडफोन ब्लूटूथ, 3.5 मिमी हेडफोन जॅक, अॉक्स इनपुट आणि मायक्रोएसडीसह अनेक कनेक्टिव्हिटी ऑप्शन आहेत. विशेष म्हणजे हे हेडफोन एफएम सपोर्टसह येतात आणि जोडीला म्यूजिक प्लेबॅक कंट्रोलही मिळतो.

सेलिंग प्राइस : 641 रुपये

डील प्राइस : 548 रुपये

Bose Quietcomfort 45

बोस क्वाइटकंफर्ट 45 चांगले वायरलेस हेडफोन आहेत. नावाप्रमाणेच हे हेडफोन हलक्या डिजाइनमुळे चांगला कंफर्ट देतात. क्वाइटकंफर्ट 45 शानदार ऑडियो एक्सपीरियंससाठी ट्रायपोर्ट एक्यूस्टिक आर्किटेक्चर टेक्नॉलॉजीचा वापर करतात. ह्यात युजर त्यांच्या सोयीनुसार Quiet आणि Aware मोड्स मध्ये स्विच करू शकतात.

सेलिंग प्राइस : 29,900 रुपये

डील प्राइस : 25,655 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Sony WH-CH520

अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेलमध्ये सोनी WH-CH520 हेडफोन देखील डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. Sony WH-CH520 एकदा चार्ज केल्यावर 50 तास प्लेबॅक टाइम देतात. फक्त 3 मिनिटांच्या चार्जमध्ये 90 मिनिटांचा प्लेबॅक मिळतो. हे हेडफोन दीर्घकाळ वापर लक्षात घेऊन डिजाइन करण्यात आले आहेत. हँड्स-फ्री व्हॉइस कॉल करण्यासाठी बिल्ट-इन माइक पण आहे. त्याचबरोबर युजर्सना मल्टीपॉइंट कनेक्शनची सुविधा मिळते, त्यामुळे एकाचवेळी दोन डिवाइस कनेक्ट करता येतात.

सेलिंग प्राइस : 5,990 रुपये

डील प्राइस : 4,421 रुपये

Sony WH-XB910N

Sony WH-XB910N शानदार हेडफोन आहेत. बाहेरचा गोंधळ फिल्टर करण्यासाठी ह्यात नॉइज कॅन्सलेशनची सुविधा मिळते. हे हेडफोन अतिरिक्त बास देण्यासाठी बनवण्यात आले आहेत. हेडफोनमध्ये मल्टीपॉईंट कनेक्शनची सुविधा आहे आणि हे टच कंट्रोल देतात. फुल चार्जवर 30 तासापर्यंतचा प्लेबॅक टाइम मिळू शकतो. हे हेडफोन Google फास्ट पेयर आणि स्विफ्ट पेयरला सपोर्ट करतात.

सेलिंग प्राइस : 13,990 रुपये

डील प्राइस : 11,489 रुपये (बँक डिस्काउंटसह)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here