Electric Scooter Discount: OLA आणि Hero नंतर आता आणखी एका इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या कंपनीनं आपल्या इलेक्ट्रिक स्कूटी (Electric Scooter) वर डिस्काउंट देण्याची घोषणा केली. इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी EVeium स्मार्ट मोबिलिटीनं एक-दोन नव्हे तर आपल्या तीन Electric Scooters वर 15,400 रुपयांपर्यंतच्या कपातीची घोषणा केली आहे, ज्यात Cosmo, Comet आणि Czar मॉडेलचा समावेश आहे. जर तुम्ही या फेस्टिव सीजन (Diwali 2022) मध्ये एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल तर या मॉडेल्सचा विचार करता येईल. तसेच कंपनीच्या साइटवरून 999 रुपयांमध्ये या स्कूटर्स बुक देखील करता येतील.
15,400 रुपयांपर्यंत मिळेल डिस्काउंट
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार कॉस्मो इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1,39,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे. परंतु, 12,701 रुपयांच्या डिस्काउंटनंतर ही 1,26,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच, Comet 1,84,900 रुपयांच्या ऐवजी आता 1,69,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर Czar मॉडेल 1,94,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही ऑफर 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत लाइव्ह असेल. हे देखील वाचा: 180GB डेटा आणि मोफत OTT सह या कंपनीचा पैसा वसूल प्लॅन; 90 दिवस अनलिमिटेड कॉलिंग
Cosmo Electric Scooter: कॉस्मो ई-स्कूटर पाहता यात 72V/30Ah लिथियम-ए-आयन बॅटरी आहे जी 4 तासांमध्ये चार्ज होते. तसेच कंपनीनं या ई-स्कूटर मध्ये 2000 W ची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे जी 65 किमी/तास पर्यंतच्या स्पीडपर्यंत पोहोचू शकते. कॉस्मो सिंगल चार्जवर 80 किलोमीटरची रेंज देते. तुम्ही ही ई-स्कूटर सहा वेगवेगळ्या कलर जसे की अर्जेंट ब्लॅक, कोल्ड ब्लॅक, पर्ल ग्रे, मूनलाइट व्हाइट, सॅटिन रेड, ऑरोरल येलो, हेजी ब्लू, मिंटेड ग्रीन मध्ये विकत घेऊ शकता.
Comet Electric Scooter: या ईव्ही मॉडेलमध्ये लिथियम-आयन 72V A 50Ah ची बॅटरी आहे जी 4 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज करता येते. यात 3000W ची मोटर आहे जी ताशी 85 किमीचा टॉप स्पीड गाठू शकते आणि सिंगल चार्जवर 150 किमी रेंज देते. ही ई-स्कूटर कोल्ड ब्लॅक, अर्जेंटीना ब्लॅक, मिंटेड ग्रीन, पॉमी रेड, सँडी ब्राउन, रॉयल ब्लू, मूनलाइट व्हाइट, कॅलम ग्रे कलरमध्ये विकत घेता येईल.
Czar Electric Scooter: फ्लॅगशिप मॉडेल Czar चा हाय-स्पीड 85 किमी/तास आहे आणि एकदा चार्ज केल्यावर ही 150 किमीची रेंज देते. ही लिथियम बॅटरीसह येते, यात आयन 42वी आणि 72वी बॅटरी फक्त 4 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज करता येते. मॉडेल अर्जेंटीना ब्लॅक, कोल्ड ब्लॅक, पर्ल ग्रे, मूनलाइट व्हाइट, सॅटिन रेड, ऑरोरल येलो, हेजी ब्लू, मिंटेड ग्रीनमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: Samsung चे 5 सर्वात स्वस्त Mobile Phone, फक्त 1400 रुपयांपासून सुरु होते किंमत!
इलेक्ट्रिक स्कूटर्सचे फीचर्स
तिन्ही ई-स्कूटर हाय-स्पीड कॅटेगरीमध्ये येतात. यात मल्टीपल स्पीड मोड्स (इको, नॉर्मल आणि स्पोर्ट), कीलेस स्टार्ट, अँटी-थेफ्ट एलसीडी फीचर डिस्प्ले, रीजेनरेटिव्ह ब्रेकिंग, मोबाइल अॅप कनेक्टिव्हिटी, फाइंड माय व्हेईकल, रियल-टाइम ट्रॅकिंग, ओव्हर-स्पीड अलर्ट सारखे फीचर्स मिळतात. तसेच Comet Electric Scooter आणि Czar Electric Scooter मध्ये रिवर्स-गियर सुविधा देखील आहे.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.