चीनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी LG ने पण कंबर बांधली, घेऊन येत हा शानदार स्मार्टफोन

कोरियन कंपनी LG ने गेल्या महिन्यात टेक मंचावर आपला 5G फोन सादर करत LG Velvet लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 765 चिपसेट वर सादर केला गेला होता, ज्याने मिड बजेट मध्ये एंट्री घेतली होती. तसेच आता बातमी येत आहे कि कंपनी या फोनचा स्वस्त वर्जन LG Velvet चा 4G मॉडेल पण लॉन्च करणार आहे. एलजी चा हा आगामी फोन बेंचमार्किंग साइट वर पण लिस्ट झाला आहे जिथे लॉन्चच्या आधीच फोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

LG Velvet चीनी सर्टिफिकेशन्स साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग कालची म्हणजे 9 जूनची आहे जी सर्वात आधी एमएसपी वेबसाइटने बघितली आहे. बेंचमार्किंग साइट वर हा एलजी फोन LGE LM-G910 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता गीकबेंच वर हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह येईल.

लिस्टिंग मध्ये मदरबोर्डच्या जागी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट असल्याचे सांगण्यात आले आहे जो 1.77गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह चालेल. गीकबेंच वर हा फोन 6 जीबी रॅम सह येईल. तसेच बेंचमार्किंग स्कोर बद्दल बोलायचे तर गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये या फोनला 440 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये या एलजी फोनने 2090 स्कोर मिळवला आहे.

LG Velvet

लॉन्च झालेल्या एलजी वेलवेट बद्दल बोलायचे तर या स्मार्टफोन मध्ये 6.8 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजॉलूशन 1080×2340 पिक्सल आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765G प्रोसेसर आहे. तसेच डिवाइस मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येईल.

LG Velvet मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. रियर कॅमेऱ्यामध्ये एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सल प्राइमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. कॅमेरा क्वाड बाइकिंग टेक्नॉलजी सह येतो जी 4 पिक्सल एका फोटो मध्ये कंबाइन करते. तसेच फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे.

पावर बॅकअपसाठी स्मार्टफोन मध्ये 4300mAh बॅटरी आहे जी फास्ट आणि वायरलेस चार्जिंगला सपॉर्ट करते. फोन मध्ये 5G, ड्यूल-सिम, वाई-फाई 802.11 एसी, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन सारखे कनेक्टिविटी ऑप्शन आहेत. तसेच फोन एंडरॉयड 10 वर चालतो.

एलजी वेलवेट वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here