New OTT releases this week: बहुचर्चित ‘थँक गॉड’ आणि पिचर्स येतायत ओटीटीवर, पाहा संपूर्ण यादी

या आठाव्ढ्यात पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर करमणुकीची जत्रा भरणार आहे. या जत्रेत अ‍ॅक्शन, ड्रामा, रोमांस आणि मिस्ट्री सेगमेंटमधील अनेक चित्रपट व वेब सीरीज रिलीज होण्यास तयार आहेत. तर काही आधीच रिलीज झाले आहेत. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला लेटेस्ट Movie आणि Web Series ची माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमचा Weekend शानदार जाईल. Best OTT Releases This Week च्या लिस्टमध्ये यावेळी TVF Pitchers Season 2, Honeymoon, Ram Setu इत्यादींचा समावेश आहे. जे Disney Plus Hotstar, Netflix, आणि Amazon Prime Video प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतील.

New OTT Release This Week

  • TVF Pitchers Season 2
  • Tara vs Bilal
  • Glass Onion A Knives Out Mystery
  • Thank God
  • Phone Bhoot

TVF Pitchers Season 2

TVF Pitchers Season 2 23 डिसेंबरला ZEE5 वर रिलीज होणार आहे, तब्बल सात वर्षांनी या सीरिजचा दुसरा सीजन येत आहे. या वेब सीरीजमध्ये (TVF Pitchers Season 2 cast) Naveen Kasturia, Arunabh Kumar, Abhay Mahajan, Abhishek Banerjee, Gopal Dutt, Ridhi Dogra, Sikander Kher आणि Ashish Vidyarthi सारखे कलाकर असतील. पहिल्या सीजनमधील Jitendra Kumar (Jitu Bhaiya) यावेळी नवीन सीजनमध्ये दिसत नाही त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु यावेळी सीजनमध्ये Shark Tank फेम बिजनेसमॅन Ashneer Grover दिसतील, त्यांचा सीरीजमध्ये एक छोटा रोल असेल.

Tara vs Bilal

Tara vs Bilal हा चित्रपट John Abraham च्या प्रोडक्शन बॅनर अंतर्गत बनला आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज झाल्यानंतर आता ओटीटी रिलीजसाठी तयार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 23 डिसेंबरला रिलीज केला जाईल. चित्रपटात Tara (Sonia Rathee) आणि Bilal (Harshvardhan Rane) आहेत ज्यांचं लग्न ठरलं आहे परंतु दोघांनाही हे लग्न करायचं नाही. यातील गंमत म्हणजे या चित्रपटाची गोष्ट आहे.

Glass Onion A Knives Out Mystery

जर तुम्ही इंग्रजी चित्रपटांचे चाहते असाल तर या आठवड्यात एक शानदार हॉलिवूडपट ओटीटीवर रिलीज होत आहे. Glass Onion A Knives Out Mystery मध्ये जगप्रसिद्ध डिटेक्टिव्ह बेनोइट ब्लँक एका टेक अरबपतीची अवतीभवतीची मिस्ट्री गोष्ट सोडवतो. हा एक कॉमेडी-ड्राम चित्रपट आहे, ज्याचा पहिला भाग काही वर्षांपूर्वी आला होता. हा चित्रपट Netflix वर उद्या म्हणजे 23 डिसेंबरपासून स्ट्रीम करता येईल.

Thank God

बहुचर्चित Thank God चित्रपट OTT वर रिलीज झाला आहे. हा चित्रपट मोठ्या पदड्यावर आल्यानंतर चर्चेचा विषय ठरला होता. आता अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राचा हा चितपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. यात एका इस्टेट ब्रोकरची देवाशी भेट होते आणि त्याला आयुष्याचा खेळ खेळावा लागतो. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर बघता येईल.

Phone Bhoot

Supernatural Comedy फिल्म Phone Bhoot ओटीटी रिलीज झाला आहे. 4 नोव्हेंबरला मोठ्या पदड्यावर रिलीज झालेला हा चित्रपट 21 डिसेंबरपासून Amazon Prime Video वर स्ट्रीम केला जात आहे. परंतु सध्या हा चित्रपट बघण्यासाठी ग्राहकांना रेंट द्यावं लागेल. चित्रपटात Katrina Kaif नं रागिणी महेश्वरी, Ishaan Khatter नं गल्लूू, Siddhant Chaturvedi नं मेजर शेरदिल शेरगील आणि Jackie Shroff नं आत्माराम ध्यानीची भूमिका निभावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here