रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर आता लोक सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या प्लॅनचा शोध घेत आहेत. हे लक्षात घेऊन आम्ही बीएसएनएलचे 1 जीबी दैनंदिन डेटा असलेल्या स्वस्त प्लॅन्सची माहिती घेऊन आलो आहोत. हे प्लॅन जिओच्या तुलनेत अर्ध्या किमतीत येतात. त्याचवेळी, जर आपण फायद्यांबद्दल बोललो तर, बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये जिओ प्रमाणेच वैधता आणि कॉलिंगची सेवा मिळते. आम्ही ज्या रिचार्ज प्लॅनची चर्चा करणार आहोत त्याची किंमत फक्त 18 रुपयांपासून सुरू होते.
बीएसएनएल रिचार्ज प्लॅन 18 रुपये
बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन 2 दिवसांच्या वैधतेसह येतो. या पॅकमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल्स आणि दररोज 1 जीबी डेटा मिळतो. त्याची वैधता समाप्त झाल्यानंतर ग्राहक 80kbps च्या कमी वेगाने अमर्यादित इंटरनेटचा आनंद घेऊ शकतात.
बीएसएनएल रिचार्ज प्लॅन 87 रुपये
बीएसएनएलचा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 87 रुपयांच्या किंमतीसह येतो. या पॅकमध्ये दररोज 1 जीबी डेटाची सुविधा मिळते. सोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा आहे. हा पॅक 14 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि दररोज 100 एसएमएस ऑफर करतो. हा पॅक हार्डी मोबाईल गेम्स सर्व्हिस सोबत देखील येतो, जो One97 कम्युनिकेशनद्वारे ऑफर केला जातो.
बीएसएनएल रिचार्ज प्लॅन 184 रुपये
बीएसएनएलच्या 184 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांची वैधता देतो. यात 1 जीबी डेटासह दररोज 100 एसएमएसचा फायदा मिळतो. बीएसएनएल या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल्स देखील मिळत आहे. याशिवाय, तुम्हाला Lystn पॉडकास्टचे सबस्क्रीप्शन मोफत मिळेल.
बीएसएनएल रिचार्ज प्लॅन 185 रुपये
हा 185 रुपयांचा बीएसएनएलचा हा प्रीपेड प्लान 28 दिवसांची वैधता देतो. हा प्लॅन वैधतेच्या संपूर्ण कालावधीसाठी 100 एसएमएस प्रदान करतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा सुद्धा मिळतो. याशिवाय, तुम्हाला एम/एस ऑनमोबाईल ग्लोबल लिमिटेड आणि बीएसएनएल ट्यून्स द्वारे प्रोग्रेसिव वेब एपीपी (पीडब्ल्यूए) वर चॅलेंज एरिना मोबाईल गेमिंग सेवेचे बंडलिंग देखील मिळते.
बीएसएनएल रिचार्ज प्लॅन 186 रुपये
बीएसएनएलचा 186 रुपयांचा प्रीपेड प्लॅन अनेक मनोरंजक फायदे आणि सेवांसह येतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. तसेच, हा लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंगसाठी अमर्यादित व्हॉईस कॉल सोबत येतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा सोबतच 100 एसएमएस च्या लाभांसोबत येतो. हा पॅक मोफत बीएसएनएल ट्यूनसह हार्डी गेम्सची सुविधा देतो.
बीएसएनएल रिचार्ज प्लॅन 298 रुपये
बीएसएनएलचा प्रीपेड प्लॅन 52 दिवसांच्या वैधतेसह येतो. या पॅकमध्ये स्थानिक आणि एसटीडी वर अमर्यादित व्हॉइस कॉलची सुविधा मिळत आहे. यामध्ये दररोज 1 जीबी डेटा सोबत प्रतिदिन 100 एसएमएसची सुविधा देखील मिळते. प्लॅनमध्ये इरॉस नॉव एन्टरटेन्मेंट च्या सेवांचे मोफत सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट करण्यात आले आहे.
बीएसएनएल रिचार्ज प्लॅन 399 रुपये
बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन 70 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा पॅक होम आणि नॅशनल रोमिंगवर अमर्यादित व्हॉईस कॉलची सुविधा देतो. यात विनामूल्य बीएसएनएल ट्यून आणि लोकधुन कंन्टेटसह दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा देखील मिळतो.
बीएसएनएल रिचार्ज प्लॅन 499 रुपये
बीएसएनएल चा एसटीव्ही 499 रिचार्ज प्लॅन 75 दिवसांच्या वैधतेसह येतो. या पॅकमध्ये दररोज 1 जीबी डेटा मिळतो. ही योजना मोफत पीआरबीटी सोबत अमर्यादित साँग चेंज, क्रिकेट पीआरबीटी, क्रिकेट एसएमएसच्या अलर्टसह येते. या पॅकमध्ये लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंगवर अमर्यादित व्हॉईस कॉल्सची देखील मिळते.














