Redmi Note 12 Pro आणि Note 12 Pro Plus चीनमध्ये लाँच; जाणून घ्या किंमत

Redmi Note 12 Pro series Launch: टेक मार्केटमध्ये आपला दबदबा कायम राखत स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनी Redmi नं आज आपल्या होम मार्केट China मध्ये Redmi Note 12 Series लाँच केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीनं Redmi Note 12 Explorer Edition, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ phones सादर केले आहेत. परंतु यातील Redmi Note 12 12 Pro आणि Note 12 Pro+ स्मार्टफोन्सनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. दोन्ही फोनची खासियत म्हणजे यात AMOLED display, 120Hz refresh rate, MIUI 13 कस्टम स्किन आणि 5000mAh battery देण्यात आली आहे. या आर्टिकलमध्ये रेडमी नोट 12 प्रो आणि रेडमी नोट 12 प्रो प्लस फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती घेऊया.

Redmi Note 12 Pro आणि Note 12 Pro+ ची प्राइस

Redmi Note 12 Pro स्मार्टफोन चार रॅम व स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा 6GB/128GB व्हर्जन RMB 1,699 (जवळपास Rs 19,380), 8GB/128GB मॉडेल RMB 1,799 (जवळपास Rs 20,500), 8GB/256GB मॉडेल RMB 1,899 (जवळपास Rs 21,700) आणि 12GB/256GB मॉडेल RMB 2,099 (जवळपास Rs 23,900) रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे.

Redmi Note 12 Pro+ ची किंमत पाहता 8GB/256GB मॉडेलची किंमत RMB 2099 (जवळपास Rs 23,900) आणि 12GB/256GB मॉडेलची किंमत RMB 2299 (जवळपास Rs 26,200) आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीचं साम्राज्य धोक्यात! Samsung घेऊन येत आहे सर्वात स्वस्त 5जी फोन, इतकी असेल किंमत

Redmi Note 12 Pro आणि Note 12 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67-इंच एफएचडी+ OLED डिस्प्ले
  • मीडियाटेक डाइमेंसिटी 1080 SoC
  • 50MP + 8MP + 2MP (Redmi Note 12 Pro)
  • 200MP + 8MP + 2MP (Redmi Note 12 Pro+)
  • 5000mAh बॅटरी, 67W/120W फास्ट चार्जिंग
  • Android 12 बेस्ड MIUI 13

Redmi Note 12 Pro आणि Note 12 Pro+ स्मार्टफोन्समध्ये 6.67-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 आस्पेक्ट रेशीओ, 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि 900nits ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या फोनमध्ये मीडियाटेकच्या Dimensity 1080 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे, जोडीला Mali-G68 GPU आहे. दोन्ही फोन्स Android 12 आधारित MIUI 13 वर चालतात.

यातील Redmi Note 12 Pro स्मार्टफोनमध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एफ/1.88 अपर्चर असलेला 50MP Sony IMX766 सेन्सर मुख्य कॅमेऱ्याचे काम करतो, जो 6P लेन्स, OIS ला सपोर्ट करतो. सोबत 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi Note 12 Pro+ मध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. परंतु यातील मुख्य कॅमेरा एफ/1.65 अपर्चर असलेला 200MP Samsung HPX सेन्सर आहे, जो 7P लेन्स, ALD कोटिंग आणि OIS ला सपोर्ट करतो. जोडीला 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये देखील 16MP चा सेल्फी सेन्सर मिळतो. हे देखील वाचा: बजेट फ्रेंडली Realme 10 Series चा लाँच कन्फर्म! लाँच पूर्वीच लीक झाले स्पेसिफिकेशन्स

कनेक्टिव्हिटीसाठी दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.0, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट चार्जिंग व डेटा ट्रान्सफरसाठी देण्यात आला आहे. Redmi Note 12 Pro स्मार्टफोनमधील 5000mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर Note 12 Pro+ मधील बॅटरी 120W फास्ट चार्जिंग स्पीडला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो, तसेच फोन्स स्टिरियो स्पिकर्स आणि एक्स अ‍ॅक्सिस लिनियर मोटारला सपोर्ट करतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here