Categories: बातम्या

रोज मिळेल 4जीबी डाटा, जियो ला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल ने सादर केला फक्त 149 रुपयांचा हा दमदार प्लान

रिलायंस जियो ने कालच आपल्या जुने प्लान्स अपडेट करत मर्यादित कालावधी साठी रोज 1.5जीबी अतिरिक्त डाटा देण्याची घोषणा केली आहे. जियो च्या या आॅफर मध्ये ग्राहकांना त्याच किंमतीत दुप्पट डाटा पण मिळत आहे. जियो च्या या आॅफर ला उत्तर म्हणून सरकारी टेलीकॉम कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड ने पण आपला फासा टाकला आहे. बीएसएनएल ने 149 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे ज्यात एक महिन्यासाठी रोज 4जीबी इंटरनेट डाटा मिळेल.

बीएसएनएल ने 149 रुपयांचा स्पेशल प्लान सादर केला आहे जो ए​क प्रोमोशनल पॅक आहे. हा प्लान कंपनी च्या प्रीपेड ग्राहकांसाठी आहे जो 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या प्लान अंतर्गत बीएसएनएल 28 ​दिवसांसाठी रोज 4जीबी इंटरनेट डाटा देईल. म्हणजे 28 ​दिवसांमध्ये यूजर्सना एकूण 112 जीबी डाटा मिळेल. विशेष म्हणजे आज बाजारात 149 रुपयांमध्ये 112जीबी डाटा कोणतीही कंपनी देत नाही.

बीएसएनएल ने हा प्लान काल म्हणजे 14 जून पासून संपूर्ण देशात रोलआउट केला आहे जो 15 जुलै पर्यंत वैध असेल. बीएसएनएल ने हा प्लान खासकरून फीफा लवर्स साठी सादर केला आहे. फुटबॉल चा महाकुंभ म्हणून ओळखला जाणारा फीफा वर्ल्ड कप च्या निमित्ताने कंपनी ने हा स्पेशल प्लान सादर केला आहे जो भरपूर डाटा सह देशातील कोणत्याही कोपर्‍यात बसून मॅच बघण्याची संधी देतो.14 जून पासून 15 जुलै मधेच फीफा च्या मॅच होतील.

कंपनी ने डाटा पॅक च्या रूपता सादर केलेला हा प्लान फक्त इंटरनेट सेवा देईल. या प्लान अंतर्गत कोणत्याही प्रकारची वॉयस कॉलिंग व एसएमएस ची सुविधा मिळणार नाही. लक्षात असू दे की रिलायंस जियो आज आपल्या 149 रुपयांच्या प्लान मध्ये रोज 3जीबी डाटा देत आहे.

Published by
Siddhesh Jadhav