Exclusive: Realme 13 Pro भारतीय व्हेरिएंटचा कलर, रॅम आणि स्टोरेज ऑप्शन आले समोर

Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ स्मार्टफोन यावर्षीच्या सुरूवातीमध्ये सादर केला होता. तसेच, आता या फोनचे अपग्रेडेड व्हर्जन Realme 13 Pro आणि Realme 13 Pro+ येण्याची बातमी समोर येत आहेत. या नवीन फोनला चीनच्या सोबत भारतात पण सादर केले जाऊ शकते. जर Realme 13 सीरिजचा भारतीय व्हेरिएंट पाहता आमच्याकडे याची काही एक्सक्लूसिव्ह माहिती आहे, ज्यात कलर, रॅम व स्टोरेज व्हेरिएंटची माहिती समोर आली आहे.

Realme 13 Pro भारतीय व्हेरिएंट रॅम व स्टोरेज ऑप्शन

  • इंडस्ट्री सोर्सनुसार Realme 13 Pro चार RAM व स्टोरेज व्हेरिएंटसमध्ये येईल.
  • डिव्हाईसमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलसह 8GB RAM आणि 256GB चे स्टोरेज मिळेल.

  • तसेच फोनमध्ये 12GB च्या रॅमसह दोन स्टोरेज ऑप्शन 256GB व 512GB मिळतील.
  • Realme 13 Pro तीन कलर व्हेरिएंट्स: Monet Gold (8GB+128GB, Monet Purple (8GB+128G/256GB, 12GB+256GB/512GB आणि Sky Green (12GB+256GB/512GB मध्ये येऊ शकतात.

Realme 13 Pro+ व्हेरिएंट लीक

Realme 13 Pro+ मध्ये पण रियलमी 13 Pro प्रमाणेच रॅम व स्टोरेज पाहायला मिळू शकते. अलीकडेच आम्हाला मिळालेल्या एक्सक्लूसिव्ह बातमीनुसार या डिव्हाईसमध्ये 12GB पर्यंतच्या रॅम आणि 512GB पर्यंतच्या स्टोरेज असेल. तसेच स्मार्टफोनमध्ये नवीन 50MP 3X periscope कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Realme 13 Pro series या महिन्यामध्ये चीनमध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच अजून अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र लवकरच आम्हाला कंपनीकडून फोनबाबत काही बातमी येण्याची शक्यता आहे.

Realme 12 Pro+ 5G चे स्पेसिफिकेशन

  • स्क्रीन : रियलमी 12 प्रो प्लस 5 जी फोनमध्ये 2412 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेली 6.7 इंचाची FHD+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा Curved Vision डिस्प्ले आहे जो OLED पॅनलवर बनला आहे तसेच 120Hz रिफ्रेश रेटवर चालतो. यावर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 240 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 2160 पीडब्ल्यूएम डिमिंग आणि 950 निट्स ब्राईटनेस सारखे फिचर्स मिळतात.
  • परफॉर्मन्स : हा फोन अँड्रॉईड 14 आधारित रियलमी युआय 5.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात 4 नेनौमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला Qualcomm Snapdragon 7s Gen 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.4 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्यामध्ये सक्षम आहे. तसेच ग्राफिक्ससाठी एड्रेनो 710 जीपीयू आहे.
  • मेमरी : रियलमीने आपल्या या मोबाईल फोनला 12GB डायनॉमिक रॅम टेक्नॉलॉजीसह केले आहे. ही टेक्नॉलॉजी 8 जीबी फिजिकल रॅमसह मिळून 20 जीबी पर्यंत तसेच 12 जीबी फिजिकल रॅमला 24 जीबी पर्यंत वाढवते.
  • बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50MP मेन सेन्सर, एफ/2.6 अपर्चर असलेला 64MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स तसेच 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे. यावर 120X Zoom आणि OIS टेक्नॉलॉजी मिळते.
  • फ्रंट कॅमेरा : इन्स्टाग्रामसाठी रिल्स बनविणे तसेच सेल्फी काढण्यासाठी रियलमी 12 प्रो+ 5 जी फोनमध्ये 32MP Front Camera देण्यात आला आहे. हा सोनी IMX615 सेन्सर आहे जो एफ/2.4 अपर्चरवर चालतो तसेच 90 फिल्ड ऑफ व्यूला सपोर्ट करतो. हा कॅमेरा AI Beauty Algorithm वर चालतो जो स्मूद आणि अटरेक्टिव फोटो काढण्यामध्ये सक्षम आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000mAh Battery देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 67W SUPERVOOC Charge टेक्नॉलॉजी आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार फक्त 19 मिनिटामध्ये बॅटरीला 0 ते 50 टक्क्यांपर्यंत तसेच 48 मिनिटामध्ये फुल 100% करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here