OnePlus Nord CE 4 Lite लवकर होऊ शकतो लाँच, एनबीटीसी साईटवर झाला लिस्ट

वनप्लस काही दिवसांपासून आपल्या Nord C4 स्मार्टफोनच्या लाईट व्हर्जनवर काम करत आहे. याला जागतिक आणि भारतीय बाजारात OnePlus Nord CE 4 Lite नावाने एंट्री दिली जाऊ शकते. हा सध्या एनबीटीसी सर्टिफिकेशनवर स्पॉट झाला आहे. तसेच याआधी फोनला BIS आणि इतर लिस्टिंग साईटवर पण पाहिले गेले होते. ज्यामुले याचे लाँच लवकर असण्याची शक्यता आहे. चला, पुढे लेटेस्ट माहितीला सविस्तर जाणून घेऊया.

OnePlus Nord CE 4 Lite एनबीटीसी लिस्टिंग

  • वनप्लसचा नवीन स्मार्टफोन NBTC साईटवर मॉडेल नंबर CPH2621 सह लिस्ट करण्यात आला आहे.
  • तुम्ही खाली लिस्टिंग फोटोमध्ये पाहू शकता की मोबाईलचे नाव Nord CE 4 Lite 5G पण कंफर्म झाले आहे. यात ब्रँडचे नाव चुकीचे लिहिले आहे.
  • मोबाईलचे नाव आणि मॉडेल नंबर व्यतिरिक्त या प्लॅटफॉर्मवर जास्त माहिती नाही, परंतु हा लवकर लाँच इशारा समजला जाऊ शकतो.

OnePlus Nord CE 4 Lite 5G चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: OnePlus Nord CE 4 Lite 5G फोनमध्ये युजर्सना 6.67 इंचाचा FHD+अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 2412 x 1080 पिक्सल रिजॉल्यूशन मिळण्याची शक्यता आहे.
  • चिपसेट: फोनचा प्रोसेसर पाहता यात युजर्सना क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेट दिला जाऊ शकतो.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता डिव्हाईसमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळण्याची चर्चा आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलची इतर लेन्स लावली जाऊ शकते. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलची लेन्स दिली जाऊ शकते.
  • बॅटरी: मोबाईलला चालवण्यासाठी डिव्हाईसमध्ये 5500mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. याला फास्ट चार्ज करण्यासाठी 80 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.
  • स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते.
  • ओएस: स्मार्टफोनला लेटेस्ट अँड्रॉईड 14 सह सादर केले जाऊ शकते त्याचबरोबर कंपनी दोन ओएस अपडेट आणि 3 वर्षाचे सिक्योरिटी अपडेट पण प्रदान करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here