BSNL आणि Vodafone-Idea ने बदलले आपले नाव, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आणि प्राइवेट कंपनी Vodafone Idea ने आपल्या नेटवर्क ऑपरेटर नावात बदल केला आहे. हे ऐकून तुम्हाला पण हैराणी होत असेल कि कंपन्यांनी असे का केले असेल. यामागील कारण असे कि जगभरात पसरलेल्या कोरोना सारख्या महामारी बाबत यूजर्सना जागरूक करण्यासाठी कंपन्यांनी आपल्या नेटवर्कच्या नावात बदल केला आहे.

सध्या Covid-19 मुळे चिंताग्रस्त दिसत आहेत. हेच लक्षात घेऊन टेलिकॉम कंपन्या आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. काहींना काही कारण शोधून त्या यूजर्सना घरात थांबण्यासाठी लोकांना जगरुक करत आहेत. कोरोना वायरस संक्रमण रोखण्यासाठी कोणताही उपाय सापडेलला नाही आणि फक्त सोशल डिस्टेंसिंगच्या माध्यमातून या रोगाला मात दिली जाऊ शकते.

नेटवर्कची नवीन नावे

कोरोना वायरस बाबत लोकांना जागरुक करण्यासाठी बीएसएनएल यूजर्सना मोबाईल स्क्रीन वर BSNL Mobile च्या जागी आता ‘BSNL Stay at Home’ दिसत आहे. तर दुसरीकडे वोडाफोन नेटवर्कचे नाव फोनच्या स्क्रीन वर ‘Vodafone-Be Safe’ असे दिसत आहे.

वाढवली वैधता

इतकेच नव्हे तर दोन्ही कंपन्यांनी इतर टेलीकॉम कंपन्यांप्रमाणे एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन च्या काळात कोणत्याही यूजरला रिचार्ज करावा लागू नये यासाठी कंपन्यांनी यूजर्सच्या प्रीपेड प्लानची वैधता वाढवली आहे. बीएसएनएलने आपल्या प्रीपेड प्लान्सची वैधता 20 एप्रिल 2020 पर्यंत वाढवली आहे. त्याचबरोबर कंपनी सर्व सब्सक्राइबर्सना 10 रुपयांचा टॉक टाइम पण देत आहे. तर दुसरीकडे वोडाफोन-आइडियाने आपल्या प्रीपेड प्लानची वैधता 17 एप्रिल पर्यंत वाढवली आहे आणि फ्री टॉक टाइम दिला जात आहे.

चीनच्या वुहान मध्ये नोव्हेंबर 2019 पासून कोरोना संक्रमणाची सुरवात झाली होती. आज या वायरसच्या विळख्यात चीन समवेत संपूर्ण जग आले आहे. हा खतरनाक वायरस पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात 21 दिवसांच्या बंदाची घोषणा केली आहे. म्हणजे 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here