4,000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला ए44 पावर, किंमत फक्त 5,999 रुपये

टेक कंपनी आईटेल ने ऑगस्ट महिन्यात एक साथ तीन नवीन स्मार्टफोन आईटेल ए45, आईटेल ए22 आणि आईटेल ए22प्रो लॉन्च केले होते. या तिन्ही स्मार्टफोनची किंमत 6,000 रुपयांपेक्षा कमी होती. तर आज पुन्हा देशात आपले डिवाईस वाढवत आईटेल ने अजून एक नवीन स्मार्टफोन ए44 पावर लॉन्च केला आहे. आईटेल ने ए44 पावर एंडरॉयड गो एडिशन वर सादर केला आहे जो शानदार प्रोसेसिंग करू शकतो.

आईटेल ए44 पावर कंपनी ने 480 x 960 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.45-इंचाच्या एफडब्ल्यूवीजीए फुल स्क्रीन सह सादर केला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो गो एडिशन वर सादर करण्यात आला आहे जो 64बिट 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर चालतो. एंडरॉयड गो असल्यामुळे या फोन कमी रॅम असूनही हा फास्ट व लॅग ​फ्री प्रोसेसिंग करू शकतो.

iTel A44 Power

कंपनी ने या फोन मध्ये 1जीबी की रॅम दिला आहे. हा फोन 8जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 32जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ए44 पवार डुअल ​रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 5-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एक सेकेंडरी वीजीए कॅमेरा आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 2-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

आईटेल ए44 पावर कपंनी ने 4जी वोएलटीई सपोर्ट सह आणला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. ए44 पावर मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ओटीजी ला सपोर्ट करतो ज्यामुळे फोनच्या बॅटरीचा वापर दुसऱ्या फोनला चार्ज करण्यासाठी केला जाऊ शकतो. आईटेल ए44 पावर एक्वा ब्लू, शॅम्पेन गोल्ड आणि डिप ग्रे कलर मध्ये 5,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here