एक वर्षाची वैधता असलेला BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन; भरपूर डेटा आणि कॉलिंग

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL गेले कित्येक दिवस खाजगी कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea ला चांगली टक्कर देत आहे. BSNL कडे असे अनेक प्लॅन्स आहेत जे बऱ्याच बाबतीत प्रायव्हेट कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅन्सच्या तुलनेत शानदार आहेत. एकीकडे खाजगी कंपन्यांनी भाववाढ केली आहे आणि दुसरीकडे बीएसएनएलचे हे स्वस्त प्लॅन्स ग्राहकांना आकर्षित देखील करत आहेत. आज आम्ही तुम्हाला BSNL च्या अशा एका प्लॅनची माहिती देणार आहोत जो कंपनीचा सर्वात स्वस्त वार्षिक वैधता प्लॅन आहे. हा रिचार्ज केल्यावर तुम्हाला प्रत्येक महिन्याला रिचार्ज करण्याची काळजी करावी लागणार नाही. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये युजर्सना डेटा, कॉलिंग, SMS सह अनेक बेनिफिट्स मिळत आहे. पुढे आम्ही तुम्हाला या प्लॅनबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.

रोजचा खर्च 4 रुपये 1 पैसे

BSNL च्या 1499 रुपयांचा प्लॅनची वैधता 365 दिवस आहे, जो कंपनीचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन आहे. जर आपण एकूण खर्च 365 दिवसांवर विभागला तर या प्लॅनसाठी तुम्हाला रोज 4 रुपये 1 पैसे खर्च करावे लागतील. जे इतर कंपन्यांच्या तुलनेत कितीतरी कमी आहेत. इतक्या कमी खर्चात कंपनीनं बेनिफिट्स मात्र कमी केले नाहीत. जास्त वैधता आणि कमी किंमत असून देखील या प्लॅनमध्ये कॉलिंगसह डेटा आणि एसएमएस बिनफिट्स मिळत आहेत.

1499 रुपयांच्या बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये डेली 100 एसएमएस मोफत पाठवता येतील. इतकेच नव्हे तर 365 दिवसांच्या वैधतेमध्ये ग्राहकांना एकूण 24 जीबी इंटरनेट डेटा दिला जातो. वर्षभरासाठी हा डेटा कमी वाटत असला तरी जे ग्राहक आपल्या ऑफिस आणि घरात सतत वायफायशी कनेक्टड असतात त्यांच्यासाठी हा उत्तम प्लॅन ठरू शकतो.

या रिचार्जमध्ये सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. त्यामुळे तुम्ही जर जास्त कॉलिंग करत असाल आणि डेटासाठी अन्य पर्याय उपलब्ध असतील तर तुम्ही वर्षभराची वैधता असलेला हा प्लॅन अ‍ॅक्टिव्हेट करू शकतात. हा प्लॅन मिळवण्यासाठी ग्राहक BSNL वेबसाईटवर जाऊ शकतात किंवा त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 123 या नंबरवर PLAN BSNL1499 असा एसएमएस करू शकतात.

15 ऑगस्टला BSNL करू शकते मोठी घोषणा

BSNL च्या 5जी लाँच बद्दल आतापर्यंत फक्त एकच बातमी आली होती परंतु मोठ्याप्रमाणावर 4G ची चर्चा आहे. एका रिपोर्टनुसार, BSNL TCS सह मिळून सुरुवातीला 4G कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी लाँच करेल, जिथे जास्त महसूल असेल. 4G-रेडीचा इंफ्रास्ट्रक्चर तयार आहे आणि हा देशात रोल आउट केला जाईल. भारतात 5जी नेटवर्क नो स्टॅन्डअलोन (NSA) मोडमध्ये 15 ऑगस्टला लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे युजर्सना एन्ड-टू-एन्ड 5G नेटवर्कची 5जी सर्व्हिस दिली जाईल परंतु यात बीएसएनएलच्या समावेश असेल की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here