Realme 12 आणि 12 Pro + च्या किमतीत कमालीची घट, जाणून घ्या किंमत

रियलमी 13 प्रो 5 जी आणि रियलमी 13 प्रो+ 5 जी फोन या महिन्यात 30 जुलैला भारतात लाँच होईल. तसेच, याआधी कंपनीने या डिव्हाईसच्या येण्याच्या आधी Realme 12 आणि 12 Pro + च्या किंमतीत कपात केली आहे. आम्हाला याची माहिती ऑफलाईन रिटेलर्सने दिली आहे. चला पुढे तुम्हाला या दोन्ही फोनची नवीन किंमत आणि फोनचे स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती देत आहोत.

Realme 12 Pro 5G ची नवीन किंमत

मॉडल लाँच किंमत किंमत कपात     नवीन किंमत
8GB RAM + 128GB Storage ₹25,999 ₹2000 ₹23,999
8GB RAM + 256GB Storage ₹26,999 ₹2000 ₹24,999
12GB RAM + 256GB Storage ₹28,999 ₹2000 ₹26,9999

Realme 12 Pro Plus 5G ची नवी किंमत

मॉडल लाँच किंमत किंमत कपात नवीन किंमत
8GB RAM + 128GB Storage ₹29,999 ₹2000 ₹27,999
8GB RAM + 256GB Storage ₹31,999 ₹2000 ₹29,999
12GB RAM + 256GB Storage ₹33,999 ₹2000 ₹31,999

realme 12 Pro स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: रियलमी 12 प्रो 5 जी फोनमध्ये 2412 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही कर्व्ड ओएलईडी स्क्रीन आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. तसेच यात 240 हर्ट्स टच सॅम्पलिंग रेट, 950 निट्स ब्राईटनेस आणि 2160 ​हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंग सारखे फिचर्स पण मिळतात. हा रियलमी मोबाईल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर: Realme 12 Pro 5G अँड्रॉईड 13 वर लाँच झाला आहे जो रियलमी वनयुआय 5.10 सोबत मिळून चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 710 जीपीयू आहे.
  • कॅमेरा: Realme 12 Pro 5G ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात OIS टेक्नॉलॉजी असलेला 50 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स882 मेन सेन्सर देण्यात आला आहे जो 32 मेगापिक्सल आयएमएक्स 709 टेलीफोटो लेन्स तसेच 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल सेन्सरसह मिळून चालतो. तसेच सेल्फी काढणे आणि रिल्स बनविण्यासाठी यात 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी रियलमी 12 प्रो 5 जी फोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हा मोबाईल 67 वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आहे. फोनला यूएसबी टाईप-सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज केले जाऊ शकते.

Realme 12 Pro+ 5G स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: रियलमी 12 प्रो प्लस 5 जी फोनमध्ये 2412 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा कर्व्ड ऐज डिस्प्ले आहे जो ओएलईडी पॅनलवर बनला आहे तसेच 120 हर्ट्स रिफ्रेश रेटवर चालतो.
  • प्रोसेसर: रियलमी 12 प्रो+ 5 जी फोन अँड्रॉईड 14 ओएसवर लाँच झाला आहे जो रियलमी युआय 5.0 सह मिळून चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 4 नैनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • कॅमेरा: फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50MP मेन सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.6 अपर्चर असणाऱ्या 64MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स तसेच 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्ससह मिळून चालतो. यात 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा सोनी चलामएक्स 615 सेन्सर आहे जो एफ/2.4 अपर्चरवर चालतो.
  • बॅटरी: रियलमीचा हा स्मार्टफोन 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 67 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही टेक्नॉलॉजी फक्त 19 मिनिटामध्ये बॅटरीला 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकते तसेच 48 मिनिटांमध्ये फुल 100% करू शकते. या फोनमध्ये ड्युअल चार्ज पंप टेक्नॉलॉजी पण मिळते, जी करंटला संतुलित बनविते.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here