रिलायन्स जिओने अलीकडेच आपले सर्व रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत आणि 3 जुलैपासून वाढलेल्या किमती आता लागू झाल्या आहेत. मात्र, या दरवाढीच्या वेळी जिओने आपल्या वापरकर्त्यांना काहीसा दिलासा दिला होता आणि त्याच्या पोर्टफोलिओमध्ये 149 आणि 179 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनला जागा दिली होती. परंतु, हा दिलासा अल्पकाळ टिकला कारण कंपनीने हे दोन्ही रिचार्ज आपल्या साईट आणि जिओ ॲपवरून गुपचूप काढून टाकले आहेत.
आता हा आहे जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन
हे स्वस्त रिचार्ज बंद झाल्याचा अर्थ असा आहे की जिओ सिम सक्रिय ठेवणे पूर्वीपेक्षा महाग झाले आहे. कारण आता जिओ रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त वैधता असणारा रिचार्ज प्लॅन 189 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 2 जीबी मोबाईल डेटा, अमर्यादित कॉलिंग, 300 एसएमएस आणि जिओ ॲप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. त्याची वैधता 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे.
टीप: या निर्णयामुळे ज्या ग्राहकांना कमी किमतीचे रिचार्ज प्लॅन हवे आहेत त्यांना धक्का बसेल. आता त्यांना कॉल करण्यासाठी जास्त किंमतीचा रिचार्ज प्लॅन निवडावा लागेल.
बंद केलेल्या प्लॅनमध्ये मिळत होते हे फायदे
- जिओचा 149 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनची किंमत 149 रुपये होती. त्याचवेळी या प्रीपेड रिचार्जमध्ये 14 दिवसांसाठी एकूण 14 जीबी डेटा मिळत होता. म्हणजेच तुम्हाला दररोज 1 जीबी इंटरनेट डेटा ऑफर करण्यात आला होता. या प्लॅनसोबत जिओने कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधा दिली होती.
- जिओचा 179 रुपयांचा प्लॅन: जिओच्या 1 जीबी दैनंदिन डेटा प्लॅनसाठी दुसरा पर्याय म्हणजे 179 रुपयांचा प्लॅन होता. यामध्ये तुम्हाला 18 दिवसांची वैधता मिळत होती आणि दररोज 1 जीबी डेटाचा लाभ देखील मिळत होता. म्हणजेच तुम्हाला 18 दिवसात एकूण 18 जीबी डेटा मिळत होता. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील दिले जात होते. या सर्वांसह तुम्हाला जिओ ॲपचे फायदे मोफत मिळत होते.
जिओचा 1 जीबी डेटा असलेला सर्वात स्वस्त प्लॅन झाला लाँच
- जिओचा 209 रुपयांचा प्लॅन: जिओच्या 1 जीबी दैनंदिन डेटा प्लॅनसाठी पहिला पर्याय म्हणजे 209 रुपयांचा प्लॅन. यामध्ये तुम्हाला 22 दिवसांची वैधता मिळेल आणि दररोज 1 जीबी डेटाचा लाभ मिळेल. म्हणजेच तुम्हाला 22 दिवसात 22 जीबी डेटा मिळेल. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील दिले जात आहेत. या सर्वांसह तुम्हाला जिओ ॲपचे फायदे मोफत फायदे मिळतील.