OnePlus ला फ्लॅगशिप कीलर नावाने ओळखले जाते आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या ब्रँडने महाग स्मार्टफोन्स मध्ये येणारे ताकदवान स्पेसिफिकेशन्स किफायतशीर किंमतीत उपलब्ध केले होते. निवडक मॉडेल्स लॉन्च करून हि कंपनी भारतात हिट झाली होती त्यानंतर मार्केट मध्ये आपला विस्तार करण्याच्या उद्देशाने वनप्लसने अलीकडेच मिडबजेट सेग्मेंटचा पहिला फोन OnePlus Nord लॉन्च केला. आता बातमी येत आहे कि वनप्लस आपल्या नवीन लो बजेट स्मार्टफोन वर काम करत आहे जो OnePlus Clover नावाने लॉन्च केला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार या फोनची किंमत फक्त 15,000 रुपयांच्या आसपास असेल.
OnePlus Clover ची माहिती टेक वेबसाइट एंडरॉयड सेंट्रलच्या माध्यमातून समोर आली आहे. या वेबसाइटने आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये दावा केला आहे कि वनप्लस नवीन स्मार्टफोन क्लॉवर वर काम करत आहे आणि हा ब्रँडचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त मोबाईल फोन असू शकतो. सांगण्यात आले आहे कि हा फोन 200 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. हि किंमत इंडियन करंसीनुसार 15,000 रुपयांपेक्षा पण कमी आहे. रिपोर्ट मध्ये फोनचे नाव सांगण्यासोबत याचे स्पेसिफिकेशन्स पण शेयर करण्यात आले आहेत. खास बाब अशी आहे कि OnePlus Clover कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन पण असेल.
OnePlus Clover
वनप्लस क्लॉवर चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या रिपोर्टनुसार हा फोन 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल जो आक्सिजन ओएस 10 सह चालेल. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू मिळू शकतो.
OnePlus च्या या नवीन फोन बाबत सांगण्यात आले आहे कि हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आणि तेवढाच अपर्चर असलेली अजून एक 2 मेगापिक्सलची लेंस मिळू शकते. पण सेंसर्स कोणते असतील तसेच फोनचा सेल्फी कॅमेरा सेग्मेंट कसा असेल हि माहिती अजून समोर आलेली नाही.
OnePlus Clover चा एकच वेरिएंट सध्या रिपोर्ट मध्ये समोर आला आहे ज्यात 4 जीबी रॅम मेमरी असल्याचे सांगण्यात आले आहे. या फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल तसेच फोन मध्ये 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स पण आहेत. वनप्लस क्लॉवर एक 4जी फोन असेल, आशा आहे कि डुअल सिम सपोर्ट सह येईल.
वनप्लसच्या या आगामी फोन बाबत सांगण्यात आले आहे कि हा 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च केला जाईल. तसेच फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्याचे पण समोर आले आहे. रिपोर्टनुसार या फोनच्या माध्यमातून वनप्लस इंडियन मार्केट टारगेट करणार आहे तसेच फोन 200 यूएस डॉलर म्हणजे जवळपास 15,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
















