वनप्लस ने आपला नवीन फ्लॅगशिप कीलर स्मार्टफोन वनप्लस 6 कालच अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला होता आणि भारतातील वनप्लस फॅन्स साठी कंपनी ने आज आपला हा दमदार स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च केला आहे. वनप्लस 6 देशात 34,999 रुपयांच्या सुरवाती किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे जो आॅनलाईन शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.
वनप्लस ने भारतात वनप्लस 6 2 वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. एक वेरिएंट 6जीबी रॅम सह 64जीबी मेमरी ला सपोर्ट करतो तर दुसरा वेरिएंट 8जीबी रॅम सह 128जीबी मेमरी सह सादर करण्यात आला आहे हे दोन्ही वेरिएंट क्रमश: 34,999 रुपये आणि 39,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आले आहेत. या दोन्ही वेरिएंट्स सह कंपनी ने वनप्लस 6 चा मारवल स्पेशल एवेंजर्स इनफिनिटी वॉर एडिशन पण सादर केला आहे जो 8जीबी रॅम सह 256जीबी मेमरी ला सपोर्ट करतो. हा स्पेशल एडिशन देशात 44,999 रुपयांच्या किंमतीत सेल साठी उपलब्ध होईल.
वनप्लस 6 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या नॉच डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 2280 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.28-इंचाची एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे.
हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आॅक्सीजन ओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे जो लवकरच एंडरॉयड पी वर अपडेट होईल. वनप्लस 6 मध्ये 2.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आॅक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे त्याचबरोबर हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू देण्यात आला आहे.
वनप्लस 6 च्या फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये डुअल एलईडी फ्लॅश सह 20-मेगापिक्सल चा सोनी आईएमएक्स 376के सेंसर आणि 16-मेगापिक्सल चा सोनी आईएमएक्स 519 कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सल चा सोनी आईएमएक्स 371 सेल्फी कॅमेरा सेंसर आहे.
वनप्लस 6 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो तसेच फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. या फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. फोन च्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. या फोन मध्ये टाईप-सी सपोर्ट सह डॅश चार्जिंग सपोर्ट वाली 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
वनप्लस 6 ची उपलब्धता पाहता वनप्लस 6 चा 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट तसेच 8जीबी रॅम/128जीबी मेमरी वेरिएंट 22 मे पासून सेल साठी उपलब्ध होईल. तर फोन चा 8जीबी रॅम/256जीबी वेरिएंट साठी 29 मे ची वाट बघावी लागेल. वनप्लस 6 मिरर ब्लॅक, मीडनाईट ब्लॅक आणि सिल्क व्हाईट कलर मध्ये सादर करण्यात आला आहे.