एकही रुपया जास्त न देता मिळवा 74GB डेटा; अशी आहे BSNL ची जबरदस्त ऑफर

Highlights

  • BSNL च्या दोन प्लॅनमध्ये 31 जानेवारी, 2023 पर्यंत एक्स्ट्रा डेटा मिळत आहे.
  • बीएसएनएल 2,399 रुपये आणि 2,999 रिचार्ज प्लॅनवर ही ऑफर देत आहे.
  • BSNL Karnataka टेलीकॉम सर्कलमध्ये ही ऑफर वैध आहे.

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) युजर्सना दोन प्रीपेड प्लॅन्सवर 31 जानेवारी, 2023 पर्यंत एक्स्ट्रा डेटा ऑफर करत आहे. म्हणजे ग्राहक अतिरिक्त पैसे खर्च न करता डेटा वापरू शकतील. परंतु या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुमच्यकडे फक्त दोन दिवस उरले आहेत. कंपनीची ही ऑफर 31 जानेवारी 2023 पर्यंत लागू आहे. तसेच ज्या प्लॅन्ससह एक्स्ट्रा डेटा मिळत आहे ते 2,399 रुपये आणि 2,999 रुपयांचे रिचार्ज प्लॅन आहेत. या दोन्ही प्लॅन्ससह, युजर्सना ऑफर कालावधीत रिचार्ज केल्यावर अतिरिक्त डेटा मिळणार आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनमध्ये बीएसएनएल युजर्सना कशाप्रकारे के फायदे मिळतात.

अशाप्रकारे मिळेल 74GB डेटा

BSNL Karnataka सर्कल ट्विटर हँडलनं केलेल्या ट्विटनुसार ही ऑफर 18 जानेवारी पासून 31 जानेवारी पर्यंत वैध आहे. या कालावधीत युजर PV-2399 आणि PV-2999T prepaid recharge आपल्या फोनवर करू शकतात आणि अतिरिक्त 74GB डेटा मोफत मिळवू शकतात. हा प्लॅन अन्य सर्कल्समध्ये उपलब्ध आहे की नाही यासाठी तुम्हाला कंपनीच्या कस्टमर सपोर्टशी संपर्क साधावा लागेल. 2399 रुपये आणि 2999 रुपयांचा प्लॅनमध्ये डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे दिले जात आहेत. हे देखील वाचा: तब्बल 100W चा चार्जिंग स्पीड! पुढील आठवड्यात येतोय OnePlus 11R; कंपनीनं केली अधिकृत घोषणा

BSNL Rs 2999 Recharge: BSNL च्या 2999 रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सना 395 दिवसांची वैधता मिळते. म्हणजे ही वैधता एक वर्षापेक्षाही जास्त आहे. तसेच प्लॅनमध्ये युजर्सना डेली 2GB डेटा दिला जात आहे. त्याचबरोबर ऑफर अंतर्गत युजर्सना मोफत 75GB data एक्स्ट्रा मिळेल. अशाप्रकारे ग्राहकांना एकूण 865GB डेटा वापरता येईल. या प्लॅनमध्ये व्हॉइस कॉलिंग अनलिमिटेड मिळते. कोणत्याही नेटवर्कवर अमर्याद बोलता येईल. त्याचबरोबर रिचार्जमध्ये प्रतिदिन 100 SMS, PRBT आणि Eros Now चा 30 दिवसांचा फ्री अ‍ॅक्सेस देखील मिळतो. हे देखील वाचा: …म्हणून रणबीर कपूरनं सेल्फी काढणाऱ्या फॅनचा फोन दिला फेकून; खरं कारण आलं समोर

BSNL चा 2399 रुपयांचा प्लॅन: BSNL च्या 2399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 365 दिवसाची वैधता मिळते, त्यामुळे एकदा रिचार्ज केल्यावर वर्षभराची काळजी मिटून जाते. तसेच, युजर्सना प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस देखील मिळतात. रिचार्जमध्ये देखील युजर्सना 74 GB डेटा एक्सट्रा मिळतो. अशाप्रकारे ग्राहकांना एकूण 802GB डेटा वर्षभरात वापरता येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here