एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्हीआय प्रमाणे बीएसएनएल देखील विविध प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. यापैकी काही प्लॅन्स सोबतच अनेक ओटीटीचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. जर तुम्ही बीएसएनएल वापरकर्ता असाल आणि ओटीटी प्लॅन्स शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. वास्तविक, आज आम्ही तुमच्यासाठी काही लोकप्रिय बीएसएनएल प्रीपेड प्लॅन्सची यादी तयार केली आहे जी तुम्हाला मोफत कॉलिंग आणि डेटासह मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन प्रदान करेल.
BSNL टॉप ओटीटी रिचार्ज प्लॅन
रिचार्ज प्लॅन | फायदे | वैधता |
BSNL Rs. 98 | रोज 2GB डाटा, इरोज नाऊ सब्सक्रिप्शन | 22 दिवस |
BSNL Rs. 247 | अनलिमिटेड कॉलिंग, रोज 3GB डाटा, Eros Now आणि BSNL Tunes | 30 दिवस |
BSNL Rs. 429 | रोज 1 जीबी डाटा, 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग, Eros Now | 81 दिवस |
BSNL Rs. 447 | बीएसएनएल ट्यून्स आणि इरोस नाऊ सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड कॉलिंग, एकून 100GB डाटा | 60 दिवस |
BSNL Rs. 1,999 | सॉन्ग चेंज, लोकधुन कंटेंट आणि इरोस नाऊ, अनलिमिटेड कॉलिंग, रोज 3GB डाटा | 365 दिवस |
बीएसएनएल 98 रुपयांचा रिचार्ज
हा प्रीपेड पॅक दररोज 2GB डेटा प्रदान करतो आणि त्याची वैधता 22 दिवस आहे. म्हणजेच संपूर्ण वैधता कालावधीत युजरला 44GB डेटा मिळेल. यासोबतच रिचार्जमध्ये ईरॉस नाऊचे विनामूल्य सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध असेल, ज्याच्या मदतीने वापरकर्ते उत्कृष्ट चित्रपट पाहू शकतील.
बीएसएनएल 247 रुपयांचा रिचार्ज
बीएसएनएलचा हा पॅक मनोरंजक फायदे देतो. त्याच वेळी हा पॅक स्थानिक आणि एसटीडी नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलसह येतो. तसेच यामध्ये दररोज 3GB डेटा देखील मिळतो. ही डेटा मर्यादा संपल्यानंतरही तुम्ही 80Kbps च्या वेगाने इंटरनेट सर्फ करू शकता. हा प्लॅन 30 दिवसांची वैधता देतो आणि यात Eros Now आणि BSNL Tunes चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
बीएसएनएल 429 रुपयांचा रिचार्ज
बीएसएनएलचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन दिल्ली आणि मुंबईतील रोमिंग क्षेत्रांसह कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर करतो. या पॅकमध्ये दररोज 1GB डेटा आणि दररोज 100 SMS मोफत मिळतात. याव्यतिरिक्त यात Eros Now चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते आणि यामध्ये 81 दिवसांची वैधता मिळते.
बीएसएनएल 447 रुपयांचा रिचार्ज
447 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 60 दिवसांची वैधता देतो. या प्लॅनसह वापरकर्त्यांना मोफत बीएसएनएल ट्यू्न्स आणि ईरॉस नाऊचे सबस्क्रिप्शन मिळेल. कॉम्बो प्लॅन अमर्यादित व्हॉईस कॉल्स आणि दररोज 100 एसएमएससह येतो. याशिवाय, वापरकर्त्यांना कोणत्याही दैनिक मर्यादेशिवाय 100GB हाय-स्पीड डेटा देखील मिळतो.
बीएसएनएल 1,999 रुपयांचा रिचार्ज
BSNL चा PV999 प्रीपेड रिचार्ज प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. दीर्घकालीन प्लॅनमध्ये अनेक फायदे दिले जात आहेत. तुम्हाला भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलची सुविधा मिळते. तसेच यामध्ये दररोज 3GB डेटा देखील मिळत आहे. एकदा डेटा मर्यादा संपली की, वापरकर्ते 80Kbps च्या कमी गतीने इंटरनेट सर्फ करू शकतील. याशिवाय, प्रीपेड प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षासाठी अमर्यादित साँग चेंज, लोकधुन कन्टेन्ट आणि ईरॉस नाऊ चे मोफत सबस्क्रिप्शन सोबत पीआरबीटी ची सुविधा उपलब्ध आहे.