Jio ला BSNL कडून सडेतोड उत्तर! 94 रुपयांच्या रिचार्जमध्ये 45 दिवसांची वैधता, 3GB डेटा आणि कॉलिंग फ्री

5G ऑक्शनमध्ये जरी सरकारी कंपनी BSNL च्या हाती काहीच लागले नाही. परंतु प्रीपेड रिचार्जच्या बाबतीत अजूनही प्रायव्हेट टेलीकॉम ऑपरेटर्स Airtel, Vodafone India आणि Reliance Jio ला चांगली टक्कर देत आहे. बीएसएनएलकडे एकापेक्षा एक प्लॅन आहेत जे कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देतात आणि युजर्सना आकर्षित देखील करत आहेत. जर तुम्ही देखील प्रायव्हेट कंपन्यांच्या महागड्या प्लॅन्सना त्रासले असाल तर BSNL वर Number Port करून या प्लॅनचा फायदा घेऊ शकता. या प्लॅनची किंमत फक्त 94 रुपये आहे. परंतु यात मिळणारे बेनिफिट्स पाहून तुम्ही नक्कीच खुश व्हाल.

प्रायव्हेट कंपन्यांपेक्षा भारी प्लॅन!

बीएसएनएलच्या ज्या प्लॅनबाबत आम्ही बोलत आहोत तो BSNL Special Voucher आहे. या व्हाउचरची किंमत फक्त 94 रुपये आहे आणि यात एकूण 75 दिवसांची वैधता युजर्सना मिळते. किंमत आणि बेनिफिट्स पाहता हा प्लॅन युजर्सना खूप आवडू शकतो आणि दूसरी टेलिकॉम कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. चला जाणून घेऊया याबाबत सर्वकाही.

मिळेल 3GB डेटा

वर सांगितल्याप्रमाणे या प्लॅनची किंमत 94 रुपये आहे. तसेच युजर्सना 45 दिवसांची वैधता मिळते. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये युजर्सना 3GB डेटा देखील दिला जात आहे. हा डेटा कोणत्याही डेली लिमिटविना येतो. त्यामुळे प्लॅन सक्रिय असेपर्यंत तुम्ही कधीही आणि कितीही डेटा वापरू शकता.

फ्री कॉलिंग आणि एसएमएस

बेनिफिट्स इथेच थांबत नाहीत. या रिचार्ज प्लॅनमध्ये 200 व्हॉइस मिनट्स देखील दिले जात आहेत. यांचा वापर युजर्स कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी करू शकतात. जेव्हा हे मिनिट्स संपतील तेव्हा तुम्हाला 30 पैसे प्रति मिनट या दराने शुल्क द्यावे लागेल.

निष्कर्ष

एकंदरीत बीएसएनएलचा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन खूप व्हॅल्यू फॉर मनी वाटत आहे. ज्या युजर्सना कमी किंमतीत आपलं सिम सक्रिय ठेवायचं असेल ते या प्लॅनचा वापर करू शकतात. कारण इथे कमी कमी किंमतीत जास्त वैधता मिळत आहे, सोबतीला डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स तर आहेतच. जर तुम्ही बीएसएनएलचे ग्राहक असाल तर निश्चितच तुमच्यासाठी हा बेस्ट प्लॅन ठरू शकतो. जर तुमच्याकडे सरकारी कंपनीचं सिम नसेल तर तुम्ही तुमच्या वर्तमान नेटवर्कवरून बीएसएनएलमध्ये स्विच करून देखील अशा प्लॅन्सचा लाभ घेऊ शकता. सध्या बीएसएनएल 3G सर्व्हिस देत आहे. परंतु लवकरच संपूर्ण देशात BSNL 4G लाईव्ह होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

Note: बीएसएनएलचे प्लॅन्स संपूर्ण देशात वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळ्या बेनिफिट्ससह येतात. त्यामुळे रिचार्ज करण्याआधी प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची कंपनीच्या साईट किंवा बीएसएनएल कस्टमर केयरमधून माहिती मिळवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here