भारतातील दोन प्रमुख खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी 5जी सर्व्हिस सुरु केली आहे. परंतु सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL अजूनही 3जी सर्व्हिस देत आहे. त्यामुळे फक्त बीएसएनएलचे युजर्स नव्हे तर सर्वच भारतीय सरकारी कंपनीच्या 4G Launch ची आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्ही जर बीएसएनएल युजर्स असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे की कंपनी लवकरच आपली 4जी सर्व्हिस सुरु करणार आहे. यावेळी BSNL नं सांगितलं आहे की 2023 च्या उत्तरार्धात कंपनीचं 4G Network लाइव्ह केलं जाईल.
यंदा येत आहे BSNL 4G
BSNL नं एका युजरच्या ट्वीटला उत्तर देत सांगितलं आहे की BSNL 4G सर्व्हिसची सुरुवात यावर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत केली जाईल. अचूक तारीख आणि वेळेची माहिती अद्याप समोर आली नाही. एका युजरनं ट्विट केलं होतं की, “BSNL 4G अद्याप सुरु झालं नाही.” त्याला उत्तर देताना BSNL India नं लिहलं की, “4G सर्व्हिस 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत सुरु होईल.”
Bsnl 4g is not started yet ??? https://t.co/xnujtwewQm
— yogesh gujjar (@yogesh44808) January 7, 2023
यावरून स्पष्ट झालं आहे की महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जियो-एयरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलचं 4जी येत आहे. BSNL लोकल 4जी उपकरणांचा वापर करणार आहे, तसेच कंपनी तेजस नेटवर्कची मदत घेत आहे. सिस्टम इंटीग्रेटरच्या भूमिकेत TCS कंपनी दिसेल. तसेच सी-डॉट देखील बीएसएनएलला स्वदेशी 4जी सुरु करण्यास मदत करेल.
बीएसएनएल 5G देखील दूर नाही
BSNL 5G Service च्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो युजर्ससाठी एक चांगली बातमी आली आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) 5जी सर्विस (5G Service) 2024 मध्ये सुरु केली जाईल. ही माहिती खुद्द केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Union Telecom Minister Ashwini Vaishnaw) यांनी दिली आहे. एका कार्यक्रमात 5G सुरु करण्याची माहिती देण्यासह त्यांनी सांगितलं की BSNL 4G Network सुरु करण्यासाठी टीसीएस (TCS) आणि सी-डॉट (C-DOT) यांच्या संघाची निवड करण्यात आली आहे, यातील करारानुसार आदेश दिल्यानंतर वर्षभरात सरकारी टेल्कोचा नेटवर्क 5जीवर अपग्रेड करण्यात येईल.
ओडिसामधील जियो आणि एयरटेल 5G सेवा सुरु करण्यासाठी एका कर्यक्रमात आलेल्या केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी पत्रकारांशी सवांद साधताना सांगितलं की, “बीएसएनएल 2024 मध्ये 5जी सेवा सुरु करेल’. तसेच त्यांनी सांगितलं की यावर्षीच्या अखेरपर्यंत BSNL 4G नेटवर्क उभारलं जाईल.