आता ओपो घेऊन येत आहे फोल्डेबल फोन, सॅमसंगला मिळेल जबरदस्त टक्कर

टेक्नॉलजीचा सर्वात मोठ्या शो मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस (एमडब्ल्यूसी) 2019 लवकरच सुरु होणार आहे. या इवेंट मध्ये दिग्गज स्मार्टफोन कंपन्या नवीन स्मार्टफोन जगासमोर आणतील. यात ओपोचा पण समावेश होणार आहे. एमडब्ल्यूसी 2019 मध्ये सहभागी कंपन्यांपैकी एक असलेल्या ओपो ने घोषणा केली आहे कि ते 23 फेब्रुवारीला आपल्या इवेंटचे आयोजन करतील. अशा आहे कि कंपनी तेव्हा आपल्या नवीन फोन सोबत नवीन टेक्नोलॉजी असलेला डिवाइस सादर करू शकते.

टेक्नोलॉजीच्या या महाआयोजनसाठी अजून एक महीना आहे पण टेक प्रेमी आतापासूनच उत्सुक आहेत कि कोणता ब्रँड काय करणार आहे. ओपो ने आपल्या ट्विटर अकाउंट वरून या इवेंटची माहिती दिली आहे, ज्यावरून हिंट मिळत आहे कि कंपनी या इवेंट मध्ये आपला फोल्डेबल फोन सादर करू शकते. तसेच अलीकडेच कंपनी ने 10एक्स झूम एमडब्लूसी 2019 मध्ये सादर होणार असल्याची माहिती दिली होती. यात एक अल्ट्रा-वाइड कॅमेरा, मध्ये एक मेन कॅमेरा आणि ऑप्टिकल झूम एक्शन सह एक पेरिस्कोप असेल.ओपोच्या या नवीन वर्जन मध्ये तीन कॅमेरा असतील जे 1x ते 10x झूम पर्यंत सीमलेस ट्रांजिशन एनेबल करतील. यात एक शूटर आणि पेरिस्कोप ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सह चांगली पिक्चर क्वालिटी देईल.

अलीकडेच 91मोबाईल्सला डब्ल्यूआईपीओ म्हणजे वर्ल्ड इन्टलेक्चुअल पॉपर्टी ऑर्गनिजेशन्सच्या वेबसाइट वर ओपोच्या फोल्डेबल फोनची पेटेंट फाईल मिळाली आहे. ओपोचा हा फोल्डेबल फोन एडवांस आणि अनोखा असेल. सॅमसंगच्या फोल्डेबल फोन मध्ये फक्त घडी होणारी स्क्रीन दिली जाणार आहे तर ओपोचा हा फोन घडी होणाऱ्या डिस्प्ले सोबतच पॉप-अप कॅमेऱ्याने पण सुसज्ज असेल.

ओपोच्या या फोल्डेबल फोनच्या पेटेंट फाईल मध्ये फोनची स्केच ईमेज पण आहे, ज्यातून फोनची डिजाईन समजली आहे. या फोन मध्ये मोठी स्क्रीन असेल जी एखाद्या वही किंवा पुस्तकाप्रमाणे घडी होईल. ओपोचा हा फोन एकाच जागी घडी होईल तसेच घडी झाल्यानंतर फोनचा बॅक तसेच फ्रंट पॅनल एकाच साईजचे होतील. पण पेटेंट मधून समजले नाही कि ओपोचा फोल्डेबल फोन एकाच बाजूला घडी होईल कि दोन्ही बाजूला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here