बीएसएनएल घेऊन आली डाटा चा सुनामी फक्त 98 रुपयांमध्ये 39 जीबी डाटा, यापेक्षा स्वस्त कोणी नाही

सरकारी कंपनी बीएसएनएल वर नेहमी ढसाळ कारभाराचा आरोप केला जातो. कंपनी आपल्या योजना बदलण्यासाठी खुप वेळ घेते. पण मागील काही दिवसांमध्ये ज्याप्रकारे बीएसएनएल ने टॅरिफ बाबतीत जो वेग दाखवला आहे तो कौतुकास पात्र आहे. खासगी मोबाईल कंपन्यांकडून मिळणार्‍या स्पर्धेमुळे कंपनी ने खुप कमी किंमतीत आपले टॅरीफ प्लान सादर केले आहेत. काही दिवसांपूर्वी जियो, एयरटेल आणि वोडाफोन सह दुसर्‍या आॅपरेटर्सनी 100 रुपयांपेक्षा कमी रुपयांचे प्लान लॉन्च केले आहेत आणि ते बघून बीएसएनएल ने पण असाच नवीन प्लान सादर केला आहे ज्यात तुम्हाला भरपूर डाटा मिळत आहे.

कंपनी ने सुनामी डाटा प्लान नावाने ही आॅफर आणली आहे. या प्लान ची किंमत फक्त 98 रुपये आहे आणि या अंतर्गत यूजर्सना रोज 1.5जीबी डाटा मिळेल. सुनामी प्लान ची वैधता 26 दिवसांची आहे आणि यादरम्यान तुम्हाला एकूण 39जीबी डाटा मिळेल. कंपनी ने आपल्या ट्विटर अकाउंट वरून याची माहिती दिली.

विशेष म्हणजे जरी डाटा संपला तरी तुमची सुविधा बंद होणार नाही तर 3 पैसे प्रति 10 केबी च्या हिशोबाने डाटा शुल्क लागेल आणि इंटरनेट चालू राहील. पण या प्लान मध्ये अजून पर्यंत कॉलिंग चा उल्लेख केला गेला नाही. हा खासकरून डाटा साठी सादर करण्यात आला आहे. ​

फक्त दिल्ली आणि मुंबई सोडून भारतातील सर्व टेलीकॉम सर्किल मध्ये बीएसएनएल ची सेवा आहे. पण अजूनही जास्तीत जास्त ठिकाणी यांची 3जी सेवाच चालू आहे आणि काही सर्कल मध्ये कंपनी ने आपली 4जी सर्विस सुरू केली आहे.

साध्यतरी बीएसएनएल चा हा प्लान सर्वात स्वस्त प्लान म्हणू शकतो. रिलायंस जियो कडे 49 रुपयांचा प्लान आहे पण तो फक्त फीचर फोन जियोफोन साठी आहे. बीएसएनएल च्या या प्लानचा लाभ कोणत्याही फोन वर घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here