टिप्स अँड ट्रिक्स - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sun, 23 Jul 2023 11:36:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 व्हॉट्सअ‍ॅपवरून हाय क्वॉलिटी फोटो कसे पाठवायचे? जाणून घ्या नवीन ट्रिक https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-ne-high-quality-photo-kase-pathavayche/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-ne-high-quality-photo-kase-pathavayche/#respond Sun, 23 Jul 2023 11:31:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20955 WhatsApp जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर लोक रोज एकेमेकांना मेसेज, फोटो, व्हिडीओ आणि ऑडियोसह कॉलिंग देखील करतात. परंतु व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो शेयर करताना क्वॉलिटी कम्प्रेस होते. त्यामुळे युजर्स फोटो शेयर करण्यासाठी WhatsApp ला पर्याय शोधतात. व्हॉट्सअ‍ॅपनं युजर्सची ही समस्या सोडवण्यासाठी ‘Photo Quality’ फीचर सादर केलं आहे. ह्या फीचरच्या मदतीनं युजर्स हाय क्वॉलिटी फोटो शेयर […]

The post व्हॉट्सअ‍ॅपवरून हाय क्वॉलिटी फोटो कसे पाठवायचे? जाणून घ्या नवीन ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
WhatsApp जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर लोक रोज एकेमेकांना मेसेज, फोटो, व्हिडीओ आणि ऑडियोसह कॉलिंग देखील करतात. परंतु व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो शेयर करताना क्वॉलिटी कम्प्रेस होते. त्यामुळे युजर्स फोटो शेयर करण्यासाठी WhatsApp ला पर्याय शोधतात. व्हॉट्सअ‍ॅपनं युजर्सची ही समस्या सोडवण्यासाठी ‘Photo Quality’ फीचर सादर केलं आहे. ह्या फीचरच्या मदतीनं युजर्स हाय क्वॉलिटी फोटो शेयर करता येतात. तसेच युजर्स डेटा वाचवण्यासाठी कंप्रेस फॉर्मेट फोटो देखील शेयर करू शकतील.

हे फिचर सध्या निवडक युजर्सकडे आलं आहे, जे लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकतं. जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचं अपडेटेड व्हर्जन वापरत असाल तर हे फीचर कसं वापरायचं हे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

अँड्रॉइड फोनवरून व्हॉट्सअ‍ॅपवर ऑरिजनल साइज फोटो कसे पाठवायचे

स्टेप 1 : तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा आणि सेटिंग मेन्यूमध्ये जा.

स्टेप 2 : सेटिंग मेन्यू ओपन करण्यासाठी तुम्हाला चॅट विंडोमध्ये डावीकडे दिलेल्या तीन डॉटवर टॅप करावं लागेल.

स्टेप 3 : स्क्रोल डाउन केल्यावर तुम्हाला स्टोरेज आणि डेटाचा ऑप्शन मिळेल.

स्टेप 4 : इथे ‘मीडिया अपलोड क्वॉलिटी’ ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 5 : पुढे तीन ऑप्शन ऑटो, बेस्ट क्वॉलिटी आणि डेटा सेव्हर मिळतील. हाय क्वॉलिटी फोटोसाठी Best Quality ची निवड करा.

जसे की नावावरून समजलं असेल की ‘डाटा सेवर’ मोड कंप्रेस्ड इमेज फाईल शेयर करतो. तर ऑटो मोड तुमच्या नेटवर्कवर अवलंबून असतो, जो चांगल्या नेटवर्क क्वॉलिटी दरम्यान हाय क्वॉलिटी इमेज शेयर करतो.

iPhone वरून व्हॉट्सअ‍ॅपवर ऑरिजनल साइज फोटो कसे पाठवायचे

स्टेप 1 : आयफोनमध्ये WhatsApp ओपन करा आणि ‘सेटिंग्स’ मेन्यूमध्ये जा.

स्टेप 2 : सेटिंग सेक्शनमध्ये स्टोरेज आणि डेटावर क्लिक करा.

स्टेप 3 : स्क्रोल डाउन केल्यावर ‘मीडिया अपलोड क्वॉलिटी’ ऑप्शनवर जा.

स्टेप 4 : ह्यात तुम्हाला तीन ऑप्शन – ऑटो, बेस्ट क्वॉलिटी आणि डेटा सेव्हरचा ऑप्शन मिळेल.

The post व्हॉट्सअ‍ॅपवरून हाय क्वॉलिटी फोटो कसे पाठवायचे? जाणून घ्या नवीन ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-ne-high-quality-photo-kase-pathavayche/feed/ 0
हरवलेला किंवा चोरी झालेला फोन ब्लॉक करणं झालं सोपं, नवीन संचार साथी पोर्टल करेल मदत https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-lost-or-stolen-phone-on-sanchar-saathi-portal/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-lost-or-stolen-phone-on-sanchar-saathi-portal/#respond Sun, 23 Jul 2023 03:30:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20960 केंद्र सरकारनं हरवलेल्या किंवा चोरीला गेल्या मोबाइल फोनला ट्रॅक करण्यासाठी संचार साथी पोर्टल – www.sancharsaathi.gov.in लाँच केलं आहे. हे पोर्टल भारतातील सर्व टेलीकॉम युजर्ससाठी फायदेशीर ठरेल. ह्या पोर्टलच्या मदतीनं युजर्स चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या फोनला ट्रॅक करण्यासह ब्लॉक देखील करू शकतील. तसेच स्वतःच्या नावावर किती फोन नंबर रजिस्टर आहेत याची माहिती देखील मिळवू शकतील. आज […]

The post हरवलेला किंवा चोरी झालेला फोन ब्लॉक करणं झालं सोपं, नवीन संचार साथी पोर्टल करेल मदत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
केंद्र सरकारनं हरवलेल्या किंवा चोरीला गेल्या मोबाइल फोनला ट्रॅक करण्यासाठी संचार साथी पोर्टल – www.sancharsaathi.gov.in लाँच केलं आहे. हे पोर्टल भारतातील सर्व टेलीकॉम युजर्ससाठी फायदेशीर ठरेल. ह्या पोर्टलच्या मदतीनं युजर्स चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या फोनला ट्रॅक करण्यासह ब्लॉक देखील करू शकतील. तसेच स्वतःच्या नावावर किती फोन नंबर रजिस्टर आहेत याची माहिती देखील मिळवू शकतील. आज आम्ही तुम्हाला संचार साथी पोर्टलवर हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोनला ब्लॉक करण्याची माहिती देणार आहोत आहोत.

चोरीला गेलेला किंवा हरवलेला फोन ब्लॉक कसा करायचा

स्टेप 1 : सर्वप्रथम संचार साथी पोर्टल – https://sancharsaathi.gov.in/ वर लॉगइन करा. इथे दिलेल्या लिंकव्हर क्लिक करून तुम्ही संचार साथीवर जाऊ शकता.

स्टेप 2 : या वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला संचार साथी पोर्टलसंबंधित सर्व्हिसेजची माहिती दिसेल. इथे तुम्हाला मेन मेन्यूवर ‘सिटीजंस सेंट्रिक सर्व्हिसेस’ वर क्लिक करा.

स्टेप 3 : सिटीजंस सेंट्रिक सर्व्हिसेस ऑप्शनवर क्लिक करताच नवीन पेज ओपन होईल, ज्यात दोन ऑप्शन दिसतील. मोबाइल फोन ब्लॉक करण्यासाठी ऑप्शन ‘ब्लॉक युवर्स स्टोलन/लॉस्ट फोन’ वर करा.

स्टेप 4 : एक नवीन पेज ओपन होईल, ज्यात तीन ऑप्शन मिळतील. पहिला – ब्लॉक स्टोलन/ लॉस्ट मोबाइल, दुसरा अनब्लॉक फाउंड मोबाइल आणि तिसरा चेक रिक्वेस्ट स्टेटसचा असेल. फोन ब्लॉक करण्यासाठी पहिला ऑप्शन निवडा.

स्टेप 5 : आता नवीन पेजवर तुम्हाला मोबाइल नंबर, IMEI नंबर, फोन ब्रँडचं नाव, मोबाइलच्या बिलाची कॉपी, पोलीस कंप्लेंट आणि कोणत्या ठिकाणी स्मार्टफोन चोरी झाला ही सर्व माहिती भरावी लागेल.

स्टेप 6 : सर्व डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती द्यावी लागेल, ज्यात तुमचं नाव, पत्ता, आयडेंटिटी आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून ओटीपी वेरीफिकेशन करावं लागेल.

स्टेप 7 : आता तुम्हाला तुमची कम्प्लेंट रिक्वेस्ट आयडी नंबर मिळेल. ज्याच्या मदतीनं तुम्ही स्टेटस चेक करू शकता.

फोन ब्लॉकचं स्टेटस कसं चेक करायचं

स्टेप 1 : चोरी झालेल्या किंवा हरवलेल्या फोनची तक्रार केली असेल तर ह्या पोर्टलवर तुम्ही तुमच्या कम्प्लेंटचं स्टेटस देखील चेक करू शकता. ह्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम होम पेजवर ‘सिटीजंस सेंट्रिक सर्व्हिसेस’ वर क्लिक करावं लागेल.

स्टेप 2 : इथे Check Request Status वर क्लिक करा.

स्टेप 3 : नवीन पेज ओपन होईल जिथे रिक्वेस्ट आयडी सबमिट करा आणि तुम्हाला तुमच्या कम्प्लेंटची माहिती मिळेल.

फोन मिळाल्यावर असा करा अनब्लॉक

जर तुमचा हरवलेला फोन तुम्हाला मिळालं तर ब्लॉक केलेला फोन तुम्ही संचार साथी पोर्टलच्या मदतीनं अनब्लॉक देखील करू शकता. ह्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप फॉलो कराव्या लागतील.

स्टेप 1 : होम पेजवर ‘सिटीजंस सेंट्रिक सर्व्हिसेस’ वर क्लिक करून ‘अनब्लॉक फाउंड मोबाइल’ वर क्लिक करा.

स्टेप 2 : नवीन पेजवर तुम्हाला अनब्लॉकचं कारण विचारलं जाईल. चार पर्यायांपैकी एकाची निवड करा.

स्टेप 3 : त्यानंतर कॅप्चा कोड, मोबाइल नंबर टाका आणि ओटीपी वेरीफिकेशन टाका.

स्टेप 4 : सबमिट केल्यानंतर तुम्हाला मोबाइल नंबर अनब्लॉकची रिक्वेस्ट आयडी मिळेल. नंतर तुम्ही अनब्लॉकचं स्टेटस चेक करू शकता.

The post हरवलेला किंवा चोरी झालेला फोन ब्लॉक करणं झालं सोपं, नवीन संचार साथी पोर्टल करेल मदत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-lost-or-stolen-phone-on-sanchar-saathi-portal/feed/ 0
आधारशी लिंक झालं चुकीचं PAN कार्ड? असं करा डीलिंक https://www.91mobiles.com/marathi/how-to-delink-pan-aadhaar/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-delink-pan-aadhaar/#respond Sat, 22 Jul 2023 06:11:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21225 जर तुमच्या Aadhaar शी चुकीचं PAN लिंक झालं तर असेल तर आता अजूनही ही चूक सुधारण्याची वेळ तुमच्याकडे आहे. आयकर विभागानुसार, पॅन कार्ड 30 जून, 2023 पर्यंत आधारशी लिंक करता येईल. जर आधारशी चुकीचा पॅन लिंक असेल, तर आयटीआर (इनकम टॅक्स रिटर्न) फाईल करताना अडचण येऊ शकते. चला जाणून घेऊया डिलिंक करण्याची प्रोसेस. PAN-Aadhaar कार्ड […]

The post आधारशी लिंक झालं चुकीचं PAN कार्ड? असं करा डीलिंक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुमच्या Aadhaar शी चुकीचं PAN लिंक झालं तर असेल तर आता अजूनही ही चूक सुधारण्याची वेळ तुमच्याकडे आहे. आयकर विभागानुसार, पॅन कार्ड 30 जून, 2023 पर्यंत आधारशी लिंक करता येईल. जर आधारशी चुकीचा पॅन लिंक असेल, तर आयटीआर (इनकम टॅक्स रिटर्न) फाईल करताना अडचण येऊ शकते. चला जाणून घेऊया डिलिंक करण्याची प्रोसेस.

PAN-Aadhaar कार्ड डीलिंक करण्याची पद्धत

वेगवेगळ्या परिस्थितीनुसार पॅन-आधार डीलिंक करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करू शकता :

जर पॅन कार्ड दुसऱ्याचा आधारशी लिंक असेल

स्टेप 1 : जर पॅन कार्ड दुसऱ्या व्यक्तीच्या आधारशी जोडलं गेलं असेल तर पॅन सर्व्हिस प्रोव्हायडरकडून पॅन कार्ड प्रोसेसिंग डिटेल मिळवा.

स्टेप 2 : त्यानंतर आयटीबीए (Income Tax Business Application)च्या माध्यमातून आरसीसी (Regional Computer Center) कडून ऑडिट लॉग मिळत.

स्टेप 3 : त्यानंतर चुकीच्या लिंकिंगची कारणे शोधा. त्यानंतर डीलिंकिंग आवश्यक आहे की नाही ते ठरवा. जर डीलिंकिंग आवश्यक असेल तर, आयकर विभागाकडे आवश्यक कागदपत्र जमा करा.

एकाच व्यक्तीकडे दोन पॅन

स्टेप 1 : जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील पॅन स्टेटसकी तपासणी आयकर विभागाच्या मोबाइल अ‍ॅपवर CBN क्वेरीचा वापर करा.

स्टेप 2 : जर दोन्ही पॅन कार्ड सक्रिय असतील तर ते डी-डुप्लीकेशनमध्ये आहेत का ते पाहा. जर असतील तर इनकम टॅक्स असेसिंग ऑफिसरशी संपर्क करा.

स्टेप 3 : हे ठीक करण्यासाठी आयकर विभागाकडे आवश्यक कागदपत्र जमा करावे लागतील.

एकच नंबरचे अनेक पॅन

स्टेप 1 : सर्वप्रथम पॅन सर्व्हिस प्रोव्हायडरकडून पॅन कार्ड प्रोसेसिंगची माहिती मिळवा. स्टेप 2 : त्यानंतर पॅन कार्ड कोणाला देण्यात आला आहे, त्याच्या ओळखीसाठी अर्ज करत.

स्टेप 3 : ह्यासाठी आयकर विभागाकडे आवश्यक कागदपत्र जमा करा.

स्टेप 4 : प्रोसेसिंग नंतर एक नवीन पॅन कार्ड मिळेल.

डीलिंकसाठी ह्या डॉक्यूमेंटची गरज पडेल

  • पॅन कार्डची प्रत
  • आधारकार्डची प्रत
  • तक्रार केलेल्या पात्राची प्रत
  • पत्त्याचा पुरावा
  • ईमेल आयडी >

पॅन-आधार डीलिंक रिक्वेस्ट कशी सबमिट करायची

ई-फिलिंग पोर्टलनुसार, जर तुमचं आधार चुकीच्या पॅन नंबरशी लिंक झालं असेल किंवा पॅन-आधार डीलिंकिंग करण्यासाठी JAO (Jurisdictional Assessing Officer) कडे अर्ज करावा लागेल. डीलिंक केल्यानंतर तुम्ही पुन्हा पॅन-आधार लिंक करण्यासाठी अर्ज करू शकता. ह्यासाठी तुम्हाला शुल्क द्यावे लागेल.

ह्यासाठी तुम्हाला तुमचा जेएओ कोण आहे ते शोधावं लागेल. ह्यासाठी eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/knowYourAO वर जा. इथे तुम्हाला तुमचं पॅन आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल. व्हेरिफिकेशन नंतर जेएओची संपूर्ण माहिती दिसेल.

तसेच, ई-फाईलिंग पोर्टलवर लॉगइन करून जेएओची माहिती मिळवता येईल. ह्यासाठी माय प्रोफाईल > Jurisdictional डिटेलवर क्लिक करा. तुम्हाला जेएओची माहिती मिळेल.

त्यानंतर तुम्ही ई-पोर्टलच्या माध्यमावरील ईमेल आयडीच्या माध्यमातून जेएओ अधिकाऱ्याशी संपर्क करू शकता.

पॅन-आधार लिंक करणे का आवश्यक आहे?

इन्कम टॅक्स अ‍ॅक्टच्या 139एए कलमानुसार, प्रत्येक व्यक्ती ज्याला पर्मानेंट अकाऊंट नंबर (PAN) देण्यात आला आहे आणि जो आधार क्रमांक मिळवण्यास पात्र आहे, त्यांना आपलं आधार पॅनशी लिंक करणं आवश्यक आहे. खासकरून ज्या लोकांना 1 जुलै, 2017 किंवा त्यापूर्वी पॅन जारी करण्यात आला आहे, त्यांनी 30 जून, 2023 पूर्वी आधार पॅनशी लिंक करणं आवश्यक आहे. सध्या पॅन आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल.

पॅन-आधार डीलिंक करण्याची कारणे

डुप्लीकेट पॅन : जर एकाच नंबरनं एकापेक्षा जास्त पॅन कार्ड जारी करण्यात आले असतील तर ते डीलिंक करता येतात.

एकापेक्षा जास्त पॅन : आधार-पॅन डीलिंक करण्याचे एक कारण मल्टीपल पॅन जारी होणे देखील असू शकते. पॅन जारी करण्याच्या प्रक्रियेत गडबड झाल्यामुळे किंवा फसवणुकीमुळे असे घडू शकते. त्यामुळे एकापेक्षा जास्त पॅन बाळगण्यासाठी दंडापासून वाचण्यासाठी डुप्लीकेट पॅन-आधार डीलिंक करावं लागेल.

चुकीचं लिंकिंग : कधी कधी लिंक करण्याची प्रक्रिया चुकू शकते. एका व्यक्तीचं पॅन कार्ड दुसऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डशी लिंक होऊ शकतं. अशावेळी टॅक्स फाईलिंग दरम्यान गडबड होऊ नये म्हणून डीलिंक करणे आवश्यक आहे.

बनावट पॅन : काही वेळा एखाद्या व्यक्तीनं बनावट पॅन कार्ड आपल्या आधारशी लिंक केलं असू शकतं. अशावेळी कायद्याच्या गुंत्यात न अडकण्याची आधारपासून पॅन वेगळा करण आवश्यक आहे.

आधार पॅन कार्ड लिंक स्टेटस

तुम्ही ऑनलाइन चेक करू शकता की तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही. ह्यासाठी तुम्हाला आयकर ई-फाईलिंग पोर्टल (https://www.incometax.gov.in/iec/foportal/) वर जावं लागेल आणि लिंक आधारावर क्लिक करावं लागेल. आधार-पॅन लिंक आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर नोंदवा. लिंक आहे की नाही ह्याची माहिती मिळेल.

The post आधारशी लिंक झालं चुकीचं PAN कार्ड? असं करा डीलिंक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-delink-pan-aadhaar/feed/ 0
OIS म्हणजे काय आणि स्पष्ट फोटो काढण्यासाठी कसा होतो ह्याचा फायदा? जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/what-is-ois-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/what-is-ois-in-marathi/#respond Sat, 22 Jul 2023 03:43:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21398 मोबाइल टेक्नॉलॉजीचे रोज नवनवीन शब्द कानी पडत असतात. खासकरून कॅमेरा टेक्नॉलॉजीचे तर कित्येक शब्द आपल्या डोक्यावरून जातात. मेगापिक्सल, सेन्सर, अपर्चर, शटर स्पीड, वाइड अँगल, मॅक्रो, नाइट मोड आणि असे अनेक शब्दांचा भडीमार केला जातो. अलीकडे एक शब्द सर्वात जास्त कानावर पडत आहे तो म्हणजे OIS आणि Image Stabilisation (इमेज स्टॅबिलायजेशन). परंतु तुम्हाला माहित आहे का […]

The post OIS म्हणजे काय आणि स्पष्ट फोटो काढण्यासाठी कसा होतो ह्याचा फायदा? जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाइल टेक्नॉलॉजीचे रोज नवनवीन शब्द कानी पडत असतात. खासकरून कॅमेरा टेक्नॉलॉजीचे तर कित्येक शब्द आपल्या डोक्यावरून जातात. मेगापिक्सल, सेन्सर, अपर्चर, शटर स्पीड, वाइड अँगल, मॅक्रो, नाइट मोड आणि असे अनेक शब्दांचा भडीमार केला जातो. अलीकडे एक शब्द सर्वात जास्त कानावर पडत आहे तो म्हणजे OIS आणि Image Stabilisation (इमेज स्टॅबिलायजेशन). परंतु तुम्हाला माहित आहे का ही कोणती टेक्नॉलॉजी आहे आणि OIS म्हणजे काय? किंवा ओआयएसचं काम काय. चला तर थोडक्यात जाणून घेऊया ह्या महत्वाच्या टेक्नॉलॉजी बद्दल.

OIS म्हणजे काय?

फोटोग्राफी करताना जरासा हात हलला की इमेज खराब होते. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर ब्लर (धूसर) होतो. आणि मोबाइल फोटोग्राफीमध्ये फोन हातात ठेऊन पिक्चर क्लिक करतात त्यामुळे तिथे ही समस्या सर्वाधिक येते. ट्रायपॉडच्या तुलनेत हात जास्त हलतो. रात्री किंवा झूमचा वापर केल्यास ही समस्या वाढते. अशावेळी OIS एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी हात हलल्यावर देखील स्पष्ट इमेज व व्हिडीओ बनवण्यास मदत करते. ह्यामुळे स्टॅबिलायजेशन म्हणजे स्थिरता कायम राहते.

आता बोलूया ओआयएस टेक्नॉलॉजी बद्दल, OIS चा फुलफॉर्म ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन (Optical Image Stabilisation). हार्डवेयर आधारित ही कॅमेऱ्यातील एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी नकळत कॅमेरा हलल्यावर स्वतः हलून त्या हालचालीला अ‍ॅडजस्ट करते. तुम्हाला वाटत असेल की खरंच कॅमेरा देखील हलतो का. हो OIS असलेल्या कॅमेऱ्यात हे फंक्शन असतं त्यामुळे बारिकसुरीक झटके हालचालीने अ‍ॅडजस्ट केले जातात.

OIS मुळे फोटोग्राफी कशी सुधारते

हीच सर्वाधिक फायदा तुम्हाला रात्री होतो. तुम्हाला माहित असेलच की फोटोग्राफी म्हणजे प्रकाशाचा खेळ आहे. रात्री प्रकाश कमी असतो आणि पिक्चर क्लिक केल्यावर प्रकाश कॅप्चर करण्यास थोडा जास्त वेळ लागतो. परंतु एवढ्या कालावधीत हात हलतो. तेव्हा OIS हाताची ही हालचाल अ‍ॅडजस्ट करून चांगले फोटो देते.

OIS मध्ये एक छोटा जायरोस्कोप असतो जो हाताची हालचाल डिटेक्ट करून विरुद्ध दिशेला कॅमेरा घेऊन जातो. ह्यात एक अ‍ॅक्टूवेटर्स म्हणजे मोटर असते जी रियल टाइम हाताची हालचाल डिटक्ट करते आणि त्यानुसार कॅमेरा अ‍ॅडजस्ट करते. जर तुमचा हात चुकून खाली झाला तर कॅमेरा वरच सब्जेक्टवर राहील आणि जर हात उजवीकडे गेला तर कॅमेरा डावीकडे जातो. अशाप्रकारे OIS मुळे इमेज व व्हिडीओ खूप स्टेबल होतात.

ओआयएसची क्षमता प्लस/मायनसच्या माध्यमातून मोजली जाते. उदाहरणार्थ एखादं ओआयएस 17 डिग्री किंवा 20 डिग्री +/— स्टॅबिलायजेशन अ‍ॅडजस्ट करू शकतं. फोननुसार क्षमता वेगळी असते, परंतु एवढं मात्र नक्की की OIS छोटीमोठी हालचाल अ‍ॅडजस्ट करतं हेव्ही नाही.

OIS आणि EIS मधील फरक

OIS चा अर्थ Optical Image Stabilisation असा आहे जी एक हार्डवेयर बेस्ड टेक्नॉलॉजी आहे. फोनमध्ये ओआयएससाठी वेगळे घटक असतात जे इमेज व व्हिडीओ स्टेबल करतात.

तर EIS म्हणजे electronic image stabilisation जी सॉफ्टवेयर आधारित टेक्नॉलॉजी आहे. फोन कंपन्या हार्डवेयर नव्हते तर सॉफ्टवेयरच्या मदतीनं पिक्चर स्टेबल करण्याचा प्रयत्न करतात. दोन्हींची तुलना केल्यास OIS बेस्ट म्हणता येईल. ह्याच कारणांमुळे ही टेक्नॉलॉजी जास्त चर्चेत आहे.

The post OIS म्हणजे काय आणि स्पष्ट फोटो काढण्यासाठी कसा होतो ह्याचा फायदा? जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/what-is-ois-in-marathi/feed/ 0
Google अकाऊंट कसं बनवायचं, चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप पद्धत https://www.91mobiles.com/marathi/google-account-kas-banavayach/ https://www.91mobiles.com/marathi/google-account-kas-banavayach/#respond Fri, 21 Jul 2023 10:30:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20919 जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरू इच्छित असाल तर तुमच्याकडे गुगल अकाऊंट (जीमेल ईमेल आयडी) असणं आवश्यक आहे. हे अकाऊंट फक्त अँड्रॉइड फोनमध्ये वापरता येतं असं नाही तर ह्याचा वापर तुम्ही कोणत्याही वेब ब्राउजरमध्ये दैनंदिन ईमेल किंवा कम्यूनिकेशनसाठी करू शकता. त्यामुळे जर तुमच्याकडे गुगल अकाऊंट नसेल तर आम्ही तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप पद्धत सांगणार आहोत. Google अकाऊंट बनवण्याची […]

The post Google अकाऊंट कसं बनवायचं, चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरू इच्छित असाल तर तुमच्याकडे गुगल अकाऊंट (जीमेल ईमेल आयडी) असणं आवश्यक आहे. हे अकाऊंट फक्त अँड्रॉइड फोनमध्ये वापरता येतं असं नाही तर ह्याचा वापर तुम्ही कोणत्याही वेब ब्राउजरमध्ये दैनंदिन ईमेल किंवा कम्यूनिकेशनसाठी करू शकता. त्यामुळे जर तुमच्याकडे गुगल अकाऊंट नसेल तर आम्ही तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप पद्धत सांगणार आहोत.

Google अकाऊंट बनवण्याची पद्धत

कोणत्याही मोबाइल, लॅपटॉप, कंप्यूटर किंवा तत्सम डिवाइसवर ब्राउजरमधून गुगल अकाऊंट बनवता येईल. ह्यासाठी सर्वप्रथम

स्टेप 1 : ह्या पेजवर क्लिक करा किंवा तुम्ही ब्राउजरवर जीमेल लिहून सर्च करू शकता. सर्च पेजवर जो पहिला ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा. ओपन होताच सर्वप्रथम क्रिएट जीमेल अकाऊंटचा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा.

स्टेप 2 : यात सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव आणि आडनाव लिहावं लागेल.

स्टेप 3 : त्यानंतर खाली युजर नेमचा पर्याय दिसेल आणि जिथे एखादा यूनिक युजर नेम टाकावा लागेल. हे नाव तुमच्या घरच्या पत्त्याप्रमाणे आहे त्यामुळे युनिक आणि प्रोफेशनल असणं आवश्यक आहे.

स्टेप 4 : त्यानंतर खाली पासवर्डचा ऑप्शन दिसेल. इथे तुम्हाला यूनिक पासवर्ड बनवावा लागेल. हा यूनिक पासवर्ड तुमचा गुप्त कोड असेल जो तुमच्या गुगल अकाऊंटल सुरक्षित ठेवेल

स्टेप 5 : त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल जिथे तुम्हाला मोबाइल नंबर, रिकव्हरी ईमेल, जन्म तारीख इत्यादि माहिती विचारली जाईल. जन्म तारीख वगळता इतर माहिती नाही दिली तरी चालेल.

स्टेप 6 : हे पूर्ण करताच तुमचं गुगल अकाऊंट बनून तयार होईल. आता तुम्ही अकाऊंट वापरू शकता. मोबाइल नंबर आणि रिकव्हरी ईमेल आयडी दिल्यास पासवर्ड विसरल्यावर अकाऊंट रिकवर करणे सोपे जाईल

जर तुमचं वय 13 वर्षांपेक्षा कमी असेल तर गुगल अकाऊंटसह तुम्हाला एखादे पॅरेंटल अकाऊंट जोडावे लागेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचे अकाऊंट मॅनेज करू शकता.

मोबाइलमध्ये गुगल अकाऊंट कसं बनवायचं

जर तुमच्याकडे कंप्यूटर नसेल तर तुम्ही मोबाइलवरून देखील तुमचं गुगल अकाऊंट बनवू शकता. मोबाइलमध्ये दोन पद्धतीनं गुगल अकाऊंट बनवता येतं. पहिली पद्धत ब्राउजरच्या माध्यमातून तर दुसरी पद्धत अ‍ॅपचा वापर करून आहे. ब्राउजरमधील अकाऊंट बनवण्याची पद्धत वर देण्यात आली आहे. तर अ‍ॅपमधून अकाऊंट बनवण्यासाठी तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करू शकता.

स्टेप 1 : सर्वप्रथम गुगल अ‍ॅपवर क्लिक करा.

स्टेप 2 : इथे तुम्हालावर प्रोफाईल इमेज दिसेल. त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : इथे सर्वप्रथम तुम्हाला ईमेल किंवा फोन नंबरनं साइन इन करण्यास सांगितलं जाईल तर थोडं खाली क्रिएट अकाऊंटचा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 4 : ह्यावर क्लिक करताच तुम्हाला विचारलं जाईल की कोणत्या प्रकारचं अकाऊंट तुम्हाला बनवायचं आहे. स्वतःसाठी, मुलांसाठी किंवा व्यवसायासाठी. तुम्ही मायसेल्फवर क्लिक करा.

स्टेप 5 : त्यानंतर दोन काॅलम दिसतील ज्यात तुम्हाला तुमचं नाव आणि आडनाव टाका.

स्टेप 6 : ही माहिती दिल्या नंतर एक नवीन पेज येईल जिथे तुम्हाला तुमची जन्म तारीख टाकावी लागेल.

स्टेप 7 : त्यानंतर पुढे गेल्यावर तुमच्याकडे गुगल अकाऊंटसाठी यूनिक आयडी मागितला जाईल. तुम्ही तुमच्या नावाशी संबंधित आयडी बनवू शकता किंवा आयडी स्वरूपात मोबाइल नंबरचा वापर करू शकता.

स्टेप 8 : जर तुम्ही तुमच्या नावानं आयडी बनवत असाल तर पुढे गेल्यावर तुमच्याकडे पासवर्ड मागितला जाईल आणि जर तुमच्या मोबाइल नंबरचा गुगल आयडीसाठी वापर केला तर आधी त्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल आणि तो टाकल्यानंतर अकाऊंट बनवण्यासाठी पासवर्ड टाकावा लागेल.

स्टेप 9 : पासवर्ड टाकल्यावर तुमचं काम होईल. गुगल कडून एक दोन दिशा निर्देश दिले जातील, जे ओके करताच तुमचं गुगल अकाऊंट सुरु होईल.

अशाप्रकारे फक्त काही स्टेप फॉलो करून तुम्ही गुगल अकाऊंट बनवू शकता. विशेष म्हणजे तुम्ही जीमेल अ‍ॅप, गुगल पे अ‍ॅप आणि युट्युबवर या अकाऊंटचा वापर करता येईल.

The post Google अकाऊंट कसं बनवायचं, चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-account-kas-banavayach/feed/ 0
Instagram Reel फेसबुकवर शेयर करणं आहे सोपं, अशी आहे पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-share-instagram-reels-on-facebook/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-share-instagram-reels-on-facebook/#respond Sun, 16 Jul 2023 06:05:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21367 तुम्ही इन्स्टाग्रामवर रील (Instagram reel) बनवता परंतु ती फेसबुक (Facebook) वर कशी शेयर करायची? गोंधळून जाऊ नका, पद्धत सोपी आहे. इन्स्टाग्राम रील फेसबुकवर शेयर केल्यामुळे फक्त प्रेक्षकवर्ग वाढत नाही तर फॉलोअर्स देखील वाढू शकतात. फेसबुकवर इन्स्टाग्राम रील शेयर करण्याची माहिती पुढे वाचू शकता. इन्स्टाग्राम रील फेसबुकवर शेयर करण्याची पद्धत फेसबुकवर इन्स्टाग्राम रील शेयर करण्याआधी तुमचं […]

The post Instagram Reel फेसबुकवर शेयर करणं आहे सोपं, अशी आहे पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही इन्स्टाग्रामवर रील (Instagram reel) बनवता परंतु ती फेसबुक (Facebook) वर कशी शेयर करायची? गोंधळून जाऊ नका, पद्धत सोपी आहे. इन्स्टाग्राम रील फेसबुकवर शेयर केल्यामुळे फक्त प्रेक्षकवर्ग वाढत नाही तर फॉलोअर्स देखील वाढू शकतात. फेसबुकवर इन्स्टाग्राम रील शेयर करण्याची माहिती पुढे वाचू शकता.

इन्स्टाग्राम रील फेसबुकवर शेयर करण्याची पद्धत

फेसबुकवर इन्स्टाग्राम रील शेयर करण्याआधी तुमचं Instagram आणि Facebook अकाऊंट एकमेकांशी जोडलेलं असावं. Instagram आणि Facebook अकाऊंट लिंक करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

  • इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फेसबुक जोडण्यासाठी तुम्हाला अकाऊंट सेंटर (Accounts Centre) मध्ये जावं लागेल.
  • यासाठी आधी प्रोफाईल मध्ये जाऊन खाली उजवीकडे प्रोफाईल किंवा अपना प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा.
  • त्यानंतर उजवीकडे वर तीन लाइन असेलल्या hamburger मेन्यूवर टॅप करा, नंतर ‘सेटिंग अँड प्रायव्हसी’ मध्ये जा.
  • यहां ‘अकाऊंट सेंटर’ टॅप करा.
  • ‘अ‍ॅड फेसबुक अकाऊंट’ च्या ऑप्शनवर टॅप करा आणि सूचनांचे पालन करून इन्स्टाग्राम अकाऊंट फेसबुकला जोडा.

अशी शेयर करा इन्स्टाग्राम रील

  • सर्वप्रथम डावीकडे ‘क्रिएट’ वर क्लिक करून रील रेकॉर्ड करण्यास सुरुवात करा.
  • त्यानंतर तुमची रील शेयर करण्याआधी ‘शेयर टू फेसबुक’ वर क्लिक करा.
  • तुम्ही ज्या फेसबुक अकाऊंटशी रील शेयर करू इच्छित असाल त्याच्या स्विच बटनवर टॅप करा.
  • इथून भविष्यातील सर्व रील फेसबुकवर शेयर करायच्या आहेत की फक्त चालू, ते निवडा.
  • वर डावीकडे> वर टॅप करा, आणि ‘शेयर’ वर टॅप करा.

ऑटोमॅटिक फेसबुकवर शेयर करा रील

जर तुम्हाला इन्स्टाग्रामवरील सर्व रील ऑटोमॅटिकपद्धतीनं फेसबुकवर शेयर करायची असेल तर पुढील स्टेप को फॉलो करा:

  • तुमच्या प्रोफाईलवर जाण्यासाठी उजवीकडे प्रोफाईल किंवा प्रोफाईल पिक्चर वर क्लिक करा.
  • सर्वात वर उजवीकडे hamburger मेन्यू वर क्लिक करा आणि ‘सेटिंग अँड प्रायव्हसी’ सेक्शन मध्ये जा.
  • इथे तुम्हाला अकाऊंट सेंटरमध्ये गेल्यानंतर Sharing across profiles ऑप्शनवर टॅप करा.
  • आता तुमचं ते अकाऊंट सिलेक्ट करा, ज्याच्या माध्यमातून रील्स शेअर करायच्या आहेत किंवा ते अकाऊंट देखील सिलेक्ट करा, ज्यावर रील शेयर करायच्या आहेत.
  • त्यानंतर खाली ‘ऑटोमॅटिकली शेयर’ समोरील स्विच बटनवर टॅप करा. त्यानंतर इन्स्टाग्रामवर जी रील तुम्ही शेयर कराल ती आपोआप फेसबुकवर देखील शेयर होईल.

The post Instagram Reel फेसबुकवर शेयर करणं आहे सोपं, अशी आहे पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-share-instagram-reels-on-facebook/feed/ 0
Paytm UPI Lite कसं करायचं फोनमध्ये अ‍ॅक्टिव्हेट; कंपनी देत आहे 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक https://www.91mobiles.com/marathi/how-to-activate-paytm-upi-lite-and-use-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-activate-paytm-upi-lite-and-use-in-marathi/#respond Sun, 16 Jul 2023 03:31:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20712 Paytm Payments Bank Limited (PPBL) नं फेब्रुवारीमध्ये आपली UPI Lite सर्व्हिस सुरु केली होती. ही सर्व्हिस युजर्सना मनी ट्रँजॅक्शन्ससाठी वारंवार यूपीआय पिन टाकण्याच्या झंझट पासून वाचवते. ही सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पेटीएम ऑफर अंतगर्त सर्व युजर्सना 100 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. या स्कीमचा लाभ कसा घ्यायचा आणि या सर्व्हिसचे बेनिफिट्स कोणते, यांची माहिती पुढे वाचू शकता. […]

The post Paytm UPI Lite कसं करायचं फोनमध्ये अ‍ॅक्टिव्हेट; कंपनी देत आहे 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • यूपीआय लाइट मध्ये UPI PIN विना पैसे ट्रांसफर करता येतात.
  • यूपीआय लाइटचे ट्रँजॅक्शन दरम्यान बँक सर्वर डाउन असले तरी रद्द होत नाहीत.
  • पेटीएम ऑफर अंतगर्त सर्व युजर्सना 100 रुपयांचा कॅशबॅक देत आहे.

Paytm Payments Bank Limited (PPBL) नं फेब्रुवारीमध्ये आपली UPI Lite सर्व्हिस सुरु केली होती. ही सर्व्हिस युजर्सना मनी ट्रँजॅक्शन्ससाठी वारंवार यूपीआय पिन टाकण्याच्या झंझट पासून वाचवते. ही सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पेटीएम ऑफर अंतगर्त सर्व युजर्सना 100 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. या स्कीमचा लाभ कसा घ्यायचा आणि या सर्व्हिसचे बेनिफिट्स कोणते, यांची माहिती पुढे वाचू शकता.

UPI Lite चे फीचर्स आणि फायदे

  1. पेटीएम यूपीआय लाइट एक अशी पेमेंट सिस्टम आहे जी UPI PIN विना पैसे ट्रांसफर करू शकते.
  2. Paytm UPI lite वरून एका क्लिकमध्ये पेमेंट पूर्ण होतं, यासाठी अनेक स्टेप्स फॉलो करण्याची गरज नाही.
  3. यूपीआय लाइट कधीही फेल होत नाही, मग ट्रँजॅक्शन दरम्यान बँक सर्वर डाउन असलं तरी.
  4. ही 3-लेव्हल बँक-ग्रेड सिक्योर टेक्‍नोलॉजी आहे. ज्यावर फसवणुकीपासून वाचता येतं.
  5. UPI lite वर सिंगल टॅपनं 200 रुपयांचं इंस्टंट पेमेंट करता येईल.
  6. एकावेळी जास्तीत जास्त 2000 रुपये ट्रांसफर करता येतात.
  7. दोन हजार रुपयांचे ट्रँजॅक्शन जास्तीत जास्त 2 वेळा करता येईल.
  8. 24 तास म्हणजे 1 दिवसात एकूण 4,000 रुपयांचे ट्रँजॅक्शन पेटीएम लाइटवर करता येतात.
  9. Paytm UPI lite च्या माध्यमातून केलेले पेमेंट बँक पासबुकमध्ये दिसत नाही.
  10. बँक पासबुकमध्ये एंट्री फक्त यूपीआय लाइट बॅलेन्समध्ये पैसे टाकल्यावर होते.

Paytm UPI Lite फोनमध्ये चालू करण्याची पद्धत

  1. सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये Paytm अ‍ॅप इंस्टॉल करा. जर जुनं अ‍ॅप असेल तर लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करा.
  2. होमपेजवर तुम्हाला ‘UPI LITE’ चा ऑप्शन दिसेल किंवा सर्च करून देखील ऑप्शन मिळेल त्यावर टॅप करा.
  3. इथे तुम्हाला यूपीआय लाइटसाठी पात्र बँकांची यादी दिसेल, यातील तुमची Bank निवडा.
  4. ज्या बँकेचं अकाऊंट तुम्हाला पेटीएम यूपीआय लाइटशी जोडायचं असेल ते निवडून Proceed करा.
  5. आता तुम्हाला बँक अकांउटमधील रजिस्टर्ड मोबाइल नंबर व्हेरिफाय करावा लागेल, यासाठी फोनवर SMS पाठवण्यासाठी ओके बटन क्लिक करा.
  6. एसएमएसच्या माध्यमातून वेरीफिकेशन झाल्यावर तुम्हाला तुमच्या त्या बँकेच्या यूपीआय लाइटमध्ये पैसे टाकावे लागतील.
  7. Add Money to UPI Lite ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या बँकेतील पैसे यूपीआय लाइट वॉलेटमध्ये टाका.
  8. लक्षात असू द्या की एकावेळी जास्तीत जास्त 2000 रुपये अ‍ॅड करता येतात.
  9. पैसे अ‍ॅड करताच तुमचं पेटीएम यूपीआय लाइट अ‍ॅक्टिव्हेट होईल आणि पुढील यूपीआय पेमेंटसाठी तुम्हाला यूपीआय पिन टाकण्याची गरज नाही.
  10. तुमच्या बँक स्टेटमेंट किंवा पासबुकमध्ये फक्त तेच ट्रँजॅक्शन दिसेल जे तुम्ही UPI Lite WALLET मध्ये पैसे टाकण्यासाठी केलं आहे. या वॉलेटमधील पेमेंटची नोंद ठेवली जाणार नाही.

UPI Lite सपोर्ट करणाऱ्या बँक

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
  • पंजाब नॅशनल बँक (PNB)
  • यूनियन बँक ऑफ इंडिया (UBI)
  • कॅनरा बँक (Canara Bank)
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI)
  • इंडियन बँक (Indian Bank)
  • एचडीएफसी बँक (HDFC Bank)
  • कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)
  • उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (Utkarsh Small Finance Bank)

UPI Lite मध्ये सध्या उपरोक्त 9 बँकांचे अकाऊंट्स जोडता येतील. सध्या याच बँका पेटीएम यूपीआय लाइटला सपोर्ट करतात, परंतु आगामी काळात ही यादी वाढू शकते.

The post Paytm UPI Lite कसं करायचं फोनमध्ये अ‍ॅक्टिव्हेट; कंपनी देत आहे 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-activate-paytm-upi-lite-and-use-in-marathi/feed/ 0
मोबाइल टीव्हीशी कसा कनेक्ट करायचा, जाणून घ्या 2023 ची पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-connect-phone-to-smart-tv-wirelessly/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-connect-phone-to-smart-tv-wirelessly/#respond Sat, 15 Jul 2023 12:36:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21359 गेल्या काही वर्षांत Smartphone मोठे आणि स्मार्ट होत गेले आहेत. ह्यात तुम्हाला चांगल्या पॅनलसह स्टीरियो स्पिकर इत्यादी मिळू लागले आहेत. परंतु जेव्हा घरी बसून मूव्ही किंवा व्हिडीओ बघायचा असतो तेव्हा टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनशिवाय पर्याय नाही. हल्ली स्मार्टफोनमधील कंटेंट टीव्हीवर मिरर करण्याची सुविधा मिळते. जर तुम्हाला देखील स्मार्टफोनमधील व्हिडीओ, फोटोज इत्यादी टीव्हीवर पाहायचे असतील तर पुढे […]

The post मोबाइल टीव्हीशी कसा कनेक्ट करायचा, जाणून घ्या 2023 ची पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या काही वर्षांत Smartphone मोठे आणि स्मार्ट होत गेले आहेत. ह्यात तुम्हाला चांगल्या पॅनलसह स्टीरियो स्पिकर इत्यादी मिळू लागले आहेत. परंतु जेव्हा घरी बसून मूव्ही किंवा व्हिडीओ बघायचा असतो तेव्हा टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनशिवाय पर्याय नाही. हल्ली स्मार्टफोनमधील कंटेंट टीव्हीवर मिरर करण्याची सुविधा मिळते. जर तुम्हाला देखील स्मार्टफोनमधील व्हिडीओ, फोटोज इत्यादी टीव्हीवर पाहायचे असतील तर पुढे आम्ही वायरलेस पद्धत सांगितली आहे.

अँड्रॉइड फोन स्मार्ट टीव्हीशी कनेक्ट करण्याची पद्धत 2023

सध्या स्मार्टफोनमध्ये स्क्रीन मिररिंग (screen mirroring) चा पर्याय असतो. तुमच्या अँड्रॉइड फोनची स्क्रीन को स्मार्ट टीव्ही (Smart TV) शी वायरलेस पद्धतीनं कनेक्ट करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

  • ह्यासाठी सर्वात सोपी पद्धत अशी आहे की स्मार्टफोनच्या क्विक सेटिंग्स पॅनल (Quick Settings panel) मध्ये जा. इथे तुम्हाला कास्ट (Cast) चा पर्याय दिसेल.
  • जर तुम्हाला हा पर्याय क्विक सेटिंग्स पॅनलमध्ये दिसत नसेल तर एडिट बटनवर टॅप करा आणि स्क्रीन कास्ट (Screen Cast) टॉगल शोधा.
  • कास्ट बटन दाबून ठेवा आणि तो क्विक सेटिंग ट्रे मध्ये ड्रॅग करा.
  • स्क्रीन कास्ट बटन टॉगल करा आणि पाह की तुमचा स्मार्ट टीव्ही यादीत आहे की नाही.
  • आता तुमचा अँड्रॉइड फोन मिरर करण्यासाठी तुमच्या टीव्हीच्या नावावर टॅप करा.

जर अँड्रॉइड स्क्रीन कास्टिंग डिसेबल करायची असेल तर क्विक सेटिंग्स पॅनलमध्ये कास्ट टॉगलवर टॅप करा. अँड्रॉइड स्क्रीन मिररिंग Android 5.0 आणि त्यानंतरच्या व्हर्जनवर उपलब्ध आहे. जर क्विक सेटिंग्स पॅनलमध्ये स्क्रीन कास्ट पर्याय दिसत नसेल, तर तुमच्या डिवाइसच्या सेटिंग्समध्ये वेगळ्या नावाने अँड्रॉइड फोन टीव्हीशी वायरलेस पद्धतीनं कनेक्ट करण्याचा पर्याय आहे का पाहा. उदाहरणार्थ Xiaomi डिवाइसमध्ये सेटिंग्समध्ये दोन पर्याय आहेत, जे स्क्रीन मिररिंगचा पर्याय देतात – कास्ट आणि वायरलेस डिस्प्ले. बऱ्याचदा युजर्स वायरलेस डिस्प्लेच्या मदतीनं Xiaomi स्क्रीन कास्ट करू शकतात. ह्यासाठी तुम्हाला शाओमीच्या फोनमध्ये Settings > Connection & sharing > Wireless Display मध्ये जावे लागेल.

Google Home App मधून अँड्रॉइड फोनची स्क्रीन कशी मिरर करायची

जर तुम्ही फोनच्या Screen Cast फीचरच्या मदतीनं अँड्रॉइड फोन टीव्हीशी कनेक्ट करू शकत नसाल, तर गुगल होम अ‍ॅप (Google Home App) ची मदत घेऊ शकता. हा देखील अँड्रॉइड स्क्रीन तुमच्या स्मार्ट टीव्हीशी कनेक्ट करण्याची चांगली पद्धत आहे. जर तुमच्याकडे Chromecast असेल किंवा तुमच्याकडे क्रोमकास्ट (Chromecast) बिल्ट-इन असलेला Android TV असेल तर हे फिचर वापरता येईल.

  • गुगल होम अ‍ॅप गुगल प्ले स्टोर (Google Play Store) वरून डाउनलोड करा.
  • जर तुम्ही आधी गुगल क्रोमकास्ट (Google Chromecast) सेटअप केलं नसेल तर ते आधी सेटअप करा. जर तुमच्या स्मार्ट टीव्हीमध्ये क्रोमकास्ट बिल्ट-इन असेल तर तो तुमच्या अ‍ॅपवर दिसेल.
  • डिवाइसवर टॅप करा आणि खाली तुम्हाला Cast my screen चा पर्याय दिसले त्यावर टॅप करा.
  • कास्ट स्क्रीनवर टॅप केल्यानंतर स्टार्ट नाउ (Start now) वर क्लिक करा. त्यानंतर स्मार्टफोनची स्क्रीन टीव्हीवर दिसू लागेल.
  • जर तुम्ही अँड्रॉइड फोन स्मार्ट टीव्हीवर मिरर करू इच्छित नसाल तर तुम्हाला Stop mirroring चा पर्याय निवडावा लागेल.

iPhones स्मार्ट टीव्हीशी कनेक्ट करण्यासाठी 2023 मधील पद्धत?

तुम्ही तुमचा आयफोन (iPhones) आणि आयपॅड (iPads) सहज टीव्हीवर मिरर करू शकता, परंतु ह्यासाठी Apple TV किंवा AirPlay 2 सपोर्ट असणारी स्मार्ट टीव्ही असणं आवश्यक आहे. आयफोन तुमच्या टीव्हीशी वायरलेस पद्धतीनं कनेक्ट करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

  • सर्वप्रथम तुमचा iPhone/iPad आणि स्मार्ट टीव्ही एकाच WiFi नेटवर्कशी कनेक्ट करा.
  • कंट्रोल सेंटरवर जाण्यासाठी वर उजव्या बाजूने खाली स्वाइप करा.
  • स्क्रीन मिररिंगवर टॅप करा आणि लिस्टमधून स्मार्ट टीव्हीचा पर्याय निवडा.

जर तुमच्याकडे Apple TV किंवा AirPlay 2 सपोर्टेड स्मार्ट टीव्ही नसेल तर तुम्ही तुमच्या आयओएस डिवाइसवर क्रोमकास्ट इनेबल अ‍ॅप्समधून कंटेंट स्ट्रीम करू शकता. फक्त अ‍ॅप ओपन करा (जसे की YouTube), कास्ट बटनवर टॅप करा आणि यादीतून तुमचा टीव्ही निवडा. ही सुविधा फक्त iOS 13 आणि त्यानंतरच्या व्हर्जनवर आहे.

एफएक्यू (FAQ)

स्क्रीन मिररिंग म्हणजे काय?

सध्या बहुतांश स्मार्टफोन स्क्रीन मिररिंग (कास्टिंग) फीचरसह येतात, ज्यांच्या मदतीनं वायरलेस पद्धतीनं स्मार्टफोनचा कंटेंट स्मार्ट टीव्हीवर पाहता येतो. हे फीचर मोठ्या स्क्रीनवर फोटोज पाहताना, गेम खेळताना आणि चित्रपट बघण्यासाठी वापरता येतं. स्मार्ट टीव्हीमध्ये स्क्रीन मिररिंग फंक्शनलिटी बिल्ट-इन असते. तर जुन्या टीव्हीसाठी तुम्हाला मीडिया स्टिक किंवा मीडिया प्लेयरची गरज पडेल, जसे की Google Chromecast, Amazon Fire Stick, Roku इत्यादी. स्मार्टफोन स्मार्ट टीव्हीवर कास्ट करण्यासाठी तुमचा स्मार्टफोन आणि टीव्ही दोन्ही एकाच वायफाय नेटवर्कशी कनेक्टेड असणं अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्या स्मार्ट टीव्हीमध्ये क्रोमकास्ट बिल्ट असणं आवश्यक आहे किंवा एक स्ट्रीमिंग डिवाइस असावा, जो स्क्रीन मिररिंगला सपोर्ट करतो.

अँड्रॉइड फोन जुन्या टीव्हीशी कसा कनेक्ट करायचा?

पारंपरिक टीव्ही स्क्रीन मिररिंग किंवा स्क्रीनकास्टिंगसह येत नाही, कारण ह्यात वाय-फाय इंटीग्रेशन नसतं. स्मार्टफोन पारंपरिक टीव्हीवर मिरर करण्यासाठी गुगल क्रोमकास्ट, अ‍ॅपल फायर टीव्ही स्टिक किंवा कोणत्याही अँड्रॉइड-आधारित डोंगलचा वापर करता येतो. बिगर-स्मार्ट टीव्हीमध्ये डोंगल एचडीएमआय पोर्टशी कनेक्ट करता येतो आणि वरील पद्धतींचा वापर करून कास्ट करता येईल.

स्मार्टफोन स्मार्ट टीव्हीशी कनेक्ट होत नाही?

जर तुमची तुमचा स्मार्टफोन तुमच्या टीव्हीवर मिरर करू शकत नसाल तर सर्वप्रथम तुमचा टीव्ही आणि स्मार्टफोन दोन्ही रीस्टार्ट करा. तुमचा फोन आणि स्मार्ट टीव्ही एकाच वाय-फाय नेटवर्कशी जोडलेले आहेत की नाहीत पाहा. हे झाल्यावर स्मार्टफोन स्मार्ट टीव्हीशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. तरी देखील समस्या कायं राहिली तर तुमचा वाय-फाय राउटर रीबूट करून पुन्हा ट्राय करा.

The post मोबाइल टीव्हीशी कसा कनेक्ट करायचा, जाणून घ्या 2023 ची पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-connect-phone-to-smart-tv-wirelessly/feed/ 0
कंप्यूटर फास्ट आणि स्मार्ट पद्धतीनं वापरण्यासाठी जाणून घ्या महत्वाचे शॉर्टकट https://www.91mobiles.com/marathi/computer-shortcut-keys-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/computer-shortcut-keys-in-marathi/#respond Sat, 15 Jul 2023 03:33:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20756 इंफॉरमेशन अँड टेक्नॉलॉजीच्या या युगात कंप्यूटरविना कोणत्याही कामाची कल्पना करणं कठीण झालं आहे. कंप्यूटर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सध्या सर्व सरकारी आणि बिगर सरकारी कामे जसे की वीज-पाणी बिल, बुकिंग आणि बँकिंग संबंधित सर्व कामासाठी आपण ऑनलाइन कंप्यूटरवर अवलंबून आहोत. त्यामुळे कंप्यूटरवर पटकन काम करण्यासाठी अनेक शॉर्टकट आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही कोणतंही काम […]

The post कंप्यूटर फास्ट आणि स्मार्ट पद्धतीनं वापरण्यासाठी जाणून घ्या महत्वाचे शॉर्टकट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंफॉरमेशन अँड टेक्नॉलॉजीच्या या युगात कंप्यूटरविना कोणत्याही कामाची कल्पना करणं कठीण झालं आहे. कंप्यूटर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सध्या सर्व सरकारी आणि बिगर सरकारी कामे जसे की वीज-पाणी बिल, बुकिंग आणि बँकिंग संबंधित सर्व कामासाठी आपण ऑनलाइन कंप्यूटरवर अवलंबून आहोत. त्यामुळे कंप्यूटरवर पटकन काम करण्यासाठी अनेक शॉर्टकट आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही कोणतंही काम चुटकीसरशी करू शकता.

आज आम्ही तुम्हाला काही असे शॉर्टकट सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही स्मार्ट पद्धतीनं कंप्यूटरवर वेगवान काम करू शकाल. या आर्टिकलमध्ये आम्ही मायक्रोसॉफ्ट विंडोज (Microsoft Windows) युजर्ससाठी काही शॉर्टकट की सांगणार आहोत. या शॉर्ट की चा वापर करून तुम्ही कमी वेळात जास्त काम करू शकाल.

कंप्यूटर शॉर्टकट

कंप्यूटरमध्ये प्रामुख्याने इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट असे तीन युनिट असतात. आपण दिलेलं इनपुट प्रोसेस केल्यावर आपल्याला आउटपुट मिळतं. इनपुटसाठी कीबोर्ड आणि माउसचा वापर केला जातो. की-बोर्डवर अनेक प्रकारच्या कीज (Keys) असतात, ज्यातून इनपुट दिलं जातं. इथे आम्ही तुम्हाला शॉर्टकट की (Shortcut Keys) बद्दल सांगणार आहोत. यात Basic Keyboard Shortcut Keys, Alternate Key (Alt), Function Shortcut Keys, Microsoft Word Shortcut Keys, Special Characters Shortcut Keys चा समावेश आहे. पडूही आम्ही तुम्हाला सर्व कंप्यूटरच्या शॉर्टकट की (Computer Shortcut Keys In Marathi) बाबत सविस्तर माहिती देत आहोत.

बेसिक कीबोर्ड शॉर्टकट की

Ctrl +A सर्व सिलेक्ट करण्यासाठी

Ctrl + B टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी

Ctrl + C कॉपी करण्यासाठी

Ctrl + D फॉन्टसाठी

Ctrl + E सेंटरमध्ये आणण्यासाठी

Ctrl + F सर्चसाठी

Ctrl + G गो टू मेन्यूसाठी

Ctrl + I इटॅलिक फॉन्टसाठी

Ctrl + J टेक्स्ट जस्टिफाय करण्यासाठी

Ctrl + K मध्ये हायपरलिंक जोडण्यासाठी

Ctrl + L डाव्या एलाइंमेंटसाठी

Ctrl + M मूव्ह करण्यासाठी

Ctrl + N नवीन फाईलसाठी

Ctrl + O फाईल ओपन करण्यासाठी

Ctrl + P प्रिंटसाठी

Ctrl + Q बंद करण्यासाठी

Ctrl + R रिलोड आणि राइट एलाइंमेंटसाठी

Ctrl + S फाईल सेव्ह करण्यासाठी

Ctrl + U टेक्स्ट अंडरलाइन करण्यासाठी

Ctrl + V पेस्ट करण्यासाठी

Ctrl + X कट करण्यासाठी

Ctrl + Y रीडू करण्यासाठी

Ctrl + Z अनडू करण्यासाठी

Ctrl+W – फाईल क्‍लोज करण्यासाठी

अल्टर्नेटिव की (Alt)

Alt + E : चालू प्रोग्राममध्ये Edit ऑप्शन ओपन करण्यासाठी.

Alt + F : चालू प्रोग्राममध्ये फाईल मेन्यू ओपन करण्यासाठी.

Alt + F4 : प्रोग्राम किंवा Window बंद करण्यासाठी.

Alt + Enter : प्रॉपर्टीज बघण्यासाठी

Alt + Tab : प्रोग्राम किंवा विंडो स्विच करण्यासाठी.

Alt + Shift + Tab : मागील प्रोग्राम किंवा विंडोवर स्विच करण्यासाठी.

Alt + Print Screen : विंडोचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी.

फंशन शॉर्टकट की

F2: सिलेक्ट केलेल्या फाईलनं नाव चेंज करण्यासाठी.

F4: F4 सह Alt प्रेस केल्यावर कंप्यूटरवर ओपन विंडो बंद होते, तसेच कंप्यूटर बंद (शट डाउन) करण्यासाठी.

F5: विंडोज कंप्यूटर किंवा ब्राउजरमधील वेबसाइट रिफ्रेश करण्यासाठी.

F6: ब्राउजरच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये जाण्यासाठी.

F7: Ms Word मध्ये Spell and Grammar check चा ऑप्शन वापरण्यासाठी.

F8: Computer/Laptop मध्ये Windows Install करताना या Key चा वापर केला जातो.

F9: Microsoft Word मध्ये Document Refresh करण्यासाठी.

F10: सॉफ्टवेयर किंवा प्रोग्राम मेनू सिलेक्ट करण्यासाठी.

F11: कोणतंही Software, Browser किंवा Application Full Screen Mode मध्ये वापरण्यासाठी.

The post कंप्यूटर फास्ट आणि स्मार्ट पद्धतीनं वापरण्यासाठी जाणून घ्या महत्वाचे शॉर्टकट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/computer-shortcut-keys-in-marathi/feed/ 0
आधार कार्ड नंबरवरून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा? इंटरनेटविना होईल काम, अशी आहे ट्रिक https://www.91mobiles.com/marathi/aadhar-cardne-bank-balance-check/ https://www.91mobiles.com/marathi/aadhar-cardne-bank-balance-check/#respond Fri, 14 Jul 2023 12:05:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21329 आधार कार्ड गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयांसाठी एक महत्वपूर्ण ओळखपत्र बनलं आहे. एयरपोर्ट ते बँक, सिम खरेदी पासून आणि इतर सरकारी, बिगर-सरकारी कामांसाठी सध्या आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच भारतात बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केल्यावर ग्राहकांना अनेक सेवा मिळतात. ग्राहक अनेक कामं बँकेच्या रांगेत न लागत करू शकतात. विशेष म्हणजे युजर्स इंटनेट कनेक्शनविना देखील बँकिंग […]

The post आधार कार्ड नंबरवरून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा? इंटरनेटविना होईल काम, अशी आहे ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आधार कार्ड गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयांसाठी एक महत्वपूर्ण ओळखपत्र बनलं आहे. एयरपोर्ट ते बँक, सिम खरेदी पासून आणि इतर सरकारी, बिगर-सरकारी कामांसाठी सध्या आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच भारतात बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केल्यावर ग्राहकांना अनेक सेवा मिळतात. ग्राहक अनेक कामं बँकेच्या रांगेत न लागत करू शकतात. विशेष म्हणजे युजर्स इंटनेट कनेक्शनविना देखील बँकिंग सेवा वापरू शकतात. आज आम्ही तुम्हाला आधारच्या मदतीनं बँक अकाऊंटमधील बॅलेन्स चेक करण्याची माहिती देणार आहोत.

आधार नंबरवरून बँक बँलेस चेक करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

जर तुमच्या बँक अकाऊंटशी आधार लिंक असेल तर तुम्ही *99# सर्व्हिसच्या मदतीनं ऑफलाइनच बँक अकाऊंट बॅलेन्स चेक करू शकता. ह्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप फॉलो कराव्या लागतील.

स्टेप 1 : बँक अकाऊंटशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवरून *99# डायल करा.

स्टेप 2 : तुमच्या मोबाइल नंबरवर ‘वेलकम टू *99#’ मेसेज फ्लॅश होईल.

स्टेप 3 : ओकेवर क्लिक केल्यावर फ्लॅश मेसेजमध्ये मेन्यू ओपन होईल. त्यात तुम्हाला तिसऱ्या नंबरवर चेक बॅलेन्सचा ऑप्शन मिळेल.

स्टेप 4 : त्यामुळे बॅलेन्स चेक करण्यासाठी 3 टाइप करून रिप्लाय करा.

स्टेप 5 : थोड्या वेळानं फोनमध्ये फ्लॅश मेसेज येईल ज्यात तुम्हाला यूपीआय पिन रिप्लाय करावा लागेल.

स्टेप 6 : पुढील फ्लॅश मेसेजमध्ये तुम्हाला तुमचा बँक बॅलेन्स समजेल.

नोट : जर तुमचे दोन किंवा अधिक बँक अकाऊंट असतील तर *99# सर्व्हिस तुम्हाला त्या बँकेतील बॅलेन्स सांगेल जी सरकारी यूपीआय अ‍ॅप BHIM मध्ये तुमची प्रायमरी बँक असेल.

*99# चे इतर फायदे

*99# द्वारे ऑफलाइन बँक बॅलेन्स चेक करण्यासोबतच इतर फीचर्स देखील वापरता येतात. ह्या सर्व्हिसचे इतर फीचर्स खाली देण्यात आले आहेत.

  • सेंड मनी
  • रिक्वेस्ट मनी
  • चेक बॅलेन्स
  • माय प्रोफाईल
  • पेंडिंग रिक्वेस्ट
  • ट्रँजॅक्शन्स
  • यूपीआय पिन

बँकेशी आधार लिंक कसं करायचं?

बँक अकाऊंटला आधार लिंक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही बँकेत जाऊन मॅन्युअली आधार लिंक करण्यासह ऑनलाइन आणि एटीएमवरून देखील तुमचं बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करू शकता.

बँकेत जाऊन : तुमच्या आधार कार्डच्या प्रतीसह एक अर्ज देऊन तुम्ही बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करू शकता.

ऑनलाइन : जर तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर लॉगइन करून अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करू शकता.

एटीएम : बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक एटीएममधून देखील करता येतं. एटीएम मध्ये कार्ड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर आधार लिंकचा ऑप्शन मिळतो. इथून देखील तुम्ही तुमच्या अकाऊंटशी आधार लिंक करू शकता.

The post आधार कार्ड नंबरवरून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा? इंटरनेटविना होईल काम, अशी आहे ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/aadhar-cardne-bank-balance-check/feed/ 0