Paytm UPI Lite कसं करायचं फोनमध्ये अ‍ॅक्टिव्हेट; कंपनी देत आहे 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक

Highlights

 • यूपीआय लाइट मध्ये UPI PIN विना पैसे ट्रांसफर करता येतात.
 • यूपीआय लाइटचे ट्रँजॅक्शन दरम्यान बँक सर्वर डाउन असले तरी रद्द होत नाहीत.
 • पेटीएम ऑफर अंतगर्त सर्व युजर्सना 100 रुपयांचा कॅशबॅक देत आहे.

Paytm Payments Bank Limited (PPBL) नं फेब्रुवारीमध्ये आपली UPI Lite सर्व्हिस सुरु केली होती. ही सर्व्हिस युजर्सना मनी ट्रँजॅक्शन्ससाठी वारंवार यूपीआय पिन टाकण्याच्या झंझट पासून वाचवते. ही सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पेटीएम ऑफर अंतगर्त सर्व युजर्सना 100 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. या स्कीमचा लाभ कसा घ्यायचा आणि या सर्व्हिसचे बेनिफिट्स कोणते, यांची माहिती पुढे वाचू शकता.

UPI Lite चे फीचर्स आणि फायदे

 1. पेटीएम यूपीआय लाइट एक अशी पेमेंट सिस्टम आहे जी UPI PIN विना पैसे ट्रांसफर करू शकते.
 2. Paytm UPI lite वरून एका क्लिकमध्ये पेमेंट पूर्ण होतं, यासाठी अनेक स्टेप्स फॉलो करण्याची गरज नाही.
 3. यूपीआय लाइट कधीही फेल होत नाही, मग ट्रँजॅक्शन दरम्यान बँक सर्वर डाउन असलं तरी.
 4. ही 3-लेव्हल बँक-ग्रेड सिक्योर टेक्‍नोलॉजी आहे. ज्यावर फसवणुकीपासून वाचता येतं.
 5. UPI lite वर सिंगल टॅपनं 200 रुपयांचं इंस्टंट पेमेंट करता येईल.
 6. एकावेळी जास्तीत जास्त 2000 रुपये ट्रांसफर करता येतात.
 7. दोन हजार रुपयांचे ट्रँजॅक्शन जास्तीत जास्त 2 वेळा करता येईल.
 8. 24 तास म्हणजे 1 दिवसात एकूण 4,000 रुपयांचे ट्रँजॅक्शन पेटीएम लाइटवर करता येतात.
 9. Paytm UPI lite च्या माध्यमातून केलेले पेमेंट बँक पासबुकमध्ये दिसत नाही.
 10. बँक पासबुकमध्ये एंट्री फक्त यूपीआय लाइट बॅलेन्समध्ये पैसे टाकल्यावर होते.

Paytm UPI Lite फोनमध्ये चालू करण्याची पद्धत

 1. सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये Paytm अ‍ॅप इंस्टॉल करा. जर जुनं अ‍ॅप असेल तर लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करा.
 2. होमपेजवर तुम्हाला ‘UPI LITE’ चा ऑप्शन दिसेल किंवा सर्च करून देखील ऑप्शन मिळेल त्यावर टॅप करा.
 3. इथे तुम्हाला यूपीआय लाइटसाठी पात्र बँकांची यादी दिसेल, यातील तुमची Bank निवडा.
 4. ज्या बँकेचं अकाऊंट तुम्हाला पेटीएम यूपीआय लाइटशी जोडायचं असेल ते निवडून Proceed करा.
 5. आता तुम्हाला बँक अकांउटमधील रजिस्टर्ड मोबाइल नंबर व्हेरिफाय करावा लागेल, यासाठी फोनवर SMS पाठवण्यासाठी ओके बटन क्लिक करा.
 6. एसएमएसच्या माध्यमातून वेरीफिकेशन झाल्यावर तुम्हाला तुमच्या त्या बँकेच्या यूपीआय लाइटमध्ये पैसे टाकावे लागतील.
 7. Add Money to UPI Lite ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या बँकेतील पैसे यूपीआय लाइट वॉलेटमध्ये टाका.
 8. लक्षात असू द्या की एकावेळी जास्तीत जास्त 2000 रुपये अ‍ॅड करता येतात.
 9. पैसे अ‍ॅड करताच तुमचं पेटीएम यूपीआय लाइट अ‍ॅक्टिव्हेट होईल आणि पुढील यूपीआय पेमेंटसाठी तुम्हाला यूपीआय पिन टाकण्याची गरज नाही.
 10. तुमच्या बँक स्टेटमेंट किंवा पासबुकमध्ये फक्त तेच ट्रँजॅक्शन दिसेल जे तुम्ही UPI Lite WALLET मध्ये पैसे टाकण्यासाठी केलं आहे. या वॉलेटमधील पेमेंटची नोंद ठेवली जाणार नाही.

UPI Lite सपोर्ट करणाऱ्या बँक

 • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
 • पंजाब नॅशनल बँक (PNB)
 • यूनियन बँक ऑफ इंडिया (UBI)
 • कॅनरा बँक (Canara Bank)
 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI)
 • इंडियन बँक (Indian Bank)
 • एचडीएफसी बँक (HDFC Bank)
 • कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)
 • उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (Utkarsh Small Finance Bank)

UPI Lite मध्ये सध्या उपरोक्त 9 बँकांचे अकाऊंट्स जोडता येतील. सध्या याच बँका पेटीएम यूपीआय लाइटला सपोर्ट करतात, परंतु आगामी काळात ही यादी वाढू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here