आधार कार्ड नंबरवरून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा? इंटरनेटविना होईल काम, अशी आहे ट्रिक

आधार कार्ड गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयांसाठी एक महत्वपूर्ण ओळखपत्र बनलं आहे. एयरपोर्ट ते बँक, सिम खरेदी पासून आणि इतर सरकारी, बिगर-सरकारी कामांसाठी सध्या आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच भारतात बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केल्यावर ग्राहकांना अनेक सेवा मिळतात. ग्राहक अनेक कामं बँकेच्या रांगेत न लागत करू शकतात. विशेष म्हणजे युजर्स इंटनेट कनेक्शनविना देखील बँकिंग सेवा वापरू शकतात. आज आम्ही तुम्हाला आधारच्या मदतीनं बँक अकाऊंटमधील बॅलेन्स चेक करण्याची माहिती देणार आहोत.

आधार नंबरवरून बँक बँलेस चेक करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

जर तुमच्या बँक अकाऊंटशी आधार लिंक असेल तर तुम्ही *99# सर्व्हिसच्या मदतीनं ऑफलाइनच बँक अकाऊंट बॅलेन्स चेक करू शकता. ह्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप फॉलो कराव्या लागतील.

स्टेप 1 : बँक अकाऊंटशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवरून *99# डायल करा.

स्टेप 2 : तुमच्या मोबाइल नंबरवर ‘वेलकम टू *99#’ मेसेज फ्लॅश होईल.

स्टेप 3 : ओकेवर क्लिक केल्यावर फ्लॅश मेसेजमध्ये मेन्यू ओपन होईल. त्यात तुम्हाला तिसऱ्या नंबरवर चेक बॅलेन्सचा ऑप्शन मिळेल.

स्टेप 4 : त्यामुळे बॅलेन्स चेक करण्यासाठी 3 टाइप करून रिप्लाय करा.

स्टेप 5 : थोड्या वेळानं फोनमध्ये फ्लॅश मेसेज येईल ज्यात तुम्हाला यूपीआय पिन रिप्लाय करावा लागेल.

स्टेप 6 : पुढील फ्लॅश मेसेजमध्ये तुम्हाला तुमचा बँक बॅलेन्स समजेल.

नोट : जर तुमचे दोन किंवा अधिक बँक अकाऊंट असतील तर *99# सर्व्हिस तुम्हाला त्या बँकेतील बॅलेन्स सांगेल जी सरकारी यूपीआय अ‍ॅप BHIM मध्ये तुमची प्रायमरी बँक असेल.

*99# चे इतर फायदे

*99# द्वारे ऑफलाइन बँक बॅलेन्स चेक करण्यासोबतच इतर फीचर्स देखील वापरता येतात. ह्या सर्व्हिसचे इतर फीचर्स खाली देण्यात आले आहेत.

  • सेंड मनी
  • रिक्वेस्ट मनी
  • चेक बॅलेन्स
  • माय प्रोफाईल
  • पेंडिंग रिक्वेस्ट
  • ट्रँजॅक्शन्स
  • यूपीआय पिन

बँकेशी आधार लिंक कसं करायचं?

बँक अकाऊंटला आधार लिंक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही बँकेत जाऊन मॅन्युअली आधार लिंक करण्यासह ऑनलाइन आणि एटीएमवरून देखील तुमचं बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करू शकता.

बँकेत जाऊन : तुमच्या आधार कार्डच्या प्रतीसह एक अर्ज देऊन तुम्ही बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करू शकता.

ऑनलाइन : जर तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर लॉगइन करून अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करू शकता.

एटीएम : बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक एटीएममधून देखील करता येतं. एटीएम मध्ये कार्ड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर आधार लिंकचा ऑप्शन मिळतो. इथून देखील तुम्ही तुमच्या अकाऊंटशी आधार लिंक करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here