Samsung आपल्या मिड रेंज स्मार्टफोन सीरीज Galaxy M मध्ये नवीन फोन 5 जुलैला लाँच करणार आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन दुपारी 12 वाजता लाँच करण्यात येईल. मे महिन्यात आलेल्या 4G व्हेरिएंटनंतर Galaxy M13 5G स्मार्टफोनची वाट बघितली जात होती. आता लवकरच 5G व्हेरिएंट देखील भारतीयांच्या भेटीला येणार आहे.
91 मोबाईल्सनं आपल्या एक्सक्लुसिव्ह रिपोर्टमधून सांगितलं होतं की Samsung Galaxy M13 5G ची निर्मिती कंपनीच्या फॅक्टरीमध्ये सुरु होईल. तसेच फोनच्या रियर पॅनलचा लाईव्ह इमेज देखील शेयर करण्यात आली होती. आगामी Galaxy M13 5G स्मार्टफोन सर्टिफिकेशन साईट FCC वर देखील दिसला आहे, या लिस्टिंगमधून फोनच्या काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. इथे आम्ही तुम्हाला आगामी Samsung Galaxy M सीरीज स्मार्टफोनची माहिती देत आहोत.
Samsung Galaxy M सीरीजचा नवा स्मार्टफोन
Samsung नं ट्वीटरवर एक पोस्ट शेयर करून सांगितलं आहे की कंपनी लवकरच नवीन Galaxy M सीरीजचा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या पोस्टमध्ये माहिती देण्यात आली आहे की सॅमसंगचा हा फोन 5 जुलैला लाँच करण्यात येईल. कंपनीनं आपल्या ट्विटर पोस्टमध्ये गॅलेक्सी एम सीरीजच्या डिवाइसचा उल्लेख केला आहे, कोणतंही स्पष्ट नाव सांगितलं नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये अंदाज लावला जात आहे की कंपनी Samsung Galaxy M13 5G भारतात उतरवू शकते. सॅमसंगचा हा स्मार्टफोन ब्लू, ब्राउन आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो.
Samsung Galaxy M13 5G चे स्पेसिफिकेशन्स
- 6.5-इंच FHD+ LCD डिस्प्ले
- MediaTek Dimensity 700 प्रोसेसर
- 5,000mAh बॅटरी, 15W चार्जिंग
- 6GB रॅम/ 128GB स्टोरेज
- 50MP + 2MP ड्युअल रियर कॅमेरा
- 5MP सेल्फी कॅमेरा
Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा Full-HD+ LCD डिस्प्ले पॅनल दिला जाऊ शकतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 15W चार्जिंगसह सादर केला जाईल. डिवाइसमध्ये 6GB पर्यंतच्या रॅम आणि 128GB ची स्टोरेज मिळेल. मेमरी वाढवण्यासाठी मेमरी कार्ड स्लॉट देखील मिळू शकतो.
Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात एंट्री घेईल. सॅमसंगच्या या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी कॅमेरा सेन्सर असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
हा आगामी 5G स्मार्टफोन परवडणाऱ्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार या डिवाइसची किंमत 15 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. ही माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे, त्यामुळे जोपर्यंत हा डिवाइस लाँच होत नाही तोपर्यंत यावर विश्वास ठेवता येणार नाही.