तुम्ही कधी ऐकले आहे की फोन लाँच झाल्याच्या एका महिन्याच्या आत डिस्काउंट दिला गेला आहे? Realme 12 Pro+ 5G फोन मार्केटमध्ये नवीन उदाहरण सेट करत आहे. जानेवारी महिन्यामध्ये भारतात लाँच झालेल्या स्मार्टफोनवर कंपनीने डिस्काउंट ऑफर सादर केली आहे ज्यामुळे या मोबाईलला 2,000 रुपयांच्या सूट सह विकत घेता येईल. या मोबाईल स्कीमची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
Realme 12 Pro+ 5G ऑफर
रियलमी 12 प्रो प्लस 5 जी वर लावण्यात आलेली ऑफर फक्त फोनच्या 8GB RAM + 256GB Storage व्हेरिएंटवर जारी करण्यात आली आहे. या स्कीम अंतर्गत मोबाईलवर 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. हा डिस्काउंट एक आठवडा म्हणजे 7 दिवसांसाठी लागू झाला आहे जो 23 फेब्रुवारीपासून सुरु होऊन 29 फेब्रुवारीपर्यंत चालेल. तसेच 31,999 रुपयांची किंमत असलेला हा Realme 12 Pro+ 5G मॉडेल 29,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.
Realme 12 Pro+ 5G किंमत
रियलमी 12 प्रो+ 5 जी फोन भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला होता. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB RAM + 128GB Storage देण्यात आली आहे ज्याची किंमत 29,999 रुपये आहे. याव्यतिरिक्त 8GB RAM + 256GB Storage व्हेरिएंट 31,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता तसेच सर्वात मोठा 12GB RAM + 256GB Storage Realme 12 Pro+ 5G फोन 33,999 रुपयांमध्ये सादर झाला होता. या मोबाईल फोनला Submariner Blue, Navigator Beige आणि Explorer Red कलरमध्ये विकत घेता येईल.
Realme 12 Pro+ 5G स्पेसिफिकेशन्स
- 6.7″ 120Hz Curved Vision Display
- Qualcomm Snapdragon 7s Gen 2
- 12GB Dynamic RAM
- 50MP + 64MP + 8MP Camera
- 32MP Selfie Camera
- 67W SUPERVOOC Charge
- 5,000mAh Battery
- स्क्रीन: रियलमी 12 प्रो प्लस 5 जी फोनमध्ये 2412 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाची फुलएचडी+ स्क्रिन देण्यात आली आहे. हा कर्व्ड ऐज डिस्प्ले आहे जो ओएलईडी पॅनलवर बनला आहे तसेच 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो. यावर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 2160 पीडब्ल्यूएम डिमिंग आणि 950 निट्स ब्राइटनेस सारखे फिचर्स मिळतात.
- परफॉर्मन्स: हा फोन अँड्रॉइड 14 आधारित रियलमी युआय 5.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात 4 नेनौमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.4 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्यामध्ये सक्षम आहे.तसेच ग्राफिक्ससाठी एड्रेनो 710 जीपीयू आहे.
- मेमरी: रियलमीने आपल्या या मोबाईल फोनला 12 जीबी डायनॉमिक रॅम टेक्नॉलॉजीसह केला आहे. ही टेक्नॉलॉजी 8 जीबी फिजिकल रॅमवर मिळून याला 20 जीबी पर्यंत तसेच 12 जीबी फिजिकल रॅम 24 जीबी पर्यंत वाढवते.
- बॅक कॅमेरा: फोटोग्राफीसाठी फोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल मेन सेन्सर, एफ/2.6 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सल पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स तथा 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. यावर 120X Zoom आणि OIS टेक्नॉलॉजी मिळते.
- फ्रंट कॅमेरा: इन्स्टाग्रामसाठी रिल्स बनविणे तसेच सेल्फी काढण्यासाठी रियलमी 12 प्रो+ 5जी फोनमध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा सोनी चलामएक्स615 सेन्सर आहे जो एफ/2.4 अपर्चरवर चालतो तसेच 90 फिल्ड ऑफ व्यूला सपोर्ट करतो. हा कॅमेरा AI Beauty Algorithm वर चालतो ज एकदम चांगले फोटो काढण्यासाठी सक्षम आहे.
- बॅटरी: पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 67 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे जो कंपनीच्या दाव्यानुसार फक्त 19 मिनिटामध्ये ही बॅटरी 0 ते 50 टक्क्यांपर्यंत तसेच 48 मिनिटामध्ये फुल 100% करू शकते.














